Sunday, September 28, 2008

गावो विश्वस्य मातरः - भाग १


पवित्रं धार्मिक प्रतिकांची हिंदु समाजातील अवहेलना या विषयावरचा
पुण्यजला गंगा हा लेख मी आधी प्रसिद्ध केला होता. त्याच मालिकेतला हा दुसरा लेख.


कामधेनू, गोमाता अशा प्रतिमांनी गौरविलेल्या गायीला हिंदुधर्मात विश्वाची माता असे स्थान दिलेले आहे. गायीविषयी काही हिंदुधर्मियांच्या भावना इतक्या तीव्रं आहेत की "फार फार वर्षांपूर्वीचे आर्य गायींचे मांस खात होते" असे कोणी म्हंटले जरी की त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते. आता आपले पूर्वज काय खात होते यासंबंधी मला अजिबात माहिती नाही. त्यांनी काय खावे हा त्यांचा प्रश्नं होता. त्यांच्या आहाराचे जाऊ द्या हो, आपला आहार हा आपल्या गायीविषयीच्या मताशी सुसंगत आहेत की नाही हा प्रश्नं आज जास्त महत्वाचा आहे. हिंदू म्हणुन गायीची आपल्याला खरोखर किती माहिती आहे?


गायीच्या दुधाचा आपण चक्कं शाकाहारात समावेश केलेला असल्याने ते कोणाला निषिद्ध तर नाहीच, उलट गायीच्या दुधाला अमृतासमान मानल्याने दूध सर्वांना हवेच असाच आपला समज आहे. गेल्या काही दशकात भारताची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे जिवनमानही सुधारते आहे. त्याप्रमाणे दुधाची मागणीही वाढते आहेच. त्यामुळे या वाढत्या मागणीला पुरवठा करणार्‍या या गायींची (अथवा म्हशींची) काय अवस्था होते हे हिंदू म्हणुन कधी कोणी लक्षात घेतले आहे का?



इतर कुठल्याही सस्तन मादीप्रमाणे गाय व्यायल्यानंतरच दूध देते. इतर सर्व प्राण्यांप्रमाणे गायीचे दुधही निसर्गाने तिच्या पाडसाच्या वाढीसाठीच तयार केले आहे. गाय साधारण चार वर्षांची झाल्यावर तिची गर्भधारणा होऊ शकते. गायीचे पाडस आईच्या उदरात नऊ महिने वाढते. म्हणजे साधारण पहिली पाच वर्षे तिला दुध येत नाही. पाडसाच्या जन्मानंतर ती साधारण दहा महिने दुध देते. त्यानंतर तिची पुन्हा गर्भधारणा होऊ शकते. गायींची आयुर्मयादा साधारण १२-१३ वर्षाची असते. त्यापैकी शेवटची ३-४ वर्षे तिला गर्भधारणा होत नाही. म्हणजे आयुष्यातल्या सुमारे १५० महिन्यांपैकी फार तर ३०-४० महिने ती दुभती असते.


असे असताना वाढत्या लोकसंख्येला दुधाचा पुरवठा, तो ही मध्यमवर्गीयांना परवडेल अशा किमतीत कसा होऊ शकतो त्याचे हे विश्लेषण:



पहिला पायरी:भेसळ


दुधात म्हणजे प्रत्यक्ष अमृतात(!?) पाणि घालणे. इहलोकात अमृत प्यायचं तर ते तितकं शुद्ध कसं असेल बरं?


दुसरी पायरी:पाडसाला गायीपासुन तोडणे






नऊ महिने पोटात वाढवल्यानंतर त्या पाडसाला त्याची माय ममतेने दुधही पाजु शकत नाही. कारण गायीच्या मालकाला ते परवडणारे नसते. बरेचदा आईपासून तोडलेले हे वासरू जगु शकत नाही. सुरूवातीला जेव्हा वासरू दुसरं काहीच खाऊ शकत नाही तेव्हा आपण खरवसासाठी चीकही चोरतो. दुध प्यायलाने आपण कोणाची हत्या तर करत नाही हे समाधानही खोटेच ठरते.


तिसरी पायरी:कृत्रिम गर्भधारणा


गायीचे दुध आटुन ती पुन्हा नैसर्गिकपणे गर्भार होण्याची वाट नं बघता दुभत्या गायीवरच गर्भारपण लादणे. म्हणजे पुन्हा नऊ महिने वाट बघायला नको. याचा गायींच्या प्रकृतीवर सहाजिकच परिणाम होऊन त्यांचे आयुर्मान कमी होते.


