Tuesday, July 31, 2007

ड्युक व्हिडिओ इंस्टिट्युट - २००७

मागे फुल फ्रेम डॉक्युमेंटरी फिल्म फेस्टिवलबद्दल लिहिलं होत ते आठवतंय का? तेव्हा ते सगळे सिनेमे बघुन आपणही असं काही तरी करून पहावं असा किडा डोक्यात वळवळला. त्या किड्याने नुसती वळवळ नं करता ड्युक विद्यापिठाच्या डॉक्युमेंटरी बनवण्याच्या कार्यशाळेत प्रवेश घेतला.

http://cds.aas.duke.edu/courses/workshops.html#video

शनिवारपासून अभ्यासक्रम सुरू झाला. ८ दिवस रोज बारा तास. अमेरिकेच्या काना-कोपर्‍यातून आलेले विद्यार्थी बघुन नामांकित अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असल्याचा शोध लागला. पस्तीस एक विद्यार्थ्यांपैकी फक्तं ३ पुरूष आहेत हे एक उगाचच केलेले विशेष निरिक्षण!
व्हाईट बॅलंस, आयरिस, एक्स्पोजर, एफ स्टॉप, फोकस हे नवर्‍याच्या कोषातले अगम्य शब्दं आता मलाही कळु लागले आहेत. त्या सगळ्या शब्दांच्या व्याख्या इथे तुम्हाला सांगत बसत नाही. पण एका शिक्षकची टिपणी: वाईट व्हिडिओचे उदाहरण म्हणजे बाजूच्या खोलीत सुरू असलेल्या टिव्हीचा नुसता आवज ऐकून संपूर्ण कथानक कळु शकणे.

9 comments:

कोहम said...

wah....all the best.....tumache kahi prayog u tube var chadhava mhanaje aamhalahi baghata yetil..

Anand Sarolkar said...

Good going.

I really admire people who take the road less travelled.

All the best!!!

A woman from India said...

आनंद आणि कोहम,
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
कोहम,
माझे प्रयोग यु ट्युबवर नक्कीच टाकेन

HAREKRISHNAJI said...

All the best. Waiting for the experiments.

After loadin on You Tube, please paste it on the blog or you can diretly upload the video's in Google video.

A woman from India said...

Harekrishnaji,
Thanks for your comment. I will post it on my blog.

Sandeep Godbole said...

लघुपट !
आपल्या भोवतालच्या उत्कट घटना जगा समोर मांड्ण्याचे प्रभावी माध्यम !

विषय,रचनाकार व माध्यम यांचा सुरॆख संगम तुमच्या आयुष्यात घडावा ही शुभेच्छा !
सुरॆख संगम म्हण्जे काय़? तो कसा काय मिळवल्या जाऊ शकतो ? या वर चिंतनाची गरज आहे.
दिगंत किर्ती, पैसा,शरीरस्वास्थ्य, अजात शत्रुत्त्व आणि हे मिळवतांना नितळ विशुद्ध मन:स्वास्थ्य !
व्यास मुनीची किर्ती,रूपर्ट मर्डोक सारखा पैसा,रामदासां सारखे शरीरस्वास्थ्य,पु.लं. सारखे अजात शत्रुत्व आणि बुद्ध व सद्दाम या योगीवरां सारखी असीम मन:शांती स तुम्ही पात्र ठराल अशी परमेशा चरणी प्रार्थना !

HAREKRISHNAJI said...

आणि हो. आम्हाला पण कळु द्यात आपण काय शिकलात ते Please.

व्हाईट बॅलंस, आयरिस, एक्स्पोजर, एफ स्टॉप, फोकस याचा अर्थ जाणण्याची उत्कंठता आहे

Sandeep Godbole said...
This comment has been removed by a blog administrator.
A woman from India said...
This comment has been removed by the author.