Thursday, January 03, 2008

संशोधन

फाsssssर फाsssssर फाsssssर फाsssssर वर्षांनतरची घटना:




पिल्लु उंदीर: बाबा, आपण माणसांची पुजा का करतो?


बाबा उंदीर: बेटा, कारण ते फार निस्वार्थी होते. त्यांच्यामुळेच आपण आज इतकं चांगलं जीवन जगु शकतो.


पि.उं: बाबा बाबा, निस्वार्थी म्हणजे काय?


बा.उं.: म्हणजे बेटा, जो स्वतःचे शेपुट अडकलेले असतानाही दुसर्‍याचे शेपुट आधी सोडवायचा प्रयत्नं करतो.


पि.उं.:बाबा बाबा, मला माणुस दाखवाल? खरा खरा?


बा.उं.: बेटा, कसं सांगु तुला? फाsssर फाsssर वर्षांपूर्वी खूsssप खूsssप माणसे इथे रहात होती. ती खूsssप हुशार होती. त्या काळातले उंदिर आजच्याइतके हुशार नव्हते. पण त्या दयाळु माणसांना उंदरांची खुप काळजी होती. सर्व आधुनिक तंत्रज्ञान वापरून त्यांनी उंदिरांसाठी अनेक औषधे तयार केली.
मग एकदा एक मोठ्ठा साथीचा रोग आला. त्यावर त्यांनी उंदरांसाठी एक रामबाण औषध बनवले. ते उंदरांना नुसतेच लागु पडले नाही, तर उंदीरांच्या नविन पिढ्या एकदम मोठ्ठ्या आणि हुशार झाल्या. पण दुर्दैवानी माणसांना मात्रं ते औषध लागु पडले नाही....

4 comments:

Anonymous said...

fantastic

HAREKRISHNAJI said...

येणार आहे अगदी हीच परिस्थीती , आंधळेपणाने नव्हे तर स्वःताला फारच हुशार समजल्याने

मन कस्तुरी रे.. said...

संगीता

एक्सप्लनेशन वॉंन्टेड.

अश्विनी

शर्मिला said...

छोटसं पण अत्यंत इफेक्टिव पोस्ट!

हत्तींवरच्या लेखासंदर्भात मला हवी असणारी माहिती देणार्या लिन्क्स लगेच दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
नविन वर्षासाठी तुम्हाला आणि तुमच्या ब्लॊगला शुभेच्छा.