खुदा के लिये
शोएब मन्सूरचा "खुदा के लिये" हा पाकिस्तानी सिनेमा पुरोगामी मुस्लिमांची बाजू दाखवतो. इंग्लंड,पाकिस्तान, अफगाणीस्तान आणि अमेरिका अशा चार देशात कथानक उलगडते. सप्टेंबर ११ च्या पार्श्वभुमीवर मुस्लिम समाजातील अंतर्गत संघर्ष,विरोधाभास व अन्यायाचे बर्यापैकी परिणामकारकपणे चित्रण केले आहे. या समाजाच्या अनेक ज्वलंत प्रश्नांना हात घालत एका सुसुत्रं कथेची यशस्वी मांडणी केली आहे.
नासिरुद्दिन शहाने साकारलेला कोर्टातील साक्षीचा प्रसंग लाजवाब.
सर्वात जमेची बाजु म्हणजे संगीत. अप्रतिम.
http://mastibox.com/songs/?p=/Pakistani/Khuda%20Ke%20Liye&c=10
काही ठिकाणी दिग्दर्शन व अभिनय जरा अशक्तं वाटतात, कलाकारांना पुरेसा अनुभव नसल्याचं अधुन मधुन जाणवतं. तरीही वेगळं काही तरी दाखवणारा हा चित्रंपट आवर्जुन बघावा.