आदर व्यक्तं करायची ही तर्‍हा चांगली आहे! हे सगळं करताना वरून "वासराला चीक पचत नाही", "वासराला लागतं त्यापेक्षा जास्तं दुध गायींना येत असल्याने दुध काढावंच लागतं" वगैरे खोटे युक्तिवाद स्वार्थातुन किंवा अज्ञानातुन केले जातात. निसर्गाने आईच्या दुधाची निर्मितीच मुळी पिलांसाठी केली असताना वासरांना गायीचं दुध पचणार नाही असं होईल का? तुम्हीच विचार करा.


फॅक्टरी फार्म




पश्चिमी संस्कृतीमधे तर प्राणीमात्रांना तितकाही दर्जा मिळत नाही. मानवाचा जन्मं पृथ्वीवरील इतर प्राण्यांवर कुरघोडी करण्यासाठीच (डॉमिनियन) करण्यासाठी झाला असल्याची बर्‍याच ख्रिश्चनांची श्रद्धा असते. त्यात नफेखोरीची भर पडल्याने तर प्राण्यांचे जीवन असह्यच झाले आहे. प्राण्यांना "कच्चा माल" समजुन त्यापासुन खाद्य पदार्थ म्हणजे "पक्का माल" बनवत असल्याची त्यांची भुमिका असते. त्यामुळे इथे दुग्ध व्यावसायिकांच्या धंद्याला "फॅक्टरी फार्म" असेच नाव आहे.



फॅक्टरी फार्ममधे अमानुषतेच्या पुढच्या पायर्‍या गाठल्या जातात:


चौथी पायरी:गायींच्या genes मधे फेरफार करणे:


उत्पादन वाढवण्यासाठी genes मधे बदल करून संकरित गायी तयार करतात (हे काही प्रमाणात भारतातही होते). त्या संकरित गायी भरपूर दुध देतात. पण त्यामुळे गायींची जेनेटिकल एकात्मता नष्टं होण्याच्या मार्गावर आहे.


पाचवी पायरी:वाढीसाठी हार्मोन्सचा मारा:

गायीची शारिरिक वाढ लवकर व्हावी व तीने लवकर गर्भ धारण करावा म्हणुन हार्मोन्स दिले जातात. (आजकाल मुली लवकर वयात येतात हे आपण ऐकतो. का येणार नाहीत? गायींना दिलेले ते वाढीचे हार्मोन दुधातुन आपल्या मुलींना आपणच पाजतो नं?)


सहावी पायरी:हालचालींवर बंधने:

गायींना हालचाल करायला जागा देत नाहीत. याचे दोन फायदे असतात. एक तर हालचाल नं केल्याने सर्व उर्जा दुध अथवा चरबी बनवण्यात खर्च होते. दुसरे म्हणजे तेव्हढ्याच जागेत जास्तं गायी मावु शकतात.

ह्या सर्व अत्याचारांमुळे त्यांना अर्थातच अनेक असाध्य रोग होतात. पार खंगल्यामुळे तीन ते चार वर्षातच त्यांचा मृत्यु होतो. आजारी गायींवर ऍंटिबायोटिक्सचा प्रचंड मारा करतात. त्यांना दिलेले हार्मोन्स आणि ऍंटिबायोटिक्स मग दुधातही आढळतात.


गायींना या यातना आपण जन्मभर भोगायला लावतो. मग आपल्या पूर्वजांनी यदाकदाचित गायींना मारून खाल्लेही असेल तर त्यात इतके वाईट वाटण्यासारखे काय आहे?


अजुनही तुम्ही हा लेख वाचताय याबद्दल तुमचे आभार.


कोणी काय खायचे हा ज्याचा त्याचा प्रश्नं आहे. जर तुम्हाला फार विचारच करायचा नसेल, तर हा लेख अर्थातच तुमच्यासाठी नाही. पण आपल्या ताटात पडणारे अन्नं कसे तयार झाले आहे याचा विचार करणे जर तुम्हाला गरजेचे वाटत असेल, किंवा मानवतेच्या किंवा धर्माच्या दृष्टिकोनातुन आपण काही तरी अयोग्य करत आहोत ह्याची जाणिव जर तुम्हाला झाली असेल तर माझ्या पुढच्या लेखाची वाट पहा. आहार, आरोग्य आणि पर्यावरण या दृष्टिकोनातुन चर्चा पुढील लेखात.




छायाचित्रे फार्म सॅंक्चुअरीच्या सौजन्याने.

7 comments:

HAREKRISHNAJI said...

