Sunday, July 15, 2007

कथा एका - नव्हे दोन लग्नांची

तो: आपल्याला एका लग्नाला जायचे आहे.
ती: कुणाच्या?
तो: जेनी आणि विनोदच्या
ती: आपण मुलाकड्चे का मुलीकडचे?
तो: जेनीची आणि माझी जुनी ओळख आहे. खरं म्हणजे जेनीच्या पहिल्या लग्नालाही गेलो होतो मी. फोटोही काढले होते तेव्हा.
ती: हं....लग्नं अमेरिकन पद्धतीचे आहे की भारतिय? काय घालायचे ते ठरवावे लागेल त्याप्रमाणे.
तो: इथले लग्नं ख्रिश्चनपद्धतीचे आहे. त्यानंतर ते भारतात जाऊन वैदिक विधी करणार आहेत.
ती: अरे वा, छान.
तो: मुलाच्या घरच्यांनी दोघांची पत्रिका जुळवून बघितली आहे. त्यानुसार इथल्या लग्नाचा मुहुर्त काढला आहे म्हणे!
ती: अय्या!! मुहुर्त काढून लावलेले हे पहिलेच ख्रिश्चन लग्न असावे. या ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार असणार आहोत!
ती: अरे पण त्या जेनीच्या पहिल्या लग्नाचे काय झाले म्हंटलंस?
तो: काय झालं माहिती नाही. खरं म्हणजे जेनीपेक्षा ल्युसीचा स्वभाव खूप छान होता
ती: आता ही ल्युसी कोण आली मधेच आणि जेनीचा आधीचा नवरा कोण?
तो: जेनीचे पहिले लग्नं ल्युसीशी झाले होते - हे बघ तुला फोटो दाखवतो त्यांचे.... पण तुझा चेहेरा असा गोरामोरा का झाला आहे? बरी आहेस ना?
ती: नाही, काही नाही - पाणी प्यायलं की जरा बरं वाटेल... अं अं ...म्ह म्ह म्हणजे जेरी साईनफिल्ड म्हणतो त्याप्रमाणे "नॉट दॅट देअर इज एनिथिंग रॉंग विथ इट."

4 comments:

Nandan said...

:D

HAREKRISHNAJI said...

याला जिवन ऐसे नाव ! मध्यंतरी Times of India मधे एक चांगला लेख वाचला. अमेरिकन बद्द्ल असावा. लेख आता तसा आठवत नाही पण तो लेख "माझ्या दोन आई " बद्दल होता.

A woman from India said...

नंदन आणि हरेकृष्णाजी,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
काही शास्त्रज्ञांच्या मते सर्व प्राणी,पक्ष्यांमधे ३ का किती तरी टक्के प्रमाण आढळते, आपण त्याला अपवाद नाही.

TheKing said...

hehehee, good 1!