Friday, June 22, 2007

पुण्यजला गंगा

हिंदू धर्मात ज्या गोष्टी अतिशय पवित्रं मानल्या जातात त्या गोष्टींची स्वतःच अक्षम्य अवहेलना, विटबंना करायची हा आपला खाक्या आहे. पावित्र्यं आणि स्वच्छता याचा अर्थाअर्थी काही संबंध असल्याचे आपल्याला वाटत नाही. या उलट इतर धर्मियांच्या प्रार्थनास्थळी जाऊन पहा. शांतता,स्वच्छता, प्रसन्न वातावरण हे तिथे अनुभवायला मिळते.
गंगेचे उदाहरण घ्या. गंगा ही आपल्याला पूजनीय असल्यामुळे या विषयावर अनेक श्लोक आणि काव्ये रचली आहेत. गंगेच्या काठावर काय करू नये ते आपल्या पूर्वजांनी पुराणात सांगितले आहे:
गंगा पुण्यजला प्राप्य त्रयोदश विवर्जयेत।
शौचमाचमनं चैव निर्माल्यं मलघर्षणं॥
गात्रसंवाहनं क्रीडा प्रतिग्रहमथो रतिम।
अन्यतीर्थरतिं चैव अन्यतीर्थप्रशंसनम॥
वस्त्रत्यागमथाघातं सन्तारं च विषेशतः।
नाभ्यंगित प्रविशेच्च गंगाया न मलार्दित:॥
न जल्पन्न मृषा वीक्षन्न वदन्न्नृतं नर:।
स्वैर अर्थ:
पुण्यजला गंगेमधे मल-मूत्रत्याग, तोंड धुणे, दात घासणे, चुळा भरणे, निर्माल्य फेकणे, मळलेले अंग घासणे इ करू नये. स्त्री पुरूषांनी जलक्रीडा करू नये. दानाचे ग्रहण करू नये. अन्य तीर्थांची स्तुती करू नये. घातलेले कपडे गंगेत सोडू नयेत, पाण्यावर आघात करू नये तसेच पोहू नये. अंगाला तेल लावून अथवा मळलेल्या अंगानी गंगेच्या पाण्यात प्रवेश करू नये. गंगा किनार्‍यावर वृथा बडबड, खोटारडेपणा करू नये व अपदृष्टीने पाहू नये.
इतकं सगळं अगदी तपशीलात लिहिणार्‍या आपल्या पूर्वजांनी आपलं आताचं वर्तन पाहिलं तर ते काय करतील?
साबण लावून लावून कपडे धुणे,केस कापणे, मृतदेह टाकणे, शहरातील तसेच कारखान्यातील सांडपाणी सोडणे - अशी सर्व तर्‍हेनी चालेलेली ही विटबंना पाहून ते जीवच देतील (गंगेत नव्हे).
आपल्या स्वार्थासाठी धर्माचा वाट्टेल तसा अर्थ लावणारे पंडे आणि डोके नं वापरता, एकही प्रश्न नं विचारता त्यांच्यावर विश्वास ठेवणारे ते भाविक थोर आहेत!
धन्य गंगा धन्य तीचे भक्तं!


संदर्भ:


"श्री गंगाजी का दुरुपयोग":कल्याण मासिक वर्ष ८१, अंक सहा:गीताप्रेस, गोरखपुर

9 comments:

HAREKRISHNAJI said...

I swear. You have written perfect blog on Ganga. The holy Ganga is the most polluted river in the world. Thanks to all of us.

Late Rajiv Gandhi had started project to Clean Ganga . Gangamaiya only knows what has happened to the the project.

What you have said about our places of worship is true. Few years back I had gone to Jagganath Puri and stayed there for a week. 1st day we went to temple and after seeing the condition in and around the temple , I decided not to visit it again. The scene is same everywhere. The main culprits are the middleman between you and the god.

By the way, requesting you to visit http://madhurdhwani.blogspot.com/
devoted to Belabahar a unique instrument, combination of violin and sarangi.

HAREKRISHNAJI said...

ahah beautiful picture of flower in the Title.

Yogesh said...

हिंदूधर्मीयांची जितकी म्हणून "पवित्र" तीर्थक्षेत्रं आहेत ती सगळी अत्यंत गलिच्छ असतात असं माझं वैयक्तिक मत आहे.

A woman from India said...

