अंतिम युद्ध:वाचकांच्या प्रतिक्रियांची उत्तरे
अंतिम युद्धाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. वाचकांच्या प्रतिक्रियांमधे एक समान धागा आहे.
अश्विनी:काय गं? एकदम असा ऍब्रप्ट का शेवट केलास?बरचसं तू वाचकांच्या तरल का काय कल्पनाशक्तीवरच सोडून दिलेलं दिसतंस.पण आम्हाला थोडा एक्सप्लिसिट शेवट आवडला असता. भले अजून एक भाग का लागेना.
हरेकृष्णाजी:मधेच जरासे डोक्यावरुन जाते
हर्षद:I think you are suggesting about the problems we are facing nowadays because of pollution and all. You should go beyond it and let them show the way to save the mother Earth.
अश्विनी, शेवटाला मिळालेली नेमकी हीच प्रतिक्रिया अपेक्षित होती.खरं म्हणजे मला इतकंही स्पेल आऊट करायचं नव्हतं. फार जड वाटतील असे लेख लिहायचे नव्ह्ते म्हणून कथेचे माध्यम निवडले. काही तरी रोमांचकारी,रहस्यमय लिहून वाचकांचे मनोरंजन करण्याचा माझा कुठलाही उद्देश नव्हता. उलट वाचकांना सगळंच आवडू नये,बराचसा भाग वाचून त्यांनी बेचैन,अस्वस्थ व्हावे,विचार करावा हा खरा उद्देश होता. (कोणीतरी चांगली जळजळीत प्रतिक्रिया लिहावी ही माझी अपेक्षा मात्रं पूर्ण झाली नाही)
हरेकृष्णाजी, वाचकांच्या डोक्यावरून जाणारे काही लिहिण्याचा उद्देश नव्हता. ती माझ्या लेखनातली उणीव आहे हे मात्रं खरे.
हर्षद, भविष्यातील हे युध्द टाळण्यासाठी आपण काय करावे हा प्रश्नं महत्वाचा आहे. या विषयावरचा माझा इंग्रजी ब्लॉग वाचा: http://planetatpeace.blogspot.com/.
आपल्या विचारसरणीत अगदी मूलभूत बदल झाल्याशिवाय इतर बाह्य उपायांचा विशेष उपयोग होणार नाही. आपली आक्रमणकारी असल्यासारखी वृत्ती आधी बदलायला हवी. मानव-केंद्रितता सोडून पृथ्वी-केंद्रितता अंगिकारायला हवी. प्रगतीपेक्षा टिकणे/टिकवणे जास्तं महत्वाचे आहे.पृथ्वीवरील इतर प्राणिमात्रांकडे बघण्याच्या दृष्टिकोनात अमूलाग्र बदल व्हायला हवा. प्राण्यांचा उपयोग आपल्या क्षुल्लक गरजा भागवण्यासाठी करायला नको. निसर्गाचे संतुलन राखण्याची एक मोठी जबाबदारी मानव सोडून इतर प्राणी लक्षावधी वर्षांपासून पार पाडत आले आहेत. याबाबतीत ते आपल्यापेक्षा खूप अनुभवी आणि कार्यक्षम आहेत. या महत्वाच्या जबाबदारीतून बाहेर काढून आपल्या ताटातले,कपातले पदार्थ बनण्याचे क्षूद्रं काम त्यांना देऊ नये. आपल्या पाळीव प्राण्यांमुळे जैविक-विविधता धोक्यात आली आहे, जंगलांची प्रचंड हानी होते आहे. इतकंच काय, त्यांच्या चरण्यामुळे शेतीसाठी उपयुक्त असलेला मातीचा वरचा थर (टॉप सॉईल) ही नष्टं होतो आहे.
वनस्पतींचीही तीच अवस्था आहे. फुलांनी डवरलेल्या बागा,घरासमोरचे लॉन,फुलांच्या दुकानातले सुंदर गुच्छ इ बघून हरखून जाऊ नका. बहुदा ती फुलवण्यासाठी वापरण्यात आलेल्या किटकनाशकांनी पाणी प्रदूषित आणि जमिन निकृष्टं झाली असावी. मागच्या व्हॅलेंटाईन डेला तुम्ही विकत घेतलेल्या गुलाबाच्या गुच्छाने खोल समुद्रातले एखादे कोरेल नष्टं झाले असण्याची दाट शक्यता आहे. जिथे मानवाचा हस्तक्षेप झाला तिथे विनाश झालाच म्हणून समजा.
