दिसामाजी काही तरी...पण काय?
"दिसामाजी काही तरी लिहावे" याचा अर्थ बरेचसे ब्लॉगर "दिसामाजी काही तरी ढापावे" असा काढताना दिसत आहेत. ट्युलिपच्या लेखाची गौरवीने केलेली चोरी अयोग्य आहे.
गड्यांनो, तुम्हाला वेळ आहे, फुकट आहे, एखादी कविता/पुस्तक आवडते, कॉपी पेस्ट करता येते म्हणुन वाट्टेल ते ढापायचा अधिकार मिळत नाही.
विदग्धचे प्रताधिकाराचे कवित्व फारच बोलके आहे.
अभ्यासु किंवा हौशी ब्लॉगर्सनी श्रेयासहित इतरांचे संदर्भ देणे ठिक आहे. परंतु तुमच्या ब्लॉगवर जाहिराती असतील तर तो चोरलेल्या मजकुराचा चक्कं व्यावसायिक उपयोग ठरतो याचे भान ठेवावे.
हयात नसलेल्या लेखकांचे/कवींचे साहित्य आपण बिनदिक्कत प्रसिद्ध करू शकतो हाही एक गैरसमज आहे. त्या रचनांचे कायदेशीर प्रकाशन हक्कं अजुनही कुणाकडे असण्याची शक्यता आहे.
प्रकाशनाचे हक्कं हे लिखित मजकुरापुरतेच मर्यादित नसतात. दृक्श्राव्य माध्यमांनाही तेच नियम लागु पडतात. बर्याचश्या ब्लॉग्जवर चोरलेली छायाचित्रे दिसतात. छायाचित्रं तुम्ही स्वतः काढलेले नसेल तर मुळ छायाचित्रकाराच्या परवानगीने श्रेयासहित प्रसिद्ध करावे.
8 comments:
साहित्यचौर्य आज सर्रास काही ब्लॉगांवर सुरु आहे. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे जेव्हा साहित्य चोरून त्या ब्लॉगवर गूगल किंवा शादी डॉट कॉम च्या जाहिराती दाखविल्या जातात तेव्हा ती प्रक्रिया आणखी व्यावसायिक बनते.
यासाठी "मराठी ब्लॉग विश्वा"च्या मदतीने काही करता येईल काय यावर विचार तर मी नेहेमीच करत असतो. उदा. साहित्यचोऱ्या करणाऱ्या ब्लॉगांची एक यादीच तयार करावी आणि त्या ब्लॉगांमधील सरळ उतरवलेल्या लेखांना त्या ब्लॉगकर्त्याने काढून टाकेपर्यंत त्यांचा पिच्छा पुरवायचा. वगैरे -
आणखी काही सूचना असतील तर सांगा.
- पवन
पवन,
सुचना १:
मराठी ब्लॉग विश्वावर "साहित्यचोरी कळवा" असा दुवा टाकता येईल. त्या दुव्यावर एखाद्या ब्लॉगविषयी सतत तीन वेळा तक्रार आल्यास त्या ब्लॉगरला एक संधी द्यावी. संधीचा उपयोग नं केल्यास ब्लॉगला काळ्या यादीत टाकावे. काळ्या यादीत टाकलेल्यांचे ब्लॉग मराठी ब्लॉग विश्वावर प्रसिद्ध करू नयेत.
सुचना क्रं २ मराठी ब्लॉगविश्वावर येणार्या नविन लेखकांकडुन "चोरी करणार नाही" असे प्रतिज्ञापत्रं भरून घ्यावे.
अशा प्रकारची चोरी पकडायची व्यवस्था झाल्यावर चोरीचे प्रमाण बरेच कमी होईल.
कसंकाय,
फारच निंद्य बाब आहे. या दृष्टिकोणातून एक दोनदा माझ्या डोक्यात विचार आला होता, की "ब्लॉगवरील postच्या प्रकाशनाचे हक्क ब्लॉगलेखकालाच आहेत" अशा स्वरूपाचा मजकूर ब्लॉगवर असावा. पण, तसं कायदेशीर आहे की नाही याबद्दल साशंक होतो. तसंच, इतरांचे ब्लॉग पाहिल्यावर त्यापैकी एकानेही असं काही लिहिलं नसल्यामुळे मीही तो विचार सोडून दिला. जोपर्यंत publishing ethics प्रत्येकजण पाळतोय, तोपर्यंत चिंता नाही. पण साहित्यचोरीची बाब गंभीर होतेय. त्यामुळे सर्वांनी मिळून काहीतरी करायला हवं.
पवन,
कसंकायच्या सूचना आमलात आणता आल्यास उत्तम होईल. मी त्यात एक भर घालू इच्छितो. "मराठी ब्लॉगविश्व"चा लोगो ब्लॉगवर लावल्यावर त्वरित activate करू नये. त्या ब्लॉगवरील मजकूर चोरलेला नसल्याची खात्री करणे (हे कितपत शक्य आहे माहित नाही, पण शक्य असल्यास उत्तम). हा लोगो वर्षभरच active राहण्याची सोय करावी. वर्ष संपल्यावर लोगो freshly activate करावा लगला पाहिजे.
Tumachi soochana changli aahe (teen veLa takrar aalyas black-list karanyachi). hopefully, tyane thoda tari farak padel.
प्रशांत,
विदग्धप्रमाणे तुम्हीही प्रताधिकाराच्या अधिकाराची माहिती प्रकाशित करू शकता. कायद्याने रचनाकाराला प्रताधिकाराचा अधिकार आपोआपच (by default) दिलेला आहे.
तुमची activation ची कल्पना चांगली आहे.
सर्वांनी मिळुन काही तरी करण्याची वेळ आली आहे.
संगिता हयात नसलेल्या साहित्यिकांच्या मजकुराच्या प्रकाशनाबद्दल चं तु लिहिलेलं आहेस ते जरा अधिक स्पष्ट करुन सांग ना. म्हणजे त्यांच्या नावाचा उल्लेख केला तरी तसं करता येत नाही का?
चोरी !!
सर्वात जुना व्यवसाय.
मुल्यवान गोष्टी उघड्यावर टाकू नये.
मेहनत करे मुर्गा
अंडा खाये फकीर !
कायद्याचे हात लांब > पाव सत्य
चोराचे पाय त्याहून लांब > अर्धसत्य
न्याय देवता आंधळी > पाऊण सत्य
वकील:भुके;कचेरया:नंग्या >पुर्ण सत्य
कायदेभिरूंचे रामनाम सत्य !!
पब्लीक मुतारीत निनावी ग्राफीटी
लिहावी त्याच लायकीचे कसदार
लिखाण नेट वर करावे !
त्याच सहजतेने व त्याच जोशाने.
स्वत:ची काळजी स्वत: घेणार्यांनी व मुतारी लेखना पेक्षा आपले लिखाण बरे आहे असा समज किंवा विश्वास असणार्यांनी आपाले स्रुजन आणि उत्सर्जनाचे स्थळ सुरक्षीत (Lock) करून ठेवावे हे उत्तम !
Post a Comment