हरेकृष्णाजी आणि योगेश,
प्रतिक्रियांबाबत धन्यवाद.
धर्माचे दलाल तर भाविक आणि देवाच्यामधे आहेतच. पण ते जर आहेत तर त्यांच्यावर स्वच्छता, पावित्र्य राखायची जबाबदारी मुख्यत्वेकरून टाकायली हवी. लोकांनी अस्वच्छ मंदिरात जाणे बंद करायला हवे. देवस्थानांची उत्पन्ने गडगंज असतात. मनात आणले तर सर्व शक्य आहे. लोकइच्छा असायला हवी.

HAREKRISHNAJI said...

Well, I have stopped visiting those places of worship. I simply cannot accept such nuisance. And about the income, God only Knows.
The sad thing is the donors, when it comes to donations to other matters than religious becomes misers.
Few years back I had written letter to the main trustees of Shrimant Dagdushet Halvai Ganpati in Pune, wherein I had mentioned that you have huge force of volunteers, unlimited funds, still why you cannot manage the crowd in the most disciplined manner during Ganasotsav? They did not bother to reply.

Anand Sarolkar said...

Pavitrya ani swachhata yancha kharach jawalcha sambandh ahe. Ekdum patla!

Magchya varshi Nov madhe me aai baban sobat Tuljapurla gelo hoto. Tithli aswachhta ani gardi baghun kasasach jhalela. Ani tithlya pujaryanni tar Darshan ekdum commercialised karun takla ahe. Jitki jast dakshina titka patkan darshan. Kilas yete he sagla baghun. Mandirat ubha rahnyachi iccha pan hot nahi.

प्रशांत said...

हिंदु धर्माचं सर्वात मोठं दुर्दैव म्हणजे स्वत: "हिंदु" असल्याचा अभिमान बाळगणार्‍यांनी धर्म, अध्यात्म, या शब्दांना नेहमी गृहित धरलं. शंभर वर्षांपूर्वीची कल्पना करू. सकाळी शुचिर्भूत होऊन चूल पेटवून प्रसन्न मनाने पुरण व इतर अन्नपदार्थ शिजवणे, इतर पदार्थ शिजवणे, पळसाच्या पानांना स्वच्छ धुवून पत्रावळी तयार करून वाळवणे, पत्रावळीवर शिजवलेले अन्न वाढून महालक्ष्म्यांना मनापासून नैवेद्य दाखवणे, इत्यादि. आता या तपशीलांमध्ये महत्त्व कशाला आहे? सुचिर्भूत होऊन प्रसन्न मनाने पुरण इ. शिजवणे? पत्रावळी तयार करणे? चूल पेटवणे? नैवेद्य दाखवणे? मनापासून? या प्रश्नांची योग्य उत्तरं ज्याला कळली तोच काळानुसार चालीरीतींत बदल करूनही शास्त्रसंमत जीवन जगू शकेल. अन्यथा केवळ यांत्रिक कवायत म्हणून या गोष्टी केल्या जातील व कालांतराने त्यातील नेमका हेतू न कळल्यामुळे अंध्श्रद्धेत रूपांतर होऊन नंतर बंद पडतील. "स्वच्चता" म्हणजेच "पावित्र्य" हे आजच्या हिंदूंना कळत नाही हे कटु सत्य आहे. त्यामुळेच गंगातीर असो किंवा दुसरं कुठलं तीर्थक्षेत्र असो, धर्माच्या नावाखाली धर्माला वर्ज्य असलेले प्रकार कळत-नकळत भाविक/भोंदु करताना दिसतात. आज राममंदिरासाठी लाखो लोक तयार असूनही त्यंअपैकी रामासाठी वेळ देणारे कदाचित् बोटांवर मुजण्याइतकेच असतील हेही हिंदुधर्माचं दुर्दैव.
असो.
हा श्लोक लोकांसमोर आणल्याबद्दल धन्यवाद.
-प्रशांत

Anonymous said...

धर्म आला की त्याचे चोचले आलेच ओघाओघाने! मानवता हा एकच मूलधर्म अखिल विश्वात नांदत असता तर काय बहार आली असती!?

Unknown said...

dharmaalaa jar dharmaa saarkhe Thevaiche aasel tar tyaala raajkaaraNaa paasun door Thevailaa havey. pragat raashtraanmaddhye aaNi Bhaarataa madhe ha motTha farak. Japan, US maddhye suddha dharma ha khup paaLala jaato. hya deshaanmaddhye church aaNi monastries kaDhe paisaa suddha bharpur. parantu, hya paishacha upayog ha kharokhar chaaglya kamaasaaThi hoto. jithe paisaa aaNi raajkaaraNachaa vaavar asel, tethe swacchata, dharmaachaa aadar, samaaj kalyaaN hya goshtinkade hamkhaas durlakshya hoNaar.