स्वताच्या स्वार्थासाठी पशुंना दिलेली ही वागणुक फार धक्कादायक आहे. दुखःदायक आहे. ही वस्तुस्थीती फार दाहक आहे व बऱ्याच जणांच्या पचनी पडणे कठीण आहे.
निसर्गात केवळ मानव प्राणीच दुसऱ्या प्राणाचे दुध पितो. इतर कुणीही नाही.
पाडसांचे दुध चोरण्याचा आपल्याला काडीमात्रही अधीकार नाही

दुधात भेसळीचे प्रमाण केवळ फक्त त्यात पाणी घालण्यापुरते सीमीत राहीलेले नाही, आता अनेक घातक रसायने जशी कॉस्टीक सोडा, इ. वापरुन भेसळ केली जाते.
आर्य काय खात होते याच्या कडॆ आपण सोयीने दुर्लक्ष केलेले आहे. सर्वच गोष्टी आपण सोईने स्विकारतो किंवा टाळतो.
गायीची उपयुक्तता संपल्यानंतर ज्या रीतीने त्यांना कसया कडॆ सोपवले जाते, ज्या पध्दतीनी त्यांची रवानगी कराईखान्या होते, त्यांची वाजतुक व्यवस्था वगैरे अगदी अमानुष असते.

आणि मनेका गांधीना लोक वेड्यात काढतात.

HAREKRISHNAJI said...

This is one of the very informative blog by Doctor on food.

http://knowaboutyourfood.blogspot.com/

Sandeep Godbole said...

शिता वरून भाताची परीक्षा .
माणुस हा सर्व भक्षक प्राणी आहे.
जे जे पचेल ते ते खावे. सोडुन द्यावे विष जहर.
माणूस माणसाला सुध्दा खातो. निठारीला काय झाले ते विसरले जाते म्हणून गाईं वरचे अत्याचारां बद्द्ल आपण विचार करू लागतो.
बापाने मुलाचे शीर उडवले, सासूने सुनेचा कान कापला..
शेजारयाने बायके पळ्वून नेली..
रामायण आणि महाभारत.. सतत सुरू आहे.. गाईं च काय ? त्या तर शुद्ध उपयोगी वस्तु!

आपण कुणाची गाय बनणार नाही याचीच
आपण द्क्षता सतत घेतली पाहीजे.विसरू नका>> हे जग कसायांच्याच मालकीचे आहे.

A woman from India said...

हरेकृष्णाजी आणि ऎटम,
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
एटम,
तुमच्या इतका प्रामाणिकपणा सगळ्यांमधे असतोच असं नाही. आपल्या नुसत्या समजुतीने किंवा प्रथेमुळे कुठली गोष्ट शाकाहारी किंवा मांसाहारी बनत नाही. आपण दुधाला शाकाहारी म्हणतो कारण शारिरिक पचनाबरोबरच मानसिक पचनही जरूरीचे असते.
जे खायचे ते खा, प्यायचे ते प्या. गायीचे दुध तेव्ह्ढे चांगले आणि मांस वाईट हा दुटप्पीपणा आहे. दुध हे द्रवरूपातील मांसच आहे. काहीही केले तरी गायीला तेव्हढ्याच यातना होतात.

bhaskarkende said...

अभ्यासपूर्ण लेख! अभिनंदन.

मांडण्याची पद्धत आवडली. ही माहिती खूप कमी लोकांच्या पचनी पडते हा स्वानुभव आहे. पण आपण हे कार्य चालू ठेवावे. आमच्या सारखे असंख्या वैद्न्यानिक दृष्टीकोणातून बघणारे सहकारी तुम्हाला मिळतील.

हिंदूंच्या मांस खाण्याबद्दल... मांसाहारि हिंदू बौद्द काळानंतर पुन्हा हिंदू (वैदिक) झाले खरे पण शाकाहाराची सवय बर्याच जणांनी सोडली नाही. हे पटवता पटवता सावरकरांसारख्या समाज धुरिणांना प्रचंड त्रास झाला तेव्हा आपल्या सारख्यांचे काय. पण एक दिवस हे सगळे जागे होतील अशी अशा ठेऊन आपले जनजारणाचे कार्य चालू ठेवावे.

Jack the Ripper said...

नमस्कार,
हा लेख वाचून मला आश्चर्याचा धक्का बसला आहे. मी गेली १०.५ वर्षे व्हीगन आहे. सुरुवातीच्या काळात ह्या बद्दल जागरुकता निर्माण करण्याच्या दृष्टीने मी ह्या बद्दल सार्वत्रिक वाच्छता करायचो. पण त्याचा परिणाम केवळ चेष्टा आणि निंदेत व्यायाचा. भारतात आणि तेही मराठी लोकांत कोणी ह्याबद्दल गंभीरतेने विचार केलेलं माझ्या संपर्कात नाही. त्यामुळे चक्कं मराठीत असा लेख बघून एक समाधान मिळाले. आपण कोण अहात? आपण व्हीगन अहात का ?

~तेजस गोखले (tejas_gokhle01@yahoo.com)

A woman from India said...

Tejas, your email ID does not work. Yes, we are a vegan family. If you send me your correct email, we can get in touch.