आपल्या साध्या जगण्याने आकाश,जमीन आणि पाणी या तत्वांचा नायनाट होतो आहे - हे जगणेच बदलले पाहिजे हे सांगण्याचा खरा उद्देश होता. केवलला जशा दोन्ही बाजू ऐकून निर्णय घ्यायचा आहे तसाच आपल्यालाही घ्यायचा आहे.
6 comments:
खरय आपले म्हणणे. मानवाचा हस्तक्षेप झाला तिथे विनाश झालाच म्हणून समजा.
पण येवढा पर्यावरणासाठी खोलपर विचार करणारी सर्वच माणसे असती तर आज वसुंधेरेची पुरी वाट लागली नसती.
माझा मुलाला नष्ट होत चाललेल्या प्रजातीवर, वनस्पतीवर संशोधन करायचे आहे. आता तो s.y.j.c (XII) मधे आहे
"डोक्यावरुन जाते" हे म्हणजे मला कौतुकाने म्हणायचे होते science fiction हा प्रकार मराठीमधे अजुन रिळलेला नाही.
पण आपल्या कथा मी अधिक गांभिर्याने वाचायला हव्या होत्या हे मात्र खरे. याचे printouts घेवुन परत मी त्या वाचीन
हरेकृष्णाजी,
इतकी संदर प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद.
सायंन्स फिक्शन असले तरी ते डोक्यावरून जायला नको. नं रूळण्याचे ते एक महत्वाचे कारण असू शकते.
आपली प्रत्येक कृती तपासून पहाण्याची गरज आहे. तुमच्या मुलाला अस्तंगत प्रजातींवर संशोधन करायचे आहे हे वाचून आनंद झाला. नविन पिढी जास्तं जागरूक आहे ही एक आशादायी बाब आहे. अजून वेळ गेलेली नाही. आपण सर्व एकत्रं येऊन परिस्थिती नक्कीच सुधरवू शकतो.
kay zalay kahi kalatach nahiy. ya blogwar bhalatisalati characters distayt. :(
kahi change kelay?
Meghana,
I haven't changed any thing.
I am able to read as usual. Not sure why you can't read?
Has any one else faced the same issue?
Hi pratikriya hya lekhavar nahi tar khalachya pratikriyevar aahe..
"आज मला काय लिहावे ते सुचत नाही, निळसर कंटाळा दाटून आला आहे" असे लिहिले तर ब्लॉगवर २० एक प्रतिक्रिया तरी सहज मिळतील.
असे असले तरी परिस्थिती सुधारते आहे असे ही मला वाटते. काहीतरी वेगळे लिहिणार्यांनी निराश नं होता लिहित रहावे.
manahpurvak patala. pan serious likhanala suddha pratikriya yetat. ani samaja nahi alyach tarisuddha te likhan vachala jatach. shevati apala uddesh konitari vachava asach aahe na? hach mudda kahi divas mazya manatahi ghar karun hota. pratikriyansathi lihayacha ki manala bhidalela vishay mandayacha...arthatach light likhan karu naye asa nahi pan serious likhan titakasa seriously ghetala jat nahi hehi kharach..
कोहम,
बरोबर आहे. कधी नव्हे ते आपल्याला हवे ते प्रसिद्ध करायचे माध्यम हातात आले आहे. त्यामुळे मनाला भिडलेल्या विषयावरच लिहायला हवे. प्रतिक्रियांसाठी लिहायला नकोच.
एखाद्या गंभीर विषयावर चर्चा करायची असेल तर सद्ध्या ते काही फार शक्य नाही.
आणखी थोडा काळ जाऊ द्यावा लागेल. सिरियसली लिहिणार्यांची संख्या वाढते आहे ही एक आशादायी गोष्ट आहे.
Post a Comment