गावो विश्वस्य मातरः - भाग २: आहार
बबनराव: डॉक्टर, हल्ली फार थकवा जाणवतो. लॅक्टोज घेत जाऊ का मी सकाळ संध्याकाळ?
डॉक्टर:(हसत) छे छे बबनराव, काही तरी काय? अहो मोठ्यांना लॅक्टोजची काही गरज नसते. चांगले जेवत जा भरपूर आणि मी हे टॉनिक देतो ते घ्या काही दिवस.
थोड्या वेळानंतर
संपतराव:डॉक्टर, हल्ली फार थकवा जाणवतो. दुध घेत जाऊ का मी सकाळ संध्याकाळ?
डॉक्टर: अवश्य!
खरं म्हणजे बबनराव आणि संपतरावांनी डॉक्टरांना एकच प्रश्न विचारला होता. (कारण लॅक्टोज हा दुधातला सर्वात प्रमुख घटक आहे.) मग डॉक्टरांनी बबनरावांना वेड्यात काढले पण संपतरावांना मात्रं मान्यता दिली असे का?
कारण "दुध प्या" असे डॉक्टर किंवा आहारतज्ञ जेव्हा तुम्हाला सांगतात तेव्हा दुधातील प्रोटीन आणि मिनरल्स (कॅल्शियम आदी) ही आवश्यक तत्वे तुम्हाला मिळतील ही त्यामागची भावना असते. मात्रं एका गोष्टीकडे डॉक्टर व आहारतज्ञ सोयिस्करपणे दुर्लक्ष करतात. ती म्हणजे दुधात जितकी उपायकारक तत्वे असतात त्यापेक्षा जास्त अपायकारक तत्वे असतात.
प्रश्नं: दुध हे खरेच अमृत आहे का?
उत्तर: होय, बैलाच्या वाढीसाठी दुधासारखे दुसरे अमृत नाही.
प्रश्न: आणि माणसासाठी?
उत्तर: हे तुमचे तुम्ही ठरवा.
प्रश्न: दुधात असते तरी काय?
उत्तर:
लॅक्टोज हे साखरेचे एक स्वरूप आहे. चरबी(फॅट)मधे कॉलेस्टरॉल असते. (आहारातुन मिळणारे कोलेस्टरॉल फक्त प्राणिजन्य पदार्थातुनच मिळते. वनस्पतींमधे कॉलेस्टरॉल नसते.)
म्हणजे उपायकारक तत्वे ४%, अपायकारक तत्वे ८% आणि उरलेले पाणी असा सरळ हिशोब आहे. शिवाय गायीला अथवा म्हशीला हार्मोन्स, एंटिबायोटिक दिले असेल तर ते ही.
उपायकारक तत्वांपैकी B12 वगळता सर्व घटक वनस्पतीजन्य पदार्थातून मिळू शकतात. फोर्टिफाईड सिरियल मधुन B12 ही मिळु शकते.
दुधातून मिळालेले कॅल्शियम हाडांसाठी चांगले नसते असे काही तज्ञ मानतात. फिजिशियन्स कमिटी फॉर रिस्पॉन्सिबल मेडिसिनने दिलेला हा लेख वाचा.
http://www.pcrm.org/resources/education/nutrition/nutrition7.html
मग असे असताना आपल्या पुर्वजांनी दुधाची इतकी भलावण का केली असावी? सर्वच परिस्थितीत दुध वाईट असते का? जेव्हा अन्नाची उपलब्धता आजच्या इतकी नव्हती आणि शारिरीक श्रम हे जिवनाचा अविभाज्य भाग होते तेव्हा दुध हे आहारतील कमतरता भरून काढू शकत होते. आपल्या सुखवस्तु शहरी रहाणीमानाला मात्रं दुधाची काडीमात्रं आवश्यकता नाही. डायबेटिस, हृदयविकार, लठ्ठ्पणा अस्थिविकार असे रोग सामान्यतः पांढरपेशांनाच झालेले आढळतात त्यामागचे एक महत्वाचे कारण म्हणजे दुध.
अर्थात आपल्या खाण्यापिण्यामधे सामाजिक आणि आर्थिक मुल्येही तितकीच महत्वाची असतात. दुध प्यायचे नाही तर चहा कसा पिणार? गोड काय खाणार असे प्रश्नं आपल्याला आणि इतरांना स्वाभाविकपणे पडणारच. हे प्रश्न सोडवणे आजच्या काळात फारसे कठीण नाही. सोया, तांदुळ, बदाम, हेम्प यापासून बनवलेले दुध -दही बाजारात उपलब्ध आहे.
मानवतेच्या किंवा प्रकृतीच्या दृष्टिकोनातुन तुमच्या ओळखीपैकी कोणी दुध घेत नसेल तर "कसलं हे फॅड?"अशी टिंगल नं करता त्यांना सहकार्य करा.
