Friday, September 26, 2008

गावो विश्वस्य मातरः - भाग ३: पर्यावरण

"छ्या! काही तरी काय? इतकं चांगलं ताजं, नैसर्गिक दुध प्यायल्यानी पर्यावरणाचा र्‍हास कसा होईल? काय वेडबिड लागलंय का तुला? हे सगळं व्हेगन प्रकरण बंद कर आधी." अशा प्रकारची वाक्ये मला बरेचदा ऐकायला मिळतात.
हा विषयच चक्रावुन टाकणारा आहे. अवांतर गप्पा करताना पाच दहा मिनिटात मांडु शकेन असा हा मुद्दाच नाही. मी स्वतः अशाच प्रकारच्या साशंक दोलायमान मनस्थितीतुन गेलेली असल्यामुळे इतरांना मी समजुन घेऊ शकते, पण समजावु शकत नाही. अर्थात बहुतेकांना समजुनच घ्यायचे नसते हा भाग निराळा.
व्याख्या:(तुम्हाला पटो अथवा नं पटो) दुध हे द्रवरूपी मांस आहे. त्यामुळे यापुढे या लेखात मांस हाच शब्द द्रवरूपी किंवा घनरूपी मांसासाठी वापरणार आहे.
नोव्हेंबर २००६ मधे फुड एंड एग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशन्सने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे http://www.fao.org/newsroom/en/news/2006/1000448/ या अहवालाप्रमाणे मांसासाठी पाळलेल्या प्राण्यांमुळे होणारे प्रदुषण हे वाहनांनी होणार्‍या प्रदुषणापेक्षा जास्त आहे.
आजकालचे तथाकथित पर्यावरणवादी "घरातील विजेचे बल्ब बदला", "सेल फोन चार्जरला लावून ठेवु नका" वगैरे हास्यास्पद उपाय सांगत असतात.
काही थोडा अधिक संयुक्तिक विचार करणारी मंडळी "कार चालवण्याऐवजी मी पायी चालतो/सायकल चालवतो/पब्लिक ट्रांसपोर्ट वापरतो" असे अभिमानाने सांगतात. पण हे सगळं करण्यापेक्षा किंवा करूनही मांस खाणे/पिणे सोडले तर पर्यावरणाचे कितीतरी पटीने संवर्धन होइल.
प्रश्न: खाद्य साखळीमधील मोठे प्राणि छोट्या प्राण्यांना खातात. मग आपण मांस खाल्लं तर काय बिघडलं?
उत्तर:
निसर्गाचे संतुलन हे प्रजातींच्या सुदृढ परस्परावलंबनावर(सुप) अवलंबुन असते.
या उलट रोगट परस्परावलंबनामुळे (रोप) संतुलन बिघडत जाते.
सुपचे उदाहरण: वाघाला भुक लागली. त्याने जंगलात फिरून हरणांच्या कळपाचा माग काढला. वाघाची चाहुल लागताच हरणे पळू लागली. एक म्हातारे हरिण मात्रं वेगाने पळू शकत नव्हते. ते हरिण वाघाने पकडले व खाल्ले. हरिणांच्या कळपातील ते दुबळे हरिण नाहिसे झाल्याने कळप अधिक सुदृढ झाला. तिसरीकडे हरणांच्या संख्येला आळा बसल्याने जंगलातील हिरवळ कायम टिकुन राहिली.
