Wednesday, April 04, 2007

मिखाइल, पं हरिप्रसाद आणि कौस्तुभची प्रतिक्रिया

काल ऑफिसमधे गेल्या गेल्या मिखाइलची इमेल आलेली बघितली. बर्‍याच दिवसानी मिखाइलकडून काहीतरी आल्याचे पाहून लगेच उघडून बघितली. इमेलमधे पं हरिप्रसाद चौरासियांची मिश्रं पिलू रागाची MP3 होती.
मिखाइलच्याच शब्दात सांगायचं तर -
If don't have this CD, try just this file. It is absolutely amasing what he's building. ....
As for the file - I incidentally inserted this CD into my stereo this Sun, and apparently it was a good time for it. Listening how he's developing the theme, it is something that only in music could happen. And not always it works.
संध्याकाळी काम संपल्यावर ती MP3 ऐकायला घेतली.
मिखाइल आणि मी दोन तीन वर्षांपूर्वी एकाच प्रोजेक्टवर काम करत होतो. मोडकं तोडकं इंग्लिश बोलणारा मिखाइल कामात एकदम गड्डा आहे (विदर्भात हा शब्द एखाद्या विषयाचा अर्क कोळून प्यायलेल्या माणसासाठी वापरतात).विशेष काही नं बोलता खाली मान घालून आपलं काम करणारा. पण हा माणूस पाश्चिमात्य(बरोक,क्लासिकल,रशियन इ.इ.) संगीताचाही गड्डा आहे हे हळूहळू कळले. त्यानंतर आमची या विषयावर बरीच देवाण-घेवाण सुरू झाली. नेमके माझे त्यावेळचे गुरू पं हबिबखान शार्लेटमधे कार्यक्रम देणार होते. त्या कार्यक्रमाला मिखाइल आला. हिंदुस्थानी संगीताचा आणि त्याचा प्रत्यक्ष परिचय व्हायला तेव्हा सुरूवात झाली. त्या वेळी सुरवातीचा तबल्याशिवाय केलेला विस्तार - आलाप, जोड इ. त्याच्या अजिबात पचनी पडले नाही. पण गत, ताना इ. भाग मात्रं त्यानी अगदी मनसोक्तं एन्जॉय केला. त्याचबरोबर माझ्या गुरूजींचे वादन हे ब्रोकन हार्मोनीचे उदाहरण आहे, ती ब्रोकन हार्मोनी कानाला गोड वाटत नसली तरी गुरुजींची तयारी आणि कसब वाखाणण्यासारखे आहे हे ही सांगितले.
त्याचा एक प्रश्नं म्हणजे तुझे गुरुजी इतक्या मोठ्या रचना पाठ कशा करतात? त्यावेळी मी त्याला हिंदुस्थानी संगीतातील इम्प्रोव्हायझेनबद्दल माहिती सांगितली. कार्यक्रमात जे काही वाजवलं गेलं ते कलाकाराने तिथल्या तिथे ऐन वेळेवर ठरवलं हे त्याला त्यावेळी फारसं पटलं नाही किंवा ती कल्पनाही फारशी आवडली नाही. पण तो स्वतःहून बराच अभ्यास करू लागला.
त्यानंतर काही दिवसांनी आम्ही शार्लेटच्या मंडळींनी एक कार्यक्रम दिला. तेव्हा त्यानी माझे सतारवादन पहिल्यांदा ऐकले. त्या कार्यक्रमाचे परिक्षण करण्याची जबाबदारी मी त्याला दिली होती. त्याची मुख्य प्रतिक्रिया ही होती - "सगळे कलाकार हौशी असले तरी त्यांचे प्रयत्नं खूप जेन्युइन होते. त्यामुळे कार्यक्रम फार श्रवणिय झाला" विशेष म्हणजे भिमसेनजींच्या शैलीने गाणार्‍या मिलींद दिक्षीतांचे गाणे त्याला विशेष भावले.
त्यानंतर मी मिखाइलला भिमसेनजींसहित इतर कलाकारांच्या सिडीज ऐकायला दिल्या. भिमसेनजींचे गाणे त्याला फारसे कळले नाही, पण चौरासियांच्या मात्र तो प्रेमात पडला.
त्यानंतर माझे प्रोजेक्ट बदलले आणि आमचा संपर्क कमी झाला. आमच्या लग्नात मात्रं आवर्जून आला आणि भेट म्हणून अर्थातच पंडितजींच्या सिडीजचा एक संच दिला.
काही महिन्यांपूर्वी पूर्बायनच्या कार्यक्रमात पुन्हा भेट झाली. त्यावेळी तो म्हणाला की आता त्याला आलाप ह्या प्रकाराची गोडी लागली आहे, कारण ते खरं अगदी हृदयापासून निघालेलं संगीत असतं, बाकी सगळा तंत्र आणि तयारीचा भाग असतो. गेल्या वर्ष-दीड वर्षात त्याने केलेला हा प्रवास बघून मी थक्कं झाले होते. तो माझ्याकडून इतकं शिकला होता, पण मी मात्रं त्याच्याकडून विशेष शिकले नाही ही खंत जाणवली.
असो, फ्लॅशबॅक संपवून वर्तमानकाळात येते. मिश्रं पिलू ऐकता ऐकता मराठी ब्लॉग्ज वाचत होते. आणि योगायोगाने प्रियाच्या ब्लॉगवर कौस्तुभची ही प्रतिक्रिया वाचायला मिळाली:
"चारू आणि माझ्या संगीतावर जेव्हा गप्पा होतात तेव्हा बऱ्याचदा हाच निष्कर्ष निघतो की संगीत हे जितकं जास्त सहजपणे आल्यासारखं वाटतं, तितकं ते जास्त भिडतं.
शास्त्रीय संगीताच्या बाबतीत ही गोष्ट जास्त जाणवते. म्हणजे राग, आलाप यातल्या कठिणपणामुळेच बऱ्याचदा आपण त्याचं कौतुक करतो. अर्थात शास्त्रीय संगीत हा फार वरचा प्रकार आहे, पण त्यात एकप्रकारचा सहजपणा जाणवत नाही. माझं अगदी वैयक्तिक मत आहे हे, त्यामुळे गैरसमज नको. "

