Saturday, March 08, 2008

दिसामाजी काहीतरी....पण काय? भाग २

ट्युलिपने हयात नसलेल्या लेखकांच्या रचनांबद्दल प्रश्न विचारला आहे. सर्वांच्या सोयीसाठी त्यासंबंधीची माहिती स्वतंत्रं पोस्टमधे देते आहे:
मी काही कोणी वकील बिकील नाही, पण इंटरनेटवर, विशेषतः
या दुव्यावर जी माहिती मिळाली ती थोडक्यात मराठीत देत आहे:
सद्ध्याचा आंतरराष्ट्रिय प्रताधिकार कायदा, ज्यावर जगातल्या बहुतेक देशांनी सह्या केल्या आहेत, त्यानुसार:
१. कुठल्याही रचनेचे प्रताधिकार रचना मुर्त स्वरूपात उतरल्या क्षणापासुन रचनाकाराच्या मृत्युनंतर ७० वर्षे पर्यंत रचनाकाराकडेच रहातात.
२. रचनाकार "ही रचना सार्वजनिक वापरासाठी आहे" असे सांगु शकतात, मात्रं तसे त्यांनी निःसंदिग्धपणे सांगितलेले असावे लागते. तसे सांगितल्यावर अर्थातच रचनाकाराच्या हयातीतही त्या विशिष्ट रचनेची प्रत करता येते.
३. रचनाकार प्रताधिकार इतरांना (वारस, ट्रस्ट किंवा प्रकाशक) देण्याचा करार करू शकतात. सर्व हक्कं स्वाधिन करण्यासाठी कायदेशीर लिखित करार करणे आवश्यक आहे.
४. प्रताधिकार वैयक्तिक संपत्तीत बसत असल्याने रचनाकाराच्या मृत्युनंतर ते हक्कं त्याच्या/तिच्या कायदेशीर वारसाकडे हस्तांतरित होतात. ह्यासंबंधी त्या त्या देशातील कायदे लागु पडतात.
५. कायदेशीर वारस नसलेले रचनाकार बहुदा मृत्युनंतरचे हक्कं प्रकाशक किंवा एखाद्या ट्रस्टकडे देऊन ठेवतात.
६. रचनाकारास कायदेशीर वारस नसेल व मृत्युनंतर हक्कं कुणला दिले नसतील तरी ही मृत्युनंतर ७० वर्षेपर्यंत कोणीही प्रती काढु शकत नाही.

8 comments:

Raj said...

अत्यंत उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद. ७० वर्षांच्या कायद्याची माहिती नव्हती. मला वाटते ही (आणि अशा प्रकारची) माहिती मराठी ब्लॉगविश्वच्या पहिल्या पानावर टाकली तर आणखी जागरुकता वाढायला मदत होईल.

Sandeep Godbole said...

फक्त भाकड जागरूकतेला खुप घाबरावे .
आपल्या डोळ्या समोर आपल्या अपत्त्याचे अपहरण बघणे म्हणजे जाग्रुकता!
त्या पेक्षा झोपेत त्याचे बरे वाईट होणे हे कमी क्लेशकारक..
आकर्षक,सुंदर व आनंद देणार्या वस्तुंचे मुल्यमापन व त्या मुल्याची कदर, संवर्धन व रक्षण करण्याची जबाबदारी
व क्षमता अंगी बाणवावी.
जर तसे नसेल.. तर..द्युताच्या डावात तुमच्या द्रौपदी वर कौरवांच्या वखवखीची वखार आहे हे सुद्धा विसरून जा.. कारण
वस्त्रहरणात तिची अब्रु वाचवण्या साठी भगवंता कडे आता चिंधी सुद्धा उरलेली नाही. !!
मग काय करतो आपण ?
आपल्या वस्तुचे मुल्य स्वजाणिवेच्या असेल त्या चढ्त्या प्रमाणांत खालील पायरयांवर चढतो >
१.फारतर शेजार-पाजारात अ़श्रु गाळ्त बसतो .. मुल चोरीला गेले हो माझे..!!
२.कधी कधी पोलीसा कडे आशाळभुत पणे भीक मागतो.
३.कधी न्यायालयाचा उंबरठा पुजतो.
४.फार झाले .. तर पेटून उठुन व
नवे कायदे निर्माण करण्याचे प्रयत्न करू..
कारण .. तो चोर आणि तुंम्ही या मधे द्वंद युद्ध सद्ध्या असंभव आहे.
एक तर तुमची तशी अजीबातच इच्चा नाही ..
वस्तुत:तो जगातील सर्वोत्तम न्याय असेल.
कारण त्या मधे "न्यायव्यवस्था" नामक कुंट्णखाणा नसेल.. न्यायाची दलाली करणारे वकील व भडवे नस्तील.
आणि जो कोणी जिंकेल तो बलशाली सिकंदर असेल.. द्रौपदी समर्थांचीच असावी ..षंढांची नसावी ..हा मुळ व एकमेव न्याय आहे !!

Anamika Joshi said...

loksatta var prashddha zalelya lekhat tumachya blog cha ullekh kela gela ahe .. tyabaddal congratulations ..

http://www.loksatta.com/daily/20080309/ravi02.htm

http://www.loksatta.com/daily/20080309/ravi01.htm

प्रशांत said...

अत्यंत उपयुक्त माहिती आहे.
मला पडणार्‍या अनेक प्रश्नांची उत्तर तुम्ही दिलेल्या linkवर आणि तिथे दिलेल्या इतर linksवरती मिळाली.
धन्यवाद.
-प्रशांत

HAREKRISHNAJI said...

आजच्या लोकसत्ता रविवार वॄत्तात मधे आपल्या बॉगचा उल्लेख आहे.

Anonymous said...

Some more info - http://en.wikipedia.org/wiki/Copyright

On that topic, I am not saying that copying someone's blog post as their own is correct thing to do. But even then, "60-70 years after death law" needs to be revisited. Especially in the art. 20 years after creation is ought to be more than enough. The tax payers' money does not deserve to be spent on let's say Mickey Mouse and Happy Birthday to You simply because their creator did something about 70-80 years ago.

A woman from India said...

विदुषि,आणि हरेकृष्णाजी,
लोकसत्तेतील लेख कळवल्याबद्दल धन्यवाद.
राज,
खरंच ही माहिती मराठी ब्लॉगविश्वाच्या पहिल्या पानावर ठळक दिसेल अशी टाकायची सुचना चांगली आहे.
प्रशांत, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
के,
तुम्ही मांडलेला मुद्दा अगदी बरोबर आहे. ही मुदत आधी ५० वर्षे होती, मग ती १९९८च्या सुमारास ७० वर्षे करण्यात आली. कलेच्या क्षेत्रातही कुणाचे तरी आर्थिक हितसंबंध जपले असावेत असा संशय घ्यायला नक्कीच जागा आहे. ती मुदत खाली यावी असे मलाही वाटते, तरीही आजच्या घटकेला ही मुदत ७० वर्षे आहे हे मात्रं खरे.

Tulip said...

Thanks Sangeeta!