Wednesday, December 19, 2007

विव्हर स्ट्रीट मार्केट

हे चित्रं पहा:
"प्लॅस्टिक पिशवी नको मला. माझी पिशवी आणली आहे बरोबर" जरा वैतागुनच किराणा दुकानातल्या कर्मचार्‍याला म्हंटले. त्याबरोबर त्याने प्लॅस्टिक पिशवीतल्या माझ्या वस्तु बाहेर काढल्या आणि प्लॅस्टिक पिशवी कचर्‍याच्या डब्यात टाकली. हसावे की रडावे आता?

दोष त्याचा नाही. वॉलमार्ट थवा त्सम (वॉअत) दुकानात आले ही माझीच चूक आहे. हल्ली खपतात म्हणून वॉअत दुकानातही ऑर्गॅनिक भाजीपाला विकला जातो. एखाद दोनच वस्तु घ्यायच्या होत्या म्हंटलं जवळच्या जवळ जाऊन याव.

शेजारच्या गिर्‍हाईकेच्या ढकलगाडीत थोड्याथोडक्या नव्हे, २०-२५ प्लॅस्टिक बॅगा. आधीच दोन-तीन आवरणात गुंडाळलेली प्रत्येक वस्तु ठेवायला आणखी भारंभार पिशव्या. दुकानात जाताना पिशवी नेण्याची तसदी घ्यावी लागत नाही या आनंदात गिर्‍हाईके. गिर्‍हाइकांच्या हातात पिशव्या नसल्याने चोरीची शक्यता कमी झाल्याच्या आनंदात वॉअत कंपन्या.

व्यापारी कंपन्या, गिर्‍हाईक, कर्मचारी, दुकानातील माल, तो पुरवठा करणार्‍या कंपन्या इ. या व्यवस्थेतील घटक हे "मी" या एकाच सूत्राने बांधलेले असतात. "आपला" हा शब्दं सगळ्यांनीच घरी ठेवलेला असतो. "तू नही तो और सही, और नही तो और सही" हा मंत्र जपत इथले सगळे व्यवहार सुरू असतात.
कमीत कमी पगारात काम करायला तयार होणार्‍यांना नोकरी देणार्‍या या कंपन्या. कुठल्या ओळीत काय आहे ह्या पलिकडे मालाविषयी काहीही ज्ञान नसलेले निरुत्साही कर्मचारी.

त्यांनी अधिक पगार मागु नये म्हणून त्यांना फारसे व्यवसायिक प्रशिक्षण नं देता सरकारी अनुदान कसे मिळवावे याचे प्रशिक्षण दिले जाते.
आपणच भरलेल्या करातुन अप्रत्यक्षितरित्या या कामगारांचे वेतन काही प्रमाणात आधीच चुकते होते याचा गंधही नसलेली गिर्‍हाइके. आत्ता मात्रं दोन डॉलर वाचल्याच्या समाधानात बाहेर पडतात.


आता हे चित्रं पहा:
कारबरो येथील व्हिव्हर स्ट्रीट मार्केट- सहकारी किराणा दुकान. कारबरोच्या जनजिवनाचा केंद्रबिंदु

बाहेरील दृष्य:
मोठा सायकल स्टँड. छोटा कार पार्किंग लॉट. बसमधुन,पायी, सायकलवर, मित्रंमैत्रिणींचा कंपु जमवुन, लेकुरवाळी, कुत्रुळवाळी अशी येणारी गिर्‍हाईके.

दुकानाच्या बाहेर मोठ्ठे अंगण. अंगणात छोटी मोठी झाडे. झाडांखाली व अंगणात टाकलेल्या टेबल खुर्च्या. आत तयार केलेले सुग्रास,ताजे, गरमागरम पदार्थ वाढुन घेऊन भोजनाचा आनंद घेणारी मंडळी.



पोराबोळं खेळतायेत, झाडावर चढतायेत, लोंबताहेत . कधी कुत्र्या, माणसांचा फ्रिस्बी चा खेळ रंगलाय. कधी संध्याकाळी एखादा ड्रम सर्कल जमलाय. नर्तक किंवा कमरेभोवती गरगर हुलाहुप फिरवणारे कलाकार त्याच्या त्यालावर फेर धरताहेत.


