मोकळं आभाळ:वन्यज जिवनपद्धती-भाग पाच
खरं तर ज्याच्यापासुन दूर जायचे त्याच्यासारखे पर्याय तरी का धुंडाळावेत माणसानी?पण मनाला एखादी गोष्ट पटली तरी शरीराची सवय ही सवय असते, ती जाता जाताच जाते. म्हणुन पर्याय शोधत असतो आपण. आता ह्या भागात काही मांसाहाराचे पर्याय सांगणार आहे, पण खरोखरच हे पर्याय आहेत की नाही हे मांसाहार करण्यार्यानेच ठरवावे. मी स्वतः कधीच मांसाहार केला नसल्याने त्याचे पर्याय धुंडाळायची कधी गरज वाटत नाही. व्हिगन बनु पहाणार्या मांसाहारी लोकांसाठी अनेक पदार्थ उपलब्ध आहेत. याला मॉक मिट - खोटे मास असे म्हणतात. एरवी खर्याच काय पण खोट्या मांसाहारी पदार्थांकडेही मी ढुंकुन पहात नाही. पण खाली दिलेले पदार्थ मात्रं त्याला अपवाद आहेत. कशाचे पर्याय म्हणुन नव्हे तर निव्वळ चांगले लागतात म्हणुन!!
सायटान/सेटान अथवा व्हिट ग्लुटन:
गव्हापासुन बनवलेले असते म्हणुन याला व्हिट मीटही म्हणतात. घरीही बनवता येते. बाजारात तयारही मिळते. सायटानचे तुकडे करून बिर्याणी, कबाब किंवा नुसती रस्सा भाजी करून बघा.
टेम्पे:
फसफसलेल्या (फ़रमेंटेड) सोयाबियांपासुन बनवलेले टेंम्पे मुळचे इंडोनेशियातले खाद्य आहे. टोफुपेक्षा टेम्पे सरस आहे कारण ते पूर्ण धान्यापासुन बनवले जाते. प्रक्रिया केलेले नसते आणि त्यामुळे पचायला सोपे असते. टेम्पेचे चौकोनी तुकडे करून जरा तेलावर परतुन घ्यावे. परतलेले तुकडे वर तिखट मिठ लावुन नुसते एपेटायझर/साईड डिश म्हणुन वाढता येतात किंवा फ्राईड राईसमधे घालता येतात.
फिल्ड रोस्ट कंपनीचे सॉसेज:
बाजारात व्हिगन सॉसेजेसचे बरेचसे प्रकार उपलब्ध आहेत. परंतु फिल्ड रोस्ट कंपनीच्या एपल सेज सॉसेजची सर कशालाही येत नाही. सॉसेजचे हव्या त्या आकाराचे तुकडे करून ते तव्यावर जरासे तेल घालुन परतुन घ्यावे. नुसते खायलाही किंवा केचप किंवा मस्टर्ड बरोबर चांगले लागतात. बारीक तुकडे करून कोरड्या भाजीत टाकता येतात, भाताच्या प्रकारात तसेच कबाबमधेही चांगले लागतात.
फिल्ड रोस्ट कंपनीचे सिलेब्रेशन रोस्ट:
सिलेब्रेशन रोस्टच्या स्लाईसेस नुसते एपेटायझर म्हणुन वाढता येतात. बर्गरची पॅटी म्हणुन किंवा झटपट चांगले पोट भरणारे सॅंडविच बनवण्यासाठीही छान उपयोग होतो.
वरीलप्रमाणे पदार्थ करून बघा. सुग्रणींनो आणि वाचकांनो स्वतःची रचनात्कमता वापरून ह्या साहित्यापासुन नविन नविन पाककृतीही करून बघा आणि तुमच्या प्रयोगाबद्दल नक्की कळवा.
अश्विनी, तु विचारलेल्या काही पदार्थांची तरी माहिती वर आली आहे. इतर पुढील भागात.
5 comments:
आपण माझ्या इनोबा म्हणे या ब्लॉगवर दिलेली प्रतिक्रीया वाचून खरेच मला माझ्या चूकीची जाणिव झाली.पु.लं हे माझे आवडते लेखक असल्याने बहूधा मी या गोष्टीकडे सोयीस्कररीत्या दूर्लक्ष केले.हे लेखन मी तत्काळ उडवत आहे.
धन्यवाद!लोभ असावा.
Pl read this
Bond of the extreme Vegetarians
http://epaper.timesofindia.com/Daily/skins/TOI/navigator.asp?Daily=TOIM&login=default&AW=1204949797437
मी जवळजवळ वेगन झालोय म्हणायच. दुध, दही साफ बंद झालय
हरेकृष्णाजी,
अभिनंदन!!
Here is one more reason to be vegetarian/vegan
http://freakonomics.blogs.nytimes.com/2008/04/03/do-hamburgers-cause-crime/
Post a Comment