हममम....
मी शक्यतो कुठलाही पूर्वग्रह नं ठेवता वेगवेगळ्या प्रकारचं संगीत ऐकायचा प्रयत्नं करते - अगदी हिपहॉपही ऐकू शकते, पण हिंदुस्थानी संगीतात श्रोत्यांचा soul elevate करायचं , बसल्या जागी त्यांना एका दुसर्‍याच दुनियेत नेण्याचं जे सामर्थ्य आहे ते इतर ठिकाणी कमी अनुभवायला मिळालं आहे.
संगीत हा एक वैयक्तिक आवडीच प्रश्नं आहे. हलक्या फुलक्या चालींमुळे सहजपणा वाटू शकतो, पण प्रत्यक्षात तितक्या सहजपणे गाणं बाहेर पडलं असेलच का? आता हिंदुस्थानी (मला कर्नाटक संगीतातलं फारसं कळत नाही, म्हणून हा शब्दं वापरते आहे.) संगीतातील उस्फूर्तता बघा:
मुख्य कलाकार आणि त्याचे सहकारी बरेचदा पहिल्यांदा स्टेजवरच भेटतात.
बरेच कसलेले कलाकार तानपूरा जसा लागेल त्यावरून कोणता राग गायचा ते ठरवतात. तसेच षड्ज जरा खाली वर करण्याची मुभा त्यांना असते. अती कसलेले कलाकार मधेच षड्ज बदलू ही शकतात. श्रोत्यांचा प्रतिसाद आणि साथ-संगत यांनी प्रेरित होऊन भिन्नं कसब दाखवू शकतात, सवाल-जवाब करू शकतात. एक छंद घेऊन त्यावर भर कार्यक्रामात नवीन ताना बनवू शकतात. नुकताच संजीव अभ्यंकरांचा कार्यक्रम ऐकण्याचा योग आला. त्यांनी देस अंगाचा जयजयवंती गाऊन मग पुन्हा कोमल गंधाराचा उपयोग करून एकदम मूड कसा बदलतो त्याचं प्रात्यक्षिकच दिलं. हे सगळे nuances जाणून घेण्याची गरज नाही, पण त्यातही एक प्रकारचं आव्हान आहे, गंमत आहे.
मनाची कवाडेच बंद केलीत तर "माझी झोपडीच बरी" असे वाटेल. या उलट माझी झोपडी तर चांगली आहेच पण बाजूच्या या दाराआड काय दडलं आहे? ही उत्सुकता ठेवली तर कदाचित एखाद्या महालाची दारेही उघडली जाऊ शकतात नाही का?

13 comments:

HAREKRISHNAJI said...

Could you please forward the MP3file to me.

harekrishnaji@yahoo.com.

Do you have any other MP3files on Hindustani Classical sangeet ?

do you know you can listen to hindustani classical on line of ITS's site.

कोहम said...

very appropriate....ek vel ashi hoti ki shastriya sangeet mhantalyavar naak muradaycha tevadha me baki thevaycho.....ata paan halat nahi tychyashivay.....we should keep ourselves open to everything...

HAREKRISHNAJI said...

Well said about Mikhail and Hindustani Classical Sangeet.

Nice to know that you play Sitar. Have you heard Ustad Shamim Ahmed?

I like Pandit Ronu Muzumdar's Basuri. I am one of the most misfornute person who does not understand ABCD but still I enjoys Performing arts. But again beacuse of no reason I miss lots of conserts.

