Thursday, March 29, 2007

झगडा तुझा उमलण्याचा, फुलण्याचा

तुझ्या उमलण्याच्या मनसुब्यांबद्दल मी लिहिलं मात्रं आणि माझीच नजर लागली म्हणून की काय,अचानक पुन्हा थंडी पडली. तिकडे न्यूयॉर्कमधे प्रचंड बर्फ पडलं म्हणून. आधीच ही थंडी तुझ्या त्या कोषगर्भित अवस्थेला सोसवत नव्हती. त्यात हवामानाची ही बदफैली की आज गरम तर उद्या थंड! तुझ्याकडे पाहून जीव थोडा थोडा होई. एक-दीड आठवडा असाच गेल्यानंतर एका सकाळी तुझ्या कळ्या दिमाखाने बाहेर पडू लागल्या. असंख्या कळ्यांचा तो मोहोर मी पाहिला, पण आभाळात पाहून जीव कासावीस झाला. एक दोन कळ्या उमलल्या असतील नसतील, वरून बरसात सुरू झाली -तीही थिजवणारी. हा असा कसा रे पाऊस? नको तेव्हा येतो आणि हवा तेव्हा नेमका येत नाही? आता या गारव्यानी तुझ्या त्या नाजूक कळ्या फुलण्याआधीच गळून पडतात की काय अशी भिती मला वाटायला लागली. तू जिथल्या तिथेच गोठलास - पण तग धरलास! थोडाथोडका नाही, चांगला आठवडाभर! पाऊस गेला, वसंताच्या उन्हानी पुन्हा तुला तुझं राज्य बहाल केलं आणि तू उमललास:रात्रीच्या वेळी तुझ्या चांदण्या अश्या चमकल्या:तुझे इतर दोस्तं:

सुगंधी हायासिंथ:केरिया जपानिका (जपानी गुलाब)

फ्लॉवरिंग एलमॉंड

आता उशीरा उमललास तरी तुझी अधीरता संपत नाही - जणू काही तुला आमच्या आयटीच्या प्रोजेक्टसारखी डेड लाईनच दिलेली आहे. एक आठवडा जेमतेम ते छत्रं चामर धरलंस डोक्यावर, नी लगेच तुझी पानं बाहेर यायला लागलीत. वार्‍याबरोबर पाकळ्या उधळल्यास - खच पाडलास अंगणात. पण तुझी हिरवाईसुद्धा देखणी आहे हं - मी काही तक्रार करत नाहीये - तू फुललास यातच मला सगळं काही मिळालं! तुझी मायेची सोबत अशीच आम्हाला मिळू दे....

7 comments:

Ashwinis-creations said...

Lovely Photos.
Your expression is so genuine.
We used to call these "Icecream Flowers"...Are these the same?
Wish you happy Blossmoms,
Ashwini

कोहम said...

chaan.....khara tar kahich nahi lihilay pan je lihilay te vachun far chaan vatala....jasa apan vafalaela chaha gheun basava garden madhe ani samorcha rop baghun manat vichar yavet....kunitari apali tandri todeparyanta tasach...good work .

sangeetagod said...

Thanks Ashwini and Koham for your comments

TheKing said...

Great bahar!

So when should we expect the invite for 'party-under-cherry-blossom'?

I know ha shuddha bhochakpana ahe, but anything for that pretty blossom and copmanions! :-)

HAREKRISHNAJI said...

वसंत सुरेख फुलला आहे,

Thaks for the valuable suggesations for my blog.

How do I add tracking code to my blog from google analytics ?

HAREKRISHNAJI said...

Thanx. I have copied down contents in Edit HTML.

Binge Cafe said...

beautiful tree...