फुलफ्रेम भाग २ - Nomadak Tx
चलापार्टा (इंग्रजी स्पेलिंग Txalaparta) नावाचे एक ताल वाद्यं आहे. दोघांनी मिळून वाजवायचे असते. हजारो वर्षापूर्वी पूर्व युरोपातील बास्क कंट्रीतील आदिवासी लोक दूरसंदेशासाठी या वाद्याचा उपयोग करायचे. मधल्या शतकात चलापार्टा जवळ जवळ अस्तंगत झाले होते. १९५० साली बास्क कंट्रीमधे केवळ २ चलापार्टा उरले होते. त्यानंतर कोणीतरी त्याचे पुनरूज्जीवन करायचे ठरवले. आज चलापार्टा वाजवणारे बरेच वादक तयार झाले आहेत. हरकाईट्झ आणि इगोर हे पंचविशीतले दोन हुन्नरी तरूण त्यातलेच. मूळ्चे आदिवासी वाद्य असल्याने खर्याखुर्या आदिवासी लोकसंगीतात याचा उपयोग करावा आणि काय होते ते बघावे असा विचार करून हे दोघे तरूण घराबाहेर पडले - आदिवासींच्या शोधात.
पहिला मुक्काम भारत. जिथे जमेल तिथे मैफिल जमवायची. मुंबईतील काही शास्त्रिय संगीत वाजवणार्या कलाकारांसमवेत वाजवण्याचा प्रयोग केला. एक कार्यक्रमही दिला.
नंतर गुजरातमधील एक आदिवासी खेडे तिथल्या आदिवासी संगीतात चलापार्टा अगदी चपखल बसते. पारंपारिक प्रथेप्रमाणे हे वाद्य आजूबाजूच्या परिसरात सापडणार्या साधनांपासून बनवायचे असते. गुजराथी खेड्यासाठी सागाच्या लाकडापासून चलापार्टा बनवण्यात आला होता.
दुसरा मुक्काम आर्क्टिक सर्कल. स्कॅंडेनेव्हियातील सामी जमात ही युरोपमधील मूळ आदिवासी जमात आहे असे मानले जाते. बहुतेक सामी आता आधुनिक झाले असले तरी काही लोक रेनडियर पालन करून उदर निर्वाह करताहेत. हरकाईट्झ आणि इगोर बर्फातून मार्ग काढत सामींना भेटायला जातात. जरा स्थिरस्थावर होतात, अंघोळी बिंघोळी आटपून लगेच कामाला लागतात.
आधी चलापार्टा बनवायला पाहिजे नाही का? तो ही आजूबाजूच्या परिसरात मिळेल ती सामुग्री घेऊन.
मग सामींबरोबर प्रॅक्टिस सुरू आणि ही बघा कार्यक्रमाची तयारी.
तिसरा मुक्काम मोरोक्को. इथे आफ्रिकेत आदिवासींची कमी नाही. शिवाय इतर भागात चाललेल्या संघर्षांमुळे सुदान, युगांडाचे शरणार्थी आदिवासीही इथे आले आहेत.
या वाळवंटात दगडाचा चलापार्टा बनवायला हवा.
चौथा मुक्काम मंगोलिया. इथले बांबू किंवा तत्सम प्रकारातून चलापार्टा बनला.
टाळ्यांच्या गजरात सिनेमा संपला. थिएटरमधले दिवे लागले - हर्काईट्झ आणि इगोर प्रत्यक्ष चलापर्टा घेऊन हजर होते. एक छोटा कार्यक्रम झाल्यावर त्यांनी प्रेक्षकांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली.
सिनेमाचे ट्रेलर इथे बघा:
http://www.nomadaktx.com/english/pelicula/principal.html
(शेवटचा फोटो नवर्याने काढला आहे. इतर सर्व फोटो नोमॅडक च्या वेबसाईटवरून त्यांच्या परवानगीने घेतले आहेत.)
6 comments:
zakaas....ajun kiti docos chi varnana aahet? bring it on...
खरच. जतन करण्यासाठी किती मेहनत केली जात. ह्याची दाद द्यायलाच हवी
एकूणात, तुमच्या फ़ुल फ़्रेम डॉक्युमेंटरी वाल्य़ांना भारत हा एक आदिवासी प्रधान, फ़िरती चित्रपट गृहे असणारा, निसर्ग संपन्न पण गरीब, अविकसित व 'ट्राईबल' देश वाटतो तर!
पण तुझं वर्णन मात्र छान उतरलं आहे हं!
चलापार्टा कसं वाजतं?
अश्विनी
Koham,
I saw almost 25 movies. I did not like only one of them. But I think I will write 2 more articles in the series.
Harekrishnaji,
Thank you for your comment.
Ashwini,
Last year we saw 2 documentaries on India's call centers, 1 on a shipping yard and 1 about an Indian immigrant family in Full Frame.
तुझं "एक आदिवासी प्रधान, फ़िरती चित्रपट गृहे असणारा, निसर्ग संपन्न पण गरीब, अविकसित व 'ट्राईबल' देश" हे वर्णन अजूनही बर्याच अंशी खरं आहे.
Although rapid changes and modern achievements are recongized, we have a long way to go before rest of the world starts looking at us as a developed country.
India continues to attract people for its rich cultural background and diversity. This is an attempt to revive some of local traditions and find global commonalities.
Ashwini,
To hear how Txalparta sounds, either check out the trailer from the link at the botton of the post or click here
http://dilipb.smugmug.com/gallery/2730470#144999862
chhaan
Post a Comment