इथे वाघ आणि हरिण आपापले नैसर्गिक जिवन जगत आहेत. आपण हरणापेक्षा श्रेष्ठं आहोत अशा भावनेने वाघ जंगलात वावरत नाही. जगण्यासाठी आपण या हरणांवर अवलंबुन आहोत, आजुबाजुच्या हिरवळीचे ते आपल्या खाद्यात रुपांतर करतात हे वाघाला चांगल ठाऊक आहे.
रोपचे उदाहरण: वाघाला सारखी-सारखी शिकार करण्याचा कंटाळा आला. मी इतका सामर्थ्यवान असताना मला या तुच्छं हरणांच्या मागे तडमडायची काय गरज? असा विचार त्याच्या मनात डोकावु लागला. म्हणुन त्याने एक युक्ति केली. झाडे कापून एक कुरण तयार केले. त्या कुरणात हरणे आणून सोडली. हरणे पळून जाऊ नये म्हणून कुरणाला कुंपण घातले. भूक लागली की वाघ चांगले मोठे हरिण मारून खाऊ लागला.
त्यामुळे पुढची प्रजा तयार करण्यासाठी केवळ रोगट हरणेच शिल्लक राहीली. हरणांना विविध प्रकारचा पाला न मिळाल्यामुळे हरणे दुबळी झाली. त्यांचं मांस निकृष्टं चवहीन होत गेलं. पण वाघाला आता शिकार कशी करायची तेही आठवेना, म्हणून त्याने चवीकडे दुर्लक्षच केले. हरणांच्या सततच्या चरण्याने कुरणात फारसे गवत उगवेनासे झाले. मग वाघाने आणखी झाडे कापायला सुरूवात केली. हळुहळु वाघाकडे दहा कुरणे झाली. हरणांचे उरलेले मांस तो इतर वाघांना विकु लागला. आता वाघांना हवे तेव्हा हवे तितके मांस मिळू लागले. त्याचे पाहुन इतर वाघांनीही झाडे कापून कुरणे तयार केली. हरणांच्या चोर्‍यांचे प्रमाण वाढले. त्यामुळे कुरणांकडे लक्ष ठेवण्यासाठी आता आपल्याला बरीच पिल्ले व्हावी असे वाघांना वाटु लागले. त्यामुळे त्यांनी चार चार वाघिणींशी लग्नं करायला सुरूवात केली. दुसर्‍या वाघाची आपल्या वाघिणीवर नजरही पडू नये म्हणून वाघिणींवर बुरखा घालण्याची सक्ति करण्यात आली. वाघाची पिल्ले तरणी ताठी झाली तशी त्यांची कुरणे वाढू लागली. जंगल कमी कमी होत गेल्याने जंगलातील इतर प्राणि नामशेष होऊ लागले. काही हजार वर्षांनी अख्ख्या पृथ्वीवर हरिण आणि वाघ हे दोनच प्राणि शिल्लक राहिले. उरलेल्या हरणांना गवत कुठुन आणायचे असा गहन प्रश्नं समस्त व्याघ्र समुदायासमोर उभा राहिला.
तात्पर्य: मी सांगुन काही उपयोग आहे का? कोहमच्या म्हणण्याप्रमाणे जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. पुढच्या पिढीला ही खोडच लागणार नाही अशी काळजी घेतली तर ते त्यांच्या हिताचे ठरेल.