संदर्भ व अधिक माहिती:
http://www.milkfacts.info/Milk%20Composition/Milk%20Composition%20Page.htm
दुध आणि पर्यावरण पुढील लेखात.
8 comments:
completely agree.
हाय कम्बख्त !
तुने पीया ही नही !
दुधचे प्लस पौईंट्स>
१.शेळी,गाय,म्हैस,कुठ्ल्याहि रंगाची असो,दुध पांढरेच असते.
२.चीन, भारत, आफ्रीका, युरोप,टुंड्रा, अमेरिका,सगळी कडे फक्त माद्याच दुध देतात.
३.पिल्लांनी दुध न प्यायल्यास त्यांच्या आयांना अस्वस्थ वाटते. हल्लीच्या पिल्लांना दुध फारसे आवडत नाही > बघा, आपली पिल्ले!
३.दुध वापरणे बंद झाले तर बोर्नव्हिटा कशात टकायचे?
४.दुध विष नाही असा सर्वांचा दुधविश्वास आहे !
Hey, abhyaspurna lekh! Series avadli. Vichar karayla bhaag padnari. Keep on writing!
पेंद्या >आरवो किस्ना ! की..स्न्या !!
आरं हे काय आईक तुया ?
किस्ना > काय रं ?
पॆंद्या >आर,आपल दिवस आता भरल म्हून समज !
किस्ना >म्हंजे रे काय ?
पें> आर,यष्वदा मातेची ल्हानपन्ची सखी मनेका आल्यीय ..
कि> मग..लै बेस झालं! थिले आपून खर्वस द्युकी !काल नाही.. बिनाका गाय व्याल्यीय !!
पें> आरं आरं ..त्या मनेकां न सार गोकुळ नासवलय बघ! खर्वस कसला देतुया..म्या तर पुरा नर्व्ह्स झालुया!
कि> आर..पन या मेनके न नेमके केलया तरि काय ?
पें> आर, तिनं,सार्या बछ्ड्याईले च्यवनप्राश देन सुरू केलय बघ!
कि> च्या मारी ! ते काहून ?
पॆं> आर , च्य्वनप्राशन थ्याईले ताकद यीन मग ते आपाअप्ल्या मंम्मीचे दुध सोताच संप्वून टाकतील !अन, तुले न मले..सुयाबीनचा खर्वस खा लगन॒!
कि> आरंतिच्या !न तुले ना मले घाल पिल्लईले ?
पें> प्रस्न घंबीर हाय का नाय ? आता गौळ्णीच्या घागरीला काही काम राहणार नाय! पानी टाकनार कायच्यात ?
कि>पन हे भानग्ड काय हाय ?
पें> आर, मनेका म्हंते का गाईचे दुध फ्क्त पाडसा साठि..मानसाई साठि न्हाई .!!
कि> म्या संगुन ठिवतुय ..दुधाचे काय वाट्टेल ते करा साईचा वाटा मानसाईचाच !आपुन पिल्लाईले साय काढुन खालचे दुध कपबशी न पाजु!!
पॆं>अबे..मंग ध्या च काय ? लुन्याच कायं?
किस्ना > हरीयानात गाई बैल्याच्या ह्ड्ड्याईचं लुनी काढाचा कार्खाना हाय .. तसा हिथ सुरू करा लागन !
पॆंद्या>मेळ्घाटात्ल्या कोरकूईच्या पोराय़्ले आता मोहाची कप्ब्शी गिटका लागन सकाली सकाली!
किस्ना > थे काय नाय ! आपुन सुयाबीन्चे दुध बछ्ड्याईले देउ !कस ?
हरेकृष्णाजी, धनंजय व एटम,
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
एटम,
दोन्ही प्रतिक्रिया भन्नाट आहेत :)
एटम,
Your comments, Simply out of the world.
हाय कम्बख्त !
तुने पीया ही नही !
sangeeta,
changla lekh.....mahiti avadali....pan jityachi khod melyashivay kashi jail???
Atom,
Pratikriya great....hya ateev dudhat thoda pani ghalun ekhada natyapravesh jamu shakel......vaat pahatoy..
कोहम,
जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही हे खरेच. मला स्वतःला सगळी माहिती पटल्यावरही दुध पूर्णपणे सोडायला अडीच एक वर्षे लागली.
एटम,
मुलांना दुध नं आवडणे स्वाभाविक आहे. आवड-निवड सांगण्याइतकं त्यांचं वय झालं की त्यांना दुधाची गरजच नसते. आपणच आपल्या अज्ञानातुन त्यांच्यावर दुधाची सक्ति करतो.
Post a Comment