Thursday, February 14, 2008

मोकळं आभाळ:वन्यज जिवनपद्धती-भाग दोन

दुधाचे पर्याय:

सोया, तांदुळ, बदाम, ओट, हेझलनट व हेम्प पासुन बनवलेली दुधे सद्ध्या अमेरिकेत उपलब्ध आहेत.


(म्हंटलं नव्हतं पर्याय वाढतात म्हणुन?) वरील बरीच दुधे घरी बनवता येतात.

चहा कॉफीत घालण्यासाठी सोया दुधाचे क्रिमर मिळते.
केकमधे किंवा बेकिंग करायच्या इतर पाककृतींमधे सोया किंवा नारळाचे दुध घालता येते.
तुप,लोण्याचे पर्याय:
मार्जरिन या प्रकारात मोडणारे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यातल्या त्यात सॅचुरेटेड फॅट असलेले उत्पादन टाळावे. कधी कधी दाण्याचे तुप, बदामाचे तुप हे पर्याय ठरू शकतात, पदार्थावर अवलंबुन आहे. गुळाच्या पोळीबरोबर बदामाचे तुप चांगले लागते.
कसंकायची शिफारस: अर्थ बॅलन्स
चीजचे पर्याय:

चीज हा प्रोसेस्ड पदार्थ असल्याने अजिबात खाऊच नये हा कसंकायचा सल्ला आहे.
चीज शिवाय उत्कृष्ट पिझ्झा तयार होऊ शकतो. टॉमॅटो सॉस, मशृमचे तेल, चीज नं घालता केलेले पेस्टो सॉस हे पर्याय. ऒर्डर करतानाच चीज नको असं सांगता येतं.
अगदीच रहावत नसेल तर मात्रं सोयापासुन बनवलेली अनेक उत्पादने उपलब्ध आहेत.
पॅन्जिया नावाचे ऑन लाईन व्हिगन दुकान आहे. त्यात बरीच उत्पादने उपलब्ध आहेत.

कसंकायची शिफारस:

पॅन्जियात मिळणारे शीस व्हिगन चीज
अंड्याचे पर्याय:

बेकिंग करताना अंड्याचा उपयोग जर आर्दता वाढण्यासाठी केला असेल तर त्याऐवजी सफरचंदाचे सॉस घालता येते. फुलण्यासाठी अंड वापरलं असेल तर एनरजी एग रिप्लेसर वापरा:
टीप:

१. या लेखातील छायाचित्रे त्या त्या उत्पादनांच्या संकेतस्थळांवरून घेतली आहेत. वस्तु कशी दिसते ते कळले की घेणे सोयीचे होईल हा एकमेव उद्देश आहे. कुठल्याही उत्पादनांची जाहिरात करण्याचा उद्देश नाही. या किंवा इतर लेखांमधुन कसंकायला कुठलाही आर्थिक लाभ होत नाही.

२. विशिष्टं पाककृतींविषयीचे प्रश्न मिंटसकिंवा दिलीपयांना विचारल्यास जास्तं चांगलं.

क्रमशः
12 comments:

प्रशांत उदय मनोहर (Prashant Uday Manohar) said...

आता एक-एक पर्याय आजमावून पाहता येईल. ऑनलाईन व्हिगन दुकानाची लिंक दिल्यामुळे आणखी सोयीस्कर झालं.
या माहितीबद्दल मनापासून आभार.
-प्रशांत

HAREKRISHNAJI said...

नेहमीच प्रमाणॆ खुप मार्गदर्शक. हे ऐवढे पर्याय उपलब्ध असतील याची कल्पनाच नव्हतॊ.

ATOM said...

व्हिगन फुड पचायला सोपे असतील पण व्हिगनिझम फार जड जातेय !
वन्यज शब्दाला पर्याय : हरीताहार > हा शब्द शाकाहाराशी मिळ्ता जुळता आहे पण शुद्ध शाकाहारात देखील मधा- दुधाचा समावेश होतो. तो हरीताहारात होणार नाही. एकतर हा ४९ सेकंदांपुर्वी माझ्या डोक्यात तयार झालेला शब्द आहे. अत्यंत ताजा आहे.त्याची प्रतीमा जनमानसांत तयार करण्याचे आपल्या हातात आहे. वन्यज शब्द जंगला कडे बोट दाखवतो तसे हरीताहाराचे नाही.वनस्पतीजन्य आणि अप्राणिजन्य असे दोन्ही अर्थ त्यातून ध्वनीत होतात ! असो

Ashwinis-creations said...

संगीता

हरीताहार हा अतिशय छान शब्द आहे. वन्यज मला देखिल पटला नव्हता...पण काही पर्याय ही सुचेना.
लेट अस कंटिन्यु विथ धिस.

अश्विनी

kasakaay said...

प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद.
हरेक्रिष्णाजी,
भारतात सोया दुध उपलब्ध आहे. इतरही दुधे मिळतात का? या दुधांचा आणखी एक फायदा म्हणजे हवाबंद डब्यात रुम टेंपरेचरवर टिकतात. प्रवासात न्यायला सोयीची जातात. भारतातल्या भारनियमन परिस्थितीच्या दृष्टिनेही हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
प्रशांत तुमच्या प्रयोगांबद्दल नक्की कळवा. किंवा तुमच्या ब्लॉगवर लिहा.
नविन चव जीभेवर रूळायला बरेचदा वेळ लागतो. शिवाय एखादा पदार्थ सोसत नाही, असेही होऊ शकते.
एटम आणि अश्विनी,
हरिताहार हा शब्द चांगला असला तरी तो फक्त आहारापुरताच मर्यादित आहे. व्हिगन ही जिवनशैली आहे (भाग १ मधील व्याख्या पहा). तरी कृपया तसा शब्द सुचवा.

HAREKRISHNAJI said...

मुंबईत फक्त सोया दुध मिळते. तरी पण मी चौकशी करीन.

HAREKRISHNAJI said...

माझे एक स्नेही भाषाविशारद आहेत आता मी त्यांना व्हिगनला मराठीत प्रतीशब्द विचारला. आपण सुचवलेला वन्यज हाच संकॄत शब्द त्यांच्या मते योग्य आहे

ATOM said...
This comment has been removed by a blog administrator.
Ashwinis-creations said...

वन्यज म्हणजे वन्य प्राण्यांसारखे वाटते.
जीवनशैली असली तरी ती मुख्यतः आहाराशीच निगडीत आहे ना? जेव्हा तुम्हाला आहार सोडून इतर काही बोलायचे असेल तेव्हा तसे संदर्भ द्या म्हणजे झाले.

kasakaay said...

अश्विनी,
जीवनशैली मुख्य आहाराशीच निगडित नाही. कपडे, सौंदर्यप्रसाधने, औषधे अशा वस्तु वापरतानाही प्राणिजन्यपदार्थांचा वापर टाळणे या शैलीत बसते.
व्हिगन शब्द नुसता आहार सुचवत नाही त्यामुळे प्रतिशब्द बनवायचा असेल तर आहाराला केंद्र करून चालणार नाही.

kasakaay said...

हरिताहार म्हणजे हिरव्या पालेभाज्या खाणे असा समज होऊ शकतो.

Ashwinis-creations said...

Hi

Could you please let me know the meaning of polenta, stromboli, couscous,seitan and its possible use?

Ashwini