आतील दृष्य:
दुधाच्या, पाण्याच्या रिकाम्या झालेल्या बाटल्या पुन्हा भरायला आणायच्या. भाज्या,फळे इ प्लॅस्टिक पिशव्यांमधे नं भरता तशाच ढकलगाडीत ठेवायच्या.
प्रत्येक वस्तु वेष्टणात बांधलेली असतेच असं नाही. बल्क सेक्शनमधुन खुले तांदुळ, दाणे,बेदाणे, तिखट, हळद,ओटमिल, सिरियल इ जिन्नस घरून आणलेल्या किंवा दुकानात ठेवलेल्या वेष्टणात बांधुन घ्यायचे. तसे करताना गिर्‍हाइकाने आधी दोन काजु चाखुन पाहिले तरी हरकत नाही.

तर्‍हे-तर्‍हेची ताजी ताजी ब्रेड, केक,बिस्किटे रोज आतच तयार होतात. एकटा जीव सदाशिव असाल तर अर्धाच ब्रेड मागु शकता.
काऊंटरवरील कर्मचारी घरून आणलेल्या पिशवीसाठी ५ सेंटची का होई ना सुट देतो.
सहकारी तत्वावर चालणारे दुकान असल्याने गिर्‍हाईक तसेच कर्मचारीही बहुधा मालकच असतात. कर्मचार्‍यांना माल कुठुन आला, कसा तयार झाला याची सर्व माहिती असते. स्थानिक मालाला प्राधान्य दिले जाते.



आपली गिर्‍हाईके, आपले व्हिव्हर स्ट्रीट मार्केट, आपले कर्मचारी, आपला माल असं मानणारे घटक इथे एकत्रं आले आहेत. आपले गाव, आपला समाज, आपला निसर्ग याची काळजी घेतल्याच्या आनंदात गिर्‍हाईक बाहेर पडतात- ते पुन्हा परत येण्यासाठी.

नोंद:वरील फोटो अज्ञात छायचित्रकारांचे आहेत त्यामुळे श्रेय देता आलेले नाही.

7 comments:

a Sane man said...

tumhi nashibwan aahat he asa sahakari kirana dukan aahe tumchyaithe...ameriket nailajastava wa.a.t. dukanat kharedi karavich lagte...asa nisarga vachvaNara paryay upalabdha asanyachi shakyata kamich...naiilajastav java lagta kevaL wa.a.t. madhe...

paN he je tumhi varNan kela aahe dusara te farach stutya aahe.

HAREKRISHNAJI said...

Few years back we had successfully implemented a project called "Ban on Plastic " in one of the largest Veg.Mkt.

Buyers were asked to bring their own cotton bag othrwise vegs were not sold to them.

We roped a women's organisation to stitch cotton bags and those cotton bags were made avalable with vendors for a deposit of Rs.10. (They also got business)

In the end of the day the vendor saved around rs.100.00 which earlier he was used to spend on Plastic bags.
Arrangement was made by their co-op-Soc. to collect saved money on plastic bags eveyday evening and deposit in their a/c

(Unfortunately after 2-3 years, plastic returned in medium scale.)

प्रशांत said...

hii maahitii dilyaabaddal dhanyavaad.
ashaa prakaarachii dukaana USA madhe kuthe kuthe aahet? website asalyaas kaLavaa.
-prashant

bhaskarkende said...

तुमच्या या व अशाच जन जगरनाच्या लेखनाला मन:पूर्वक दंडवत!

आजपासून तुमची अनुदिनी आपली बोले तो favorite!

Sneha said...

thanx.. baryach goshti navyane kaLalyaa...

Sneha said...

hay thanx blog वाचुन बर्‍याच गोष्टी नव्याने कळल्या... छान लिहतेस...

शिनु said...

खुपच छान. तुमची अनुदिनी खुप छान आहे. तुमच्या लेखाच्या निमित्तानं एक आठवलं म्हणून सांगावसं वाटलं की, परवा मनालीत शॊपिंग करताना प्रत्येक दुकानदार कटाक्शानं कागदी वेष्टनातून गोष्टी देत होता. रहावलंच नाही म्हणून एकाला विचारलं तर त्यानं सांगितलं की मनालीत प्लॆस्टिकवर कडक बंदी आहे कारण दोन वर्षांपूर्वी या इतक्या प्रचंड प्रमाणात प्लॆस्टिक साठलं की नेहमिपेक्शा बर्फ कमी पडलं. मुंबईतल्या महापुराचं उदाहरण तर ताजंच आहे. प्लॆस्टिकच्या वापरावर कडक बंदी आणायला हवी, मग ती मुंबई असो की मनाली.