Thursday, April 03, 2008

खिडकीबाहेर:खारूताईचे घरटे

खिडकीबाहेर नावाचे एक नवे सदर सुरू करते आहे. वरच्या मजल्यावरच्या माझ्या खोलीच्या खिडकीतून बाहेर बघितले की बरेच मित्रं दिसतात. त्यांना कॅमेरॅत बंदिस्त करणे मात्रं कठिण असते. कॅमेरा ऑन करे पर्यंत ते भूर्रकन किंवा सर्रकन दुसरीकडे गेलेले असतात.
ह्या खारूताईचा घरटे बांधण्याचा कार्यक्रम साधारण आठवडाभर चालला होता. तोंडात पानं गोळा करायची, सरसर वर चढायचे आणि पुन्हा खाली उतरायचे. जवळ जवळ आठवडाभर सतत हा एकच उद्योग!. आता ही चढ उतर होताना दिसत नाही त्यावरून कच्ची-बच्ची आली असतील किंवा येण्याच्या मार्गावर असतील असे वाटते.
वाचकांना की बघ्यांना (?) विनंती: पहिल्यांदाच ब्लॉगवर माझी स्वतःची व्हिडिओ टाकते आहे. आवडल्यास प्रतिक्रिया द्या जमलं तर. नीट दिसत नसेल वा वेग समाधानकारक नसेल तर मात्र नक्कीच कळवा.

20 comments:

a Sane man said...

chhan aalay video... :)

नंदन said...

khareeche gharate prathamach pahile :). Video chhan aalay, vyavasthit disala.

xetropulsar said...

खार घरटे बांधते हे माहीत नव्हते. . .स्तुत्य प्रयत्न. . .पुढच्या व्हिडीओची वाट पहातोय. . .

Ashwinis-creations said...

इतक्या लाईट विषयावरची व्हिडीओ पाहिल्याने छान वाटलं. नाहीतर सारखे जहाल विषय आणि वाद!
थंड लस्सी पिल्यासारखं वाटलं जीवाला!
:)
अश्विनी

Raj said...

kharutaiche gharaTe mastach! :)

kasakaay said...

प्रतिक्रिया देणार्‍या सर्वांना धन्यवाद.
अश्विनी,
सोया-दह्याची लस्सीच अभिप्रेत आहे नं तुला? :D

प्रशांत उदय मनोहर (Prashant Uday Manohar) said...

khaariicha gharaTa asata he maahit navhataa. chhaan video aahe. thoDa moThaa asataa tar aanakhii majaa aalii astii.

HAREKRISHNAJI said...

संगीता व अश्वीनी,

असे एकामेकांना चिमटे काढणे बंद करा हो.

पण काही म्हणा पुर्वी कसे वाद रंगायचे " जीवना साठी साहीत्य का साहीत्या साठी जीवन " वगैरे तसा हा वाद झडत होता. मजा आली.

आपणास सांगण्यास आनंद होत आहे की आपल्या बॉग वर ज्याची ओळख झाली तो व्हिगन डायट सुरु केल्या नंतर किंबहुना ही जीवनशैली अंगीकारल्या नंतर माझ्या वजनात चांगलाच फरक पडत चालला आहे.

सध्या माझ्या आजुबाचुचे लोक माझ्या वर मनातुन चांगलेच वैतागत असतील कारण त्यांच्या विचारशेलीला मी धक्का लावत आहे ना त्या मुळे.

व्हिडीओ सुरु व्हायला अंमळ वेळ लागतो आहे.

TheKing said...

Cute video! Let more of it come through future posts!

ATOM said...

मी जर राम असतो तर तुमच्या पाठीवर शाबासकीची बोटे उमट्वल्या शिवाय राहूच शकलो नसतो. धन्यवाद !

kasakaay said...

प्रतिक्रिया देणार्‍या सर्वांचे आभार.
अश्विनी,
आपल्या हवं ते, हवं तेव्हा, जसंच्या तसं प्रसिद्ध करणारं माध्यम हाताशी असताना का म्हणून मिळमिळीत लिहायचं?
लोकानुनय,अर्थानुनय करणार्‍या माध्यमांना फारच मर्यादा असतात. मेन स्ट्रिम मिडिया ज्या विषयांना हात घालायला धजत नाही ते विषय मांडणे मला फार गरजेचे वाटते.
हरेकृष्णाजींसारखे वाचक स्वतः व्हिगन व्हायचा प्रयत्नं करत आहेत आणि इतरांमधेही जागृती निर्माण करत आहेत. मिंटसच्या मदतीने मराठीमधे व्हिगन रेसेपीज गोळा होत आहेत.
वैचारिक आदान प्रदान नुसती वैचारिक नं रहाता प्रत्यक्ष जीवनात त्याचे प्रतिबिंब उमटायला हवे.

Ashwinis-creations said...

"वैचारिक आदान प्रदान नुसती वैचारिक नं रहाता प्रत्यक्ष जीवनात त्याचे प्रतिबिंब उमटायला हवे."

एकदम मान्य! तरंच त्यात काही अर्थ आहे.
आणि खरं सांगायचं तर मला सुद्धा हल्ली दूध नकोसे वाटते. फक्त चहा मी सोडू शकत नाही.
मुलांना तर मी व्हेगनिझम चं महत्व हळू हळू पटवते आहे.

HAREKRISHNAJI said...

क्या खुब कहा ।
वैचारिक आदान प्रदान नुसती वैचारिक नं रहाता प्रत्यक्ष जीवनात त्याचे प्रतिबिंब उमटायला हवे.

