ब्लॉग - भाग एक
कट्टं... कट्टं..कट्टं..कटट्टं..कटट्टं...कटट्टं...कटट्टट्ट्ट्ट्ट्ट.....
"छ्या काय झालं या कीबोर्डला अचानक?" सदु पुटपुटला
कटट्टट्ट्ट्ट्ट्ट.....कटट्टट्ट्ट्ट्ट्ट.....टट्टट्ट्ट्ट्ट्ट.....
"च्या xxxxxx. हे काय अडकलं आहे इथे या f च्या बटना खाली? ....xxxx काय भानगड आहे? हे इथे अक्षरासारखं काय अडकुन बसलेलं दिसतंय...अरे बापरे हे काय लांबच्या लांब?"
अचानक-
"उं उं उं ... ओSSSSSSSy ओSSSSSSSय ओSSSSSSSय. xxxxxx हे काय? अगं अगं.. अगं(वरच्या पट्टीत) कुठे आहेस तू? मला वाचव... हा - हा कीबोर्ड मला ओढतोय आत.....आई गं"
झुप्प.
शांतता...
अंगाभोवती गुंडाळलेल्या शब्दांच्या वेटोळ्यातुन त्याने स्वतःची मुक्तता करून घेतली. बुडुक बुडुक बुडुक बुडुक असा आवाज करत ती वेटोळी शद्बांच्या ज्या डबक्यात तो उभा होत्या त्यातच खाली बुडाली.
आत्तापर्यंत त्याने संगणकावर टंकित केलेला शब्दन शब्द साचुन तिथे एक डबके तयार झाले होते. त्याने वर पाहिले. कळफलकाच्या सर्व चाव्या आतल्या बाजुने तो पहिल्यांदाच बघत होता. एक क्षणभर कोणची कळी कोणच्या अक्षराची असेल हा विचार त्याच्या मनात आला. पण लगेच भानावर येऊन कुठुन बाहेर कसे पडता येई ह्याचा विचार तो करू लागला. वरती कीबोर्डच्या छताला हात लावायचा त्याने प्रयत्नं केला, पण हात पोचेना. एव्हाना शब्दांचा तो चिखल हळुहळु गिळगिळीत होतो आहे असे त्याला वाटु लागले. अधिक रुतायच्या आधी इथुन बाहेर पडावे म्हणुन त्यानी उड्या मारत चावीला लटकायचा प्रयत्नं करून पाहिला, पण व्यर्थ. अखेर शब्दांची एक दोरी चिखलातुन उचलुन कीबोर्डला अडकवण्यासाठी वर भिरकावली. हिसके देऊन दोरी दोन तीन वेळा खाली ओढुन पाहिली. त्याबरोबर डबक्यात भोवरे तयार होऊ लागले.
हातातल्या दोरीकडे पुन्हा एकदा त्याने लक्ष केंद्रित केले. दोरी नव्हतीच ती. त्याने भेट दिलेल्या एका संकेतस्थळाचा url होता तो.
घुं....घुं....घुं......घुं घुं घुं घु घुंघुंघुंघुsssssss
डबके फ्लश होऊ लागले. चिखलात गरागरा फिरता फिरता पाय खाली ओढल्याचे त्याला जाणवले....
क्रमश:
सुचना:
कृपया "म्हणजे काय?" असा प्रश्न विचारू नये.
रोज एक असे चार भाग लागोपाठ प्रसिद्ध होतील.
3 comments:
मज्जाच आहे. वरतून पुन्हा "म्हणजे काय " असं विचारायचं नाही!
तरीही विचारणार, "म्हणजे काय?" :)
नेहमी पेक्षा वेगळं वाटतय...
सामवेद,
करू नका सांगितलेले करावेसेच वाटते नाही का?
Abstract लिखाणाचे स्पष्टिकरण देण्यात काही अर्थ नसतो.
नेहेमीपेक्षा वेगळीच आहे ही मालिका. ही का लिहीली ते संपल्यावर सांगायचा प्रयत्नं करेन.
Post a Comment