Sunday, March 18, 2007

रूमी जयंती

प्रख्यात सूफी संत रूमींची ८०० वे जयंती काल होती. त्या निमित्तानी कारबरोमधे काल एक छोटासा कार्यक्रम होता. एरवी धार्मिक कार्यक्रमापासून आम्ही जरा दूरच रहात असतो (आता मी वैदर्भिय असल्याचे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात येऊन राहिलेच असेल.) पण रूमीच्या कवितांमधील प्रेम आणि विश्वबंधुत्वाचा संदेश मात्र आम्हाला नेहेमीच आकर्षित करतो. हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही प्रभावांमुळे सुफी परंपरा समृद्ध झाली आहे.
इथली स्थानिक सुफी मंडळी आता आमच्या परिचयाची झाली आहे. त्यांनीच हा छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता. काव्यगायन, संगीत, आणि घुमणार्‍या दरवेशींचे झिकर असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. बहुतेक कविता पर्शियन, अरेबीक भाषेत होत्या. त्याचे भाषांतरही सांगण्यात येत होते. पण शेवटी शेवटी रात्रं जशी सूरात एकरूप झाली तशी भाषेची आडकाठीही जाणवेनाशी झाली.
एखाद्‍या कवीची आठशेवी जयंती साता सामुद्रापलिकडे साजरी व्हावी यातच या कवीची थोरवी दिसून येते. पुस्तकांचा खप आणि अनुवाद याच्या आकड्यांमाणे रूमी अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय कवी आहे. त्याशिवाय रूमी "मूळचा आमच्याच देशातला" असे छातीठोकपणे सांगणारे लोक इराण, इराक (विशेषतः कर्दिस्थान),अफगाणिस्थान,टर्की आणि ताजिकीस्थान मधे तुम्हाला भेटतील!
भारतात सूफी परंपरा अस्तित्वात असली तरी अशा प्रकारचे झिकर मी कधी अनुभवले नव्हते. मागे एका लेखामधे आम्ही अशाच एका झिकरमधे गेल्याचे मी लिहिले होते. कालच्या कार्यक्रमात नवर्‍याने काही व्हिडिओ घेतल्या आहेत. त्यावरून तुम्हाला झिकरची साधारण कल्पना येईल.

प्रमुख दरवेशींचे झिकर:सामुहिक झिकर:


रूमीच्या कवितांचे मराठीत भाषांतर झाले आहे की नाही ते मला माहित नाही. कुणाला माहिती असल्यास जरूर प्रतिसाद द्या.
तूर्त काही इंग्रजी भाषांतर:
Cradle My Heart
Last night,
I was lying on the rooftop,
thinking of you.
I saw a special Star,
and summoned her to take you a message.

I prostrated myself to the Star
and asked her to take my prostration
to that Sun of Tabriz.
So that with his light, he can turn
my dark stones into gold.

I opened my chest and showed her my scars,
I told her to bring me news
of my bloodthirsty Lover.
As I waited,
I paced back and forth,
until the child of my heart became quiet.
The child slept, as if I were rocking his cradle.
Oh Beloved, give milk to the infant of the heart,
and don't hold us from our turning.

You have cared for hundreds,
don't let it stop with me now.
At the end, the town of unity is the place for the heart.
Why do you keep this bewildered heart
in the town of dissolution?
I have gone speechless, but to rid myself
of this dry mood,
oh Saaqhi, pass the narcissus of the wine.

From: 'Hush Don't Say Anything to God: Passionate Poems of Rumi' Translated by Sharam Shiva

2 comments:

HAREKRISHNAJI said...

गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना नवे वर्ष सुखसमृद्धी व भरभराटीचे जावो.

Ashwinis-creations said...

संगीता

कविता एव्ह्ढी भावली नाही. कदाचित अनुवादित असल्याने असेल. मूळ भाव पोहोचत नाही नं.
पण तुझे गोल गोल झिंगणारे झिकर छान आहेत. नावही किती समर्पक! जणू मराठीच.
साकी, मदिरा आणि परवाना हे मात्र परवलीचे शब्द आहेत..सर्वच इराणी, सूफ़ी, मुस्लिम काव्यांत .. नाही?
मदिरेचा चषक ओठाला लावल्याखेरिज 'तिच्या' विरहाची आर्तता कशी आकळणार बरं?
आणि जरी ती समोर असली तर मग...तिच्या डोळ्यांतून हिंदकळणारी मदिरा पुन्हा बेहोशी च्याच वाटेवर चालविणार........एकूणात काय...
सारासार विवेकाचा , तौलनिक वगैरे दृष्टीचा, तत्वांचा आणि भवितव्याचा.......सगळाच एकूण आनंद.....!!!

गंमत करते आहे बरं...नाहीतर तुझ्या रुमि चाहत्यांना राग येइल.

लिहीत रहा.

अश्विनी