माझ्या मते बॉग केवळ कथा, कादंबऱ्या, कविता या पुरतेच सीमीत न रहाता, त्या वर सुयोग्य जिवनाशी निगडीत अश्या या अनेकविध विचारांवर आदानप्रदान, मंथन व्हायला हवे.

मेन स्ट्रिम मिडिया बद्द्ल आपण योग्यच लिहीले आहे. पुर्वी मी अनेक विषयांवर पत्रे लिहुन वर्तमानपत्रांना पाठवत. पण त्यातली फारच थोडी प्रसिध्दीस येयची. आता ती पाठवणॆ बंद केले.

अश्विनी,
गुढीपाढवा व त्या दिवसी बासुंदी पुरी हा आयुष्यभर करत असलेला बेत. यंदाला बासुंदीची आठवण सुद्धा आली नाही. तेव्हा कोरा चहा , हवे तर लिंबु पिळुन पिणे कठीण नाही, टी बॅगचा हवे तर वापर करावा. उरळीकांचन ला मी निसर्गोपचार केंद्रात राहीलो होतो तेथे तर चहा हा नी्षिद्ध. पाती चहाचा देखील आपण वापर करु शकतो.

kasakaay said...

अश्विनी,
तू मुलांना हळू हळू या विषयाची ओळख करून देते आहे हे फारच चांगले आहे. वय वाढत जाते त्याप्रमाणे सवयी व विचार पक्के होत जातात. माझ्या अनुभवाप्रमाणे "आईचं दूध हे तिच्या बाळानीच प्यायचं असतं" हे लहान मुलांना अगदी पटकन कळतं.तसंच दूध व्हेजिटेरियन नाही हे ही त्यांना उमगतं.संस्काराची पुटं चढली की लॉजिकल थिंकींगही ब्लॉक होतं.
दही सोडणं व बिना दूधाची चहा कॉफी पिणं मलाही जड गेलं.
हरेकृष्णाजी,
पाडव्याला बासुंदी नाही म्हणजे तुमचा निर्धार अगदी पक्का दिसतोय!! अभिनंदन. वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे पोळी, भात, कोशींबीर, डाळी, भाज्या यात आवश्यक ती पौष्टिक तत्वे असतातच.
Vitamin B12 हे एकच तत्व आहे जे व्हिगन आहारात कमी असु शकतं. हे व्हिटॅमिन बॅक्टेरियांमुळे तयार होतं. पूर्वी नदी, विहीरीचं पाणी, कंदमुळे यातून ते मिळत असे. पण आता आपण शुद्धिकरणाची जी प्रक्रिया करतो त्यात ते बॅक्टेरिया नष्टं होतात.
तुमच्या इथे फोर्टिफाईड सिरियल किंवा फोर्टिफाईड सोया दूध मिळत असेल तर आठवड्यातनं एक-दोनदा घ्या.

Ashwinis-creations said...

संगीता

व्हिटामीन बी १२ हे तत्व शिळ्या अन्नातून मिळते असे माझ्या मिस्टरांना एका डॉ. नी सांगीतले. त्यांचा उजवा हात खांद्यातून फार दुखतो तेव्हा त्याची कमतरता आहे असे आढळले. (तेव्हापासून घरी फोडणीची पोळी व फोडणिचा भात हे ऑथेंटिकेट झाले आहेत!)
यावर काही प्रकाश टाकू शकशील का?
लहान मुले हीच मते बदलू शकतात हे खरे आहे.
पुढे आपली फ्लेक्सिबिलिटी फार कमी होत जाते.

अश्विनी.

kasakaay said...

अश्विनी,
शिळ्या अन्नातून बी १२ मिळतं हे मला माहित नव्हतं. त्याचप्रमाणे आंबवून केलेले पदार्थ म्हणजे इडली,डोसा, इ. मधेही असायची शक्यता आहे. मात्रं हे तज्ञांना विचाराला हवे.
अन्नं फ्रिझमधे ठेवलेलं असेल तर काय वगैरे प्रश्नंही आहेतच.
मी माहिती काढायचा प्रयत्नं करते.

HAREKRISHNAJI said...

विटॅमीन बी १२ ची चर्चा वाचली. पोळीच्या लाडवात गूळ व तुप असल्या मुळे तो पौष्टीक मानला जात असावा. पण तुप तर आरोग्यासाठी अपायकारक. गुळ देखील organic असला तर उत्तम नाहीतर त्या मधे अनेक रसायने मिसळलेली असतात.

आज मी एका फार मोट्या उपहारगृहात जेवायला गेलो होतो, कोणाचीही पर्वा न करता त्यांना माझ्यासाठी Continental डिशेस चीज, मस्का नसलेल्या बनवायला सांगीतले. व त्यांनी ही बनवुन दिल्या.

Lopamudraa said...

video chaane !!!
var vita B12 chee charchaa chaalu aahe mhaNun malaa naahee vaaTat kee shiLyaa annat vit b12 asel. aanjitake shiLe hote titake tyaateel vitamin kamee hote. Vita B saaThi usalee khaavyaat.

HAREKRISHNAJI said...

सोनोग्राफी केली ( Annual Check up )
निदान लिव्हरला जरासी सुज. फॅट डिपॉसीट. डॉ, म्हणले तुप बंद करा. हा सारा त्याचा प्रताप.

घरगुती शुद्ध तुपाला काही दोष नाही हा जन्मभर बाळगलेला समज.

kasakaay said...

लोपामुद्रा,
माहितीबद्दल धन्यवाद.
उसळीत बी १२ सहित सर्व बी असतात का?
तसेच कडधान्याला मोड आले असणे आवश्यक असते का? तुमच्या ब्लॉगवर अधिक माहिती दिली तरी चालेल.