13 comments:

HAREKRISHNAJI said...

Every time I drink Tea, I remember your article.

May be I am on the way to become Vegan.

Few years back I had gone to Nisargopchar Ashram, (Nature Cure) at Urali Kanchan. In the Ashram, they do not make tea at all and I had stopped drinking Tea for quite a few months.

That means I will have to give up Icecreams, Chocolates, Butter, Cheese etc.

But in the end it's not a bad deal at all.

A woman from India said...

Harekrishnaji,
As far as giving up things, yes it is a challenge.
Chocolates is not a such big problem as you can eat dark chocolates. Takes time, but they quickly grow on you. Here in US we get a variety of non-dairy ice-creams/butters and even cheese made without dairy.
I guess it is just a matter of demand. As the awareness grows, things will be available in India too.

Dhananjay said...

Lekh thodasa एकांगी hotoy. Pan harkat nahi. Whatever u r writing is surely thought provoking.

HAREKRISHNAJI said...

I was non-veg. few years back but have given up for last 18-20 years because of cruelty reason. I do not want to eat other living being to stay alive. I have brought up my son with the same principal. He is also vegie.

A woman from India said...

हरेकृष्णाजी आणि धनंजय,
प्रतिक्तियांबद्दल धन्यवाद.
धनंजय,
तुमचे म्हणणे बरोबर आहे. मी एकच बाजु मांडते आहे. तीनेक वर्षांपूर्वी दुध नं पिणे हा फार टोकाचा कट्टरवाद आहे असे मला वाटत होते. माझ्या तेव्हाचा मित्रं आणि आताच्या नवर्‍याला ही बाब पटवुन देण्यासाठी मी या विषयाचा अभ्यास करायला सुरूवात केली.
एका बाजुला धार्मिक,सामाजिक रूढी,समज-असमज,प्राणिजन्य पदार्थ खाण्याची सवय असलेले ९९% लोक, त्या व्यवसायात गुंतलेले छोटे, मोठे, प्रचंड आकाराचे व्यापारी. त्या व्यापार्‍यांना संरक्षण देणारी शासनव्यवस्था. याच व्यवस्थेतील धार्जीणी माध्यमे.
दुसर्‍या बाजुला अमानुष वागणुकीचा रोज सामना करणारी मुकी जनावरे. मनुष्यप्राण्याला मांस खाऊपिऊ घालण्यासाठी होणारी जंगलतोड, अस्तंगत होणार्‍या प्रजाती.
अशी ही असमान लढाई आहे. दोन्ही बाजुंचे म्हणणे जाणून घेतल्यानंतरच माझी स्वतःची मते बनवली. माझ्याकडे असलेली सर्वच माहिती मी इथे मांडलेली नाही.
संदर्भ देताना एकांगी संस्थाचे (उदा. PETA ) संदर्भ नं देता UNO सारख्या संस्थांचे संदर्भ दिले आहेत.
या विषयावर लोकांना विचार करायला आणि अधिक अभ्यास करायला प्रवृत्त करणे हाच या मालिकेचा उद्देश आहे.

HAREKRISHNAJI said...

We are all waiting to know what you have learned in the workshop.

ड्युक विद्यापिठाच्या डॉक्युमेंटरी बनवण्याच्या कार्यशाळेत प्रवेश घेतला.

A woman from India said...

This is what I learnt: It is takes lot of money, skills and time to make documentaries :)
It is a team work and could be frustrating unless you team up with really good people with whom you get along well...

Vaidehi Bhave said...

hi sangeeta,

tu je udaharan dilays te awadale. agadi sagale patlech ase nahi, pan vichar motha ahe he nakki. ani to sagalyanich karayala hava..ata kase hote bagh..apan baki evadhya goshtinbabat sensitiv asato kinwa sensitive rahanyacha praytna karato..pan asha rojachya goshti...dudha, khane pine yacha vichar karat nahi..kadachit bhitine.ki khane pine..jibheche chochale badlave lagtil..

pan tuze vachoon evadhe nakki vatale ki vichar karayala hava..kathin asala tarihi!

A woman from India said...

वैदेही,
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. सगळ्या गोष्टी नं पटणे स्वाभाविकच आहे. हा विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. मराठीत याविषयावर फारशी माहिती उपलब्ध नसल्याने ही मालिका लिहायला घेतली.
अधिक माहिती हवी असल्यास इंटरनेटवर सहज उपलब्धं आहे.

Anonymous said...

नमस्कार,
"आपण (माणसाने)मांस खाल्लं तर काय बिघडेल? "

ह्या प्रश्नाला काहीसं स्पष्टीकरण माझ्या "कष्ण उवाच"
ह्या ब्लॉग वर गेल्यास काही प्रमाणात कारण मिळेल असं मला वाटतं
website आहे shrikrishnasamant.wordpress.com
दोन लेख आहेत
१ "माणूस मुलतः शाकाहारीच" sep. 9 o7
2 एकदाच्य काय ते होवून ज्यावूदे" पींग पॉंग चू
sep 23 o7
सामंत

Unknown said...

मला तुमच्याशी बोलायाचे आहे .कृपया आपला मोबाइल नंबर मिलवा.आपले ब्लॉग वरील लेख आमच्या पाक्षिक विकास वाहिनी मधून प्रकाशित करण्यास आपली परवानगी मिळावी हि विनंती

Unknown said...

मला तुमच्याशी बोलायाचे आहे .कृपया आपला मोबाइल नंबर मिलवा.आपले ब्लॉग वरील लेख आमच्या पाक्षिक विकास वाहिनी मधून प्रकाशित करण्यास आपली परवानगी मिळावी हि विनंती

Unknown said...

मला तुमच्याशी बोलायाचे आहे .कृपया आपला मोबाइल नंबर मिलवा.आपले ब्लॉग वरील लेख आमच्या पाक्षिक विकास वाहिनी मधून प्रकाशित करण्यास आपली परवानगी मिळावी हि विनंती