Monday, July 02, 2007

पडद्यामागचे कलाकार

हरेकृष्णाजींनी गणेश मुर्ती बनवणार्‍या कारागीरांना तुमच्या समोर आणलं आहे.
त्यावरून मला काही दिवसांपूर्वी घडलेला एक प्रसंग आठवला. इथे जवळच शहिद परवेज आणि शशांक यांच्या जुगलबंदीचा कार्यक्रम होता. कार्यक्रम छान झाला. शहिदांची काळी भोर सतार फार देखणी दिसत होती. म्हणून कार्यक्रम संपल्यावर आवर्जुन त्यांना त्याविषयी विचारले. त्यांना आवडतो म्हणून सतारीला काळा रंग देऊन घेतल्याचे त्यांनी सांगितले. तोपर्यंत त्यांनी सतार गवसणीत घातल्यामुळे बनवणार्‍याचे नाव वाचता आले नाही. म्हणून सहजच सतार कोणी बनवली? हा प्रश्न विचारला. तेव्हा मात्रं त्यांनी फारच उडवा उडवीची उत्तरे दिली. "मी स्वतः मला पाहिजे तशी बनवून घेतली आहे. सतारीपेक्षा वाजवणारा महत्वाचा आहे. तुम्हाला काय वाटतं की तुम्ही माझ्यासारखी सतार घेतली म्हणजे तुम्हाला वाजवता येईल?" वगैरे वगैरे असंबद्ध उद्गार काढले.
वाद्ये बनवणे ही एक कला आहे. सतारीसारखे नाजूक वाद्य बनवायला तर खासच कसब लागते. दर्जेदार,कसलेले लाकूड मिळवणे, योग्य आकाराचा भोपळा मिळवणे, वाद्याची जुळवाजुळव करणे, नक्षिकाम करणे, थाट बसवणे, जवारीचे काम करणे. ही सगळी कामे अत्यंत गुंतागुंतीची आहेत. सुमार दर्जाच्या सतारी बनवणारे अनेक कारागीर आहेत. पण उत्कृष्ट दर्जाच्या सतारी बनवणारे अगदी हाताच्या बोटावर मोजण्यासारखे आहेत. संगीतकारांच्या असतात तशाच त्यांच्याही पिढ्यानपिढ्या या व्यवसायात गुंतलेल्या आहेत. पडद्यामागच्या (अक्षरशः - की तारांमागच्या?) या कलाकारांना जराही श्रेय नं देता उलट खिजगणतीही नं करण हे मला फारच चुकीचे वाटते.
दिल्ली येथील रिकीराम घराण्याने रविशंकरांच्या घराण्यासाठी सतारी बनवल्या आहेत. आता रिकीराम यांचे सुपुत्रं श्री संजय रिकीराम ही परंपरा चालवतात. अनुष्का यांच्या सतारीही तेच बनवतात. माझी सतार त्यांच्याकडूनच घेतली आहे.
संजय रिकीरामांपर्यंत पोचण्याच्या आधी मला अनेक लोकांनी चुना लावला आहे. अमेरिकेतल्या पहिल्या गुरूंनी तर भरमसाठ (चार आकडी) डॉलर घेऊन अतिशय सुमार सतार मला विकली. सतार पहिल्यांदा घरी आली आणि उघडली तेव्हा तर मला रडूच कोसळायचे बाकी होते. कारण जिथे कारागीराचे नाव लिहिलेले असते ती पट्टीच गायब होती. इतके पैसे दिले आहेत तर चांगल्या नावाजलेल्या कारागीराचे नाव तिथे बघण्याची माझी अपेक्षा पार धुळीला मिळाली. ते माझे गुरू आहेत याचा जराही मुलाहिजा नं बाळगता सतार त्यांना साभार परत केली. स्वतः कलाकार असून इतका संकुचित दृष्टिकोन कसा काय असु शकतो?
शहिद परवेजांसारख्या कलाकारानी इतर कलाकारांचा आदर करावा. भारताबाहेर राहून ही कला पुढे नेऊ पहाणार्‍या माझ्यासारख्या नवशिक्या, हौशी विद्यार्थांना जमेल तितकी माहिती देऊन मार्गदर्शन करावे ही विनंती.
7 comments:

ATOM said...

