खेळानी शरीराला व्यायाम मिळतो आणि मनाला स्फूर्ती येते (म्हणे)....
(नॉट सो)जंटलमन्स गेमचा वर्ल्डकप नावाचा पूर्व नियोजित सट्टा सद्ध्या सुरू आहे. तो पाहून किंवा खेळून जर तुम्हाला अती रक्तदाब,मानसिक दडपण,छातीत दुखणे,डिप्रेशन,पोटदुखी,उलट्या अशी लक्षणे दिसू लागलीत तर ताबडतोब डॉक्टरकडे जा. पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे व्यायाम करण्याने रोगाची तीव्रता कमी होईल - उदा.बॅड्मिंटन,टेबलटेनिस,फूटबॉल,कबड्डी,खो-खो,धावणे,चालणे,स्केटिंग करणे,पर्वतारोहण करणे ई.
साधन सामुग्रीच्या अभावी जर वरील खेळ खेळणे जमत नसेल तर घरच्या घरी बसून अष्टं चंग पे खेळावे. या खेळाची माहिती मी माझ्या ब्लॉगवर आधीच दिली आहे - http://kasakaay.blogspot.com/2007/01/blog-post_28.html
2 comments:
हा हा हा! वर्ल्ड कप मधल्या भारताच्या मॅचेस म्हणजे नुसता व्याप आहे डोक्याला. पण बाकी Aus, SA, SL आणि NZ मस्त फॉर्म मधे आहेत, त्यांच्या मॅचेस बघणीय होतील.
संगीता
तुला नक्की काय म्हणायचयं?
आपली टीम इंडिया किती बरं श्रेष्ठ आहे! इतके पैलू पाडलेले हिरे त्यात असताना तुला असा निराशाजनक विचार शोभतो का?
आता हरलो आपण बांगलादेश बरोबर....किंवा अगदी काल श्रीलंके सोबतही.........केला देशवासीयांच्या स्वप्नांचा चक्काचूर....उडविले नुसते पैसे.....खर्चून टाकली आपली इभ्रत आणि पत..पण म्हणून सौरव दादा, भज्जि, इर्फ़ान यांना इतकं घालून पाडून बोलायला नको. नसतो कुणि फ़ॉर्मात...पण माया सुटली आहे का कुणाला? मग ते तरी बापडे अपवाद कसा ठरावेत?
आता चपलांचे हार तरी किती तयार करावेत असा विचार कर करून माझे डोके शिणून गेले आहे.
अश्विनी.
Post a Comment