परतिबाताई राष्ट्रपती होनार?
"आवं तात्याबा कुटं गेल्ता? कवाधरून शोधू रायली तुमाले? येक टाप बातमी सांगायची व्हती - आपल्या परतिबा ताई राष्ट्रपती होते म्हंते" बायजाक्का
"बायजाक्का, ते म्या आधीच वाचलं म्हनून तर गेल्तो चौकातल्या विंटरनेट कापेमधे - म्या कांप्युटर उघडून आपल्या सद्याचे राष्ट्रपतीच र्हावू द्या म्हनून सांगूनशानी आलो" तात्याबा
"आता बाई! आवो, परतिबा ताई आपला इकडच्या हाये" बायजाक्का
"आसन आसन, पण त्याहीनं काय दिवे लावले आतापर्यंत? आपल्या अमरावती जिल्ल्याच्या पर्तिनिधी आसताना कधी डुंकून बी बघंनात आपल्याकडं! आपल्या शयराची, जिल्ल्याची काय बी प्रगती झाली नाई त्याईच्या टायमात."
"आवं पन सोनियाबाईनं परतिबा ताईचंच नाव फुडं केलं म्हंते ना?"
"आता बायजाक्का, येक इद्वान, पारमानिक मानूस पहिल्याच टाइमाले राष्ट्रपती झाला त्याले कायच काढाव म्हनतो मी? कलाम सायेब लई हुशार हायेत त्यायची राष्ट्रपती होन्याआधीची कामगिरीबी लई मोठी हाये. लहान-पोरासोरांना बी लई चांगला उपदेश करते ते. त्यायच्या मुळं आपल्या गावची शेंबडी पोरंसोरंबी त्याइच्यावानी थे सायंटिस का काय होतो म्हंते. परतिबा ताईची येकबी कामगिरी न्हाई."
"आवं परतिबा ताई लई भाविक हायेत - त्याईला कोन्या बाबानं सांगितलं हाये म्हने " बायजाक्का
" थोच तं फरक हाये बायजे, कलाम सायेब बाबाच्या भरोशावर सोडनार न्हाईत देशाले. आपुन सोताच हातपाय हलवा लागते."
"आवं पन आपल्या कॉंग्रेसच्या निष्ठावान उमेदवार हायेत ना वं त्या?"
"नेत्याईची निष्ठा जन्तेशी हाये का ते बघा लागते. आनीबानीच्या टाईमात परतिबा ताईनं जन्तेले दिलं लोटून आन केला खुर्चीशी लाळघोटेपना. लोकाईची इच्छा तं बगायला पाहिजे होती कॉंग्रेसनं. दुसरा उमेदार काऊनच उबा केला?"
http://timesofindia.indiatimes.com/Pratibha_claims_divine_premonition_on_greater_role/articleshow/2151402.cms
10 comments:
funny but very true!!! Soniya bai na Pantapradhaan aani rashtrapati (ki patni?)mhnun kathputlya baahulya hawya aahet...tyasaathi he sgagala rajkaaran....
Tumhi chhanach lihun raahilaayat...
Ajit
hi bolibhasha ahirani aahe ka? vachayala chaan vatali. ekhada chaan pustak mahitey ka jyat ahirani boli vaparaley....bahinabainchya kavita sodun...
कोहम,
ही वर्हाडी बोली आहे. नागपूर, अमरावती या भागात बोलली जाते.
बाजीराव पाटिल आणि प्रतिमा पाटिलांच्या विनोदी कथा वाचायला मिळाल्या तर जरूर वाचा.
>>बायजाक्का<< Naav Bhari ahe!
सुधारणा:
कोहम मी चुकीने प्रतिमा पाटील लिहीले - लेखिकेचे नाव प्रतिमा इंगोले आहे.
How true. on the top of that few criteria for the presidental elections this time are whether candidade of man or women , marathi or non marathi, hindu or non-hindu.
Capability, age, physical fitness are of lesser importance.
अप्रतिम. हा एकच शब्द सुचतो. मला जे व्यक्त करायला दिड पानं लागलीत ते आपण अर्ध्या पानात केलत. खरच सुंदर लिहिले आहे.
आपण नागपूरच्या का? माझ घर आहे नागपूरला.
अजित, कोहम आणि चिन्मय,
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
लई छान लीवल बा. आपल्याले तुय लिवलेल मले लई छान लागल!
मुन्ना
Post a Comment