Recently Shri Sanjeev Abhankar performed at Ravindra Natya Madir. Moring Ragas. I missed that also. I haven't heard him live.

What is शार्लेट ? Are u based in Mumbai ? If yes could you please invite me for the programs ?

A woman from India said...

हरेकृष्णाजी,
MP3 पाठवली आहे.
मी अमेरिकेतल्या नॉर्थ कॆरोलिना राज्यात आहे. शार्लेट आमच्या जवळचे एक शहर आहे.
मी शमिम अहमदांची सतार ऐकली आहे. गंमत म्हणजे तुम्ही सांगितलेल्या दोन्ही कलाकरांचा इथे कार्यक्रम आहे लवकरच.
तुम्ही कळवलेली ITC साईट छान आहे.
माझ्याकडे असायला हवे तितके MP3 collection नाही.

Kaustubh said...

ho. Priya nech mala ya lekhachi link dili kaal. lekh vachun zala aaNi aavadalahi. :)

mee jara gadbadit aahe 2 divas. mala jara savistar pratikriya dyayala aavadel. ekada mokaLa zalo kee deinach.

Sandeep Godbole said...

Music is mostly sprouted in minds in younger age. You have special emotional attachment for the Music you have enjoyed up to the age of 25. Later in life , you may "Breed" variety of music
There are people
who Hate Music.
There are people who conseously controll their affair with music because it could harm their normal life .There are people who get drawned in Music.
Ther are people who take more pleasure in sharing the music rather than enjoying for themselves.
There are people who eventually become Mafia in Music !

A woman from India said...

Koham,
I agree with you. We should be open. For long time, I kept myself confined to Hindustani. Now I appriciate many other forms of music. Some times I think I should take a course to be able to better understand Western Music.
Kaustubh,
Can't wait to read your comment.
Atom,
You are pointing to commecialization of Art - that is a whole new topic by itself.

HAREKRISHNAJI said...

thanx for the file. I am in Puhe enjoying holidays, when I go back to Mumbai I will download it

Kaustubh said...

मी माझी सविस्तर प्रतिक्रिया माझ्याच blog वर देतोय.

http://kaustubh-nimkar.blogspot.com/2007/04/blog-post.html

तुमच्या प्रतिक्रियेची आतुरतेने वाट पाहतोय. :)

कौस्तुभ.

प्रशांत said...

तुमचे विचार पटतात. मी स्वत: violinist आहे व पं प्रभाकर घारे (नाग्पुर) व उस्ताद फ़ैयाज़ हुसेन खाँ यांचा शिष्य आहे. मी जरी हिंदुस्थानी व्हायोलिनवादन करीत असलो, तरी खाँसाहेबाँच्या कृपेनं हिंदी गाण्यांच्या एक-दोन कार्यक्रमांत साथ करण्याची संधी मिळाली. त्या गाण्यांची तयारी करताना western musicमधील काही तंत्रांचा अभ्यास करण्याचा योग आला. काही गाणी व त्यांतील music pieces ऐकायला सोपी वाटतात पण वाजवायला तेवढीच कठीण असतात याचा प्रत्यक्ष अनुभव आला. अभिजात हिंदुस्थानी संगीतात एक वेगळाच सुगंध आहे यात शंका नाही. पण इतर प्रकारांतही खूप शिकण्यासारखं आहे. violin हे मुळात पाश्चात्य वाद्य असल्यामुळे व्हायोलिन वादनात सर्व प्रकारच्या तंत्रांना बराच वाव आहे, व त्या तंत्रांचा भारतीय संगीतातही उपयोग होतोच असा मला विश्वास आहे.

HAREKRISHNAJI said...

http://harekrishnaji.blogspot.com/2007/04/blog-post_10.html - मुकुल शिवपुत्र - एक झलक.

आपल्याला नक्किच आवडेल.

Kaustubh said...

Beatles चा Guitarist,John Lennon चा मित्र George Harrison ला आपल्याकडच्या शास्त्रीय संगीताची आवड होती. पंडित रवी शंकर यांचा तो चांगला मित्र होता आणि त्यांच्याकडून त्याने सतारही शिकली.

Beatles च्या बऱ्याचश्या गाण्यांवर आपल्याकडच्या संगीताचा प्रभाव आहे. पाश्चिमात्य लोकांना सतारची ओळख खरतरं Harrison मुळेच झाली.

तुम्हाला ही गोष्ट माहित असेलच कदाचित. तुमच्याबरोबर Share करावीशी वाटली. :)

Kaustubh said...

थोडा busy होतो. तुम्ही दिलेली लिंक आज पाहिली. शांतपणे वाचलं. अर्थातच आवडलं. अधूनमधून असं काहीतरी देत जा वाचायला. नक्कीच आवडेल मला. :)