The moment humnans accquier some thing, they fear to loose it.
The loss might be by virtue of Cannibals around or simple ignorance.
Just as you climb high up the mountain, in order to survive, you have to get accliamtized.
You have a seen the Example decsribed here,remeber to follow it when needed.
Guarding secrets is the key to retain altitude gained . At present, you have climbed just Maltekdi so , you wonder and pained by getting hurt with why the mountaineer up above is throwing loose stones over you.
He takes you as his competitor, you don't consider him so.
It is his bread and butter, For you, it's just a hobby.
Think what should one do if ;how so ever incorrectly and instinctivly; suspects that some body is trying to snatch his bread n butter.?
It is a natural balance of secrets that protects and perpetuates across generations and society.
Had the sitar manufactorers of Delhi told how they really do , they would be pulling rickshaws in Chandani Chowk.
Had the Greatest Sponsorer or Admirer of the Artist tells him his secrets of accquiring wealth, the Artist might get motivated to kill him!
Sabase Bada Ruppiayya !
Understand the beauty of your experiance
Thanks for sharing.

HAREKRISHNAJI said...

Many thanks for the mention of my post. I wish to write on many more artists.

Ashwinis-creations said...

जवारीचे काम म्हणजे काय? किती गोष्टी आपल्याला माहितीच नसतात नाही?

तुला बरंच संशोधन आणि माहिती संकलन करावं लागलं असं दिसतं आहे! पण तरीही तुझा मुद्दा पटण्यासारखा आहे. मला नाही वाटत ते तुला त्यांची प्रतिस्पर्धी म्हणून माहिती द्यायला राजी नव्हते...!कदाचित 'कलाकाराचा ईगो असेल.. किंवा त्यांना त्यांचं महत्व ठसवायचं असेल...वाद्यापेक्षा.........

अश्विनी

HAREKRISHNAJI said...

खर म्हणजे कलावंतांनी खुपच नम्र असायला हवे. माझ्या सारखा अनाडी माणसाशी अनेक कलावंत खुप चांगले वागले आहेत. विषेशता: कै. अरुण डहाणुकर, कै. सी.आर.व्यास, उल्हास कशाळ्कर, एल. सुब्रम्हणयम, शमीम अहंमद, जे मी आयुष्यभर विसरु शकत नाही. कार्यक्रम संपल्यावर मी कलावंताना आवर्जुन भेटतो व त्यांचे सुरेख वादन, गायन ऐकवल्याबद्द्ल आभार मानतो व ते आवडल्याचे सांगतो.
खर म्हणजे शहिद परवेजना सतार कोणाकडे बनवुन घेतली आहे हे लपवण्याचे कारण नव्हते, त्यात तुम्हाला काय वाटतं की तुम्ही माझ्यासारखी सतार घेतली म्हणजे तुम्हाला वाजवता येईल?" वगैरे वगैरे असंबद्ध उद्गार काढ्ने म्हणजे अतीच झाले.
पण शहिद परवेज खुप छान वाजवतात. मी त्यांचे वादन ऐकले आहे. नयन घोष ही सुरेख वाजवतात.

शमीम अहंमद ची सतार आपण ऐकली आहे का ?
बेलाबहार कसे बनवतात हे मी लिहीले आहे. नविनला विचारुन आपल्या प्रश्नाची उत्तरे लिहीन

sangeetagod said...

Atom, हरेकृष्णाजी व अश्विनी,
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
हरेकृष्णाजी, तुमच्या मताशी मी सहमत आहे.
शमीम अहमद यांची सतार ऐकली आहे. पण नयन घोष यांना ऐकायची संधी नाही मिळालेली अद्याप.

TheKing said...

My "gyaan" on Satar... rather I will avoid the topic :-)

But watching Ravishankar playing his Satar "befaam" in the Bharatbala production ad as a kid made me so crazy about this instrument that I was dying to learn to play satar.

Good post and thought!

Anonymous said...

आपल्य पेक्षा वेगळा विचार करणारे लोक असतात.त्यांच्या पासून सावध रहाणे हेच शहाणपण आहे. मला वाटते कि हा किस्सा तुमच्या ओळखीच्या मानस शास्त्रा तील जाणकार व्य्क्तीला रेफ़र करायलाच हवा.