Wednesday, February 13, 2008

मोकळं आभाळ:वन्यज जिवनपद्धती-भाग एक.

पर्यावरण, नैतिकता व आरोग्याच्या दृष्टिने प्राणिजन्य पदार्थ कमी वापरा असे सांगणारे लेख सातत्याने या ब्लॉगवर मी प्रकाशित केले आहेत. वाचकांचा प्रतिसादही चांगलाच मिळाला आहे. याविषयीची वैचारिक भुमिका मांडणे यापुढेही सुरूच ठेवणार आहे. वाचकांनी हे विचार आचरणात कसे आणायचे याबद्दल अधिक माहिती विचारली असल्याने ही नविन मालिका सुरू केली आहे.


पहिली पायरी म्हणजे व्हिगन या शब्दाला मराठी प्रतिशब्द शोधुन काढणे. वनस्पतीजन्य या शब्दापासुन वन्यज हा शब्द सुचला आहे. (अधिक चांगला शब्द सुचवा.)
व्याख्या: वन्यज जिवनपद्धती
आहार व वापरात प्राणिजन्य पदार्थ टाळण्याचा प्रयत्नं करणारी जीवनपद्धती म्हणजे वन्यज जीवनपद्धती.
ही जीवनपद्धती आचरण्यामागे पर्यावरणाचे रक्षण, प्राण्यांविषयी सहानुभुती व आरोग्य संवर्धन तसेच विविध चविष्टं खाद्य पदार्थांचा आस्वाद घेणे ह्यापैकी काही वा सर्व हेतु असु शकतात.
ह्या विषयी प्रकाशित केलेले सर्व लेख
इथे वाचा.
वन्यज जीवनपद्धतीमुळे खाण्याचे पर्याय कमी होतील अशी भिती सुरवातीला वाटते. कारण बाजारात उपलब्ध असलेल्या वस्तुंमधे वन्यज पदार्थ कमी असतात. पण लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे ज्या प्राण्यांचे दुध,अंडी किंवा मांस आपण खाण्यायोग्य समजतो असे प्राणी एका हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहेत. त्यात माशांची भर घातल्यास फार तर दोन्ही हाता पायांची बोटे वापरावी लागतील. (चु,भु,दे.घे.) आता डाळी, धान्ये, कडधान्ये, भाज्या, पालेभाज्या, फळे, शेंगा, सुकामेवा, मसाल्याचे पदार्थ यांच्या जाती मोजुन पहा. शेकड्यांच्या वर जातात. (नुसत्या चहाचे पन्नास एक तरी प्रकार आहेत.) मग हे शेकडो पर्याय उपलब्ध असताना डझन दोन डझन नाही म्हणुन काय इतकं घाबरायचं? आभाळ छोटं छोटं करून घेतलेल्यांना मोकळ्या आभाळाची कल्पनाही करवत नाही तसं काहीसं आहे हे.

लोकांना जे हवे असते ते बाजारात उपलब्ध होते. इथे अमेरिकेतल्या बहुतेक किराणा दुकानात वन्यज दुध, तयार पदार्थ, इतकंच काय सोयापासुन तयार केलेले वन्यज मांसही मिळु लागले आहे. रेस्टॉरेंटसमधे व्हिजिटेरियन व्हिगन डिशेस उपलब्ध होत आहेत. मागणी तयार झाली की पुरवठा आपोआपच होऊ लागतो.

मी स्वतः स्वयंपाकात कच्चे लिंबु असल्याने पाकशास्त्राचे फारसे सल्ले फार देऊ शकत नाही. म्हणुन या कामात मदत करण्यासाठी मींट्सला विनंती केली आहे. वदनी कवळ घेता या ब्लॉगवर व्हिगन पाकशास्त्रावर सुगरणीचा सल्ला द्यायचा प्रयत्नं मिंटस करणार आहे. (धन्यवाद मिंटस!)

पुढच्या लेखात दुधाच्या पर्यायांची माहिती. तोपर्यंत वन्यज खाद्यपदार्थांचे हे दोन महत्वपूर्ण ब्लॉग्ज वाचा (म्हणजे नीट वाचा)
१. गेल्या तीन साडेतीन वर्षात बायकोला रोज रात्री वन्यज जेवण, तेही एकदाही पुनरावृत्ती नं करता खाऊ घालणार्‍या रसोयाचा ब्लॉग इथे बघा:
http://dilipdinner.blogspot.com/
२. लेकाला निरनिराळे वन्यज पदार्थ डब्यात बांधुन देणार्‍या आईचा ब्लॉग इथे बघा:
http://veganlunchbox.blogspot.com/ (हल्ली ही बाई स्वतःचे पुस्तक विकण्याच्या नादात आहे, पण जुन्या पोस्टस चांगल्या आहेत.)


क्रमशः

2 comments:

मन कस्तुरी रे.. said...

दिलीप च्या ब्लॉग वर बर्‍याच वस्तू आम्हा सामान्यांना माहिती नाहीत. पण तुम्ही राईस्ब्रॅन ऑईल, ऑलिव्ह ऑइल (एक्स्ट्रा व्हर्जिन का कायसे), काळे तांदूळ, हातसडीचे तांदूळ, ऍव्होकॅडो नामक कुठलेसे फळ अशा ब‍र्‍याच आरोग्याला चांगल्या वस्तू वापरता ते कळले. त्यावर अधिक प्रकाश टाकल्यास बरे पडेल.
मला हार्ट हेलदी पदार्थांमध्ये इंटरेस्ट आहे.
(आणि जमल्यास त्याच्या भारतीय आवृत्तीं मध्येही)

Mints! said...

Sangita,

I added a new label to the recipes that are vegan recipes. or can be made vegan. I will try to answer Ashwini's question soon :)

Thank you!