खुदा के लिये
शोएब मन्सूरचा "खुदा के लिये" हा पाकिस्तानी सिनेमा पुरोगामी मुस्लिमांची बाजू दाखवतो. इंग्लंड,पाकिस्तान, अफगाणीस्तान आणि अमेरिका अशा चार देशात कथानक उलगडते. सप्टेंबर ११ च्या पार्श्वभुमीवर मुस्लिम समाजातील अंतर्गत संघर्ष,विरोधाभास व अन्यायाचे बर्यापैकी परिणामकारकपणे चित्रण केले आहे. या समाजाच्या अनेक ज्वलंत प्रश्नांना हात घालत एका सुसुत्रं कथेची यशस्वी मांडणी केली आहे.
नासिरुद्दिन शहाने साकारलेला कोर्टातील साक्षीचा प्रसंग लाजवाब.
सर्वात जमेची बाजु म्हणजे संगीत. अप्रतिम.
http://mastibox.com/songs/?p=/Pakistani/Khuda%20Ke%20Liye&c=10
काही ठिकाणी दिग्दर्शन व अभिनय जरा अशक्तं वाटतात, कलाकारांना पुरेसा अनुभव नसल्याचं अधुन मधुन जाणवतं. तरीही वेगळं काही तरी दाखवणारा हा चित्रंपट आवर्जुन बघावा.
6 comments:
Have you read this on my blog ?
मराठी बॉग ऑफ द इयर !
साधारणातहा वर्षे संपत आले की इवेंट ऑफ द इयर, परसन ऑफ द इयर, वगैरे वगैरे ठरवण्याचा शिरस्ता आहे. मग आपण मराठी बॉग ऑफ द इयर का बरे ठरवु नये ?
पुरोगामी मुसलमान केवळ चित्रपटात असतात, असा यातून अर्थ निघू नये, म्हणजे झालं. बाकी, पुरोगामी मुसलमान हाही सापेक्ष पुरोगामीच असतो. चित्रपट पाहायला मिळाला कुठे, तर नक्की पाहू.
देविदास,
तुम्ही लिहिलंय तसं मला म्हणायचं नव्हतं, पण वाचकांचा गैरसमज होऊ शकतो हे लक्षात आले. त्यामुळे मजकुर बदलला आहे.
सापेक्षतेचा मुद्दाही बरोबर आहे.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
link baddal khup aabhar...
kal chitrapat pahila... farach chhan... khup lokanparyant pochala pahije... '92 chya parshvabhoomivar nighalela "raam ke naam" ya documentary film chi ka koN jaNe paN aathavaN zali ya nimittane..
a sane man,
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
खरंच सर्वांनी पहाण्यासारखा आहे हा सिनेमा.
राम के नाम या माहितीपट असल्याचे माहिती नव्हते. बघायचा प्रयत्नं करते.
नुकताच पाहिला. कथानकात थोडा अतिरेक जाणवतो, पण चित्रपट बरंच काही सांगून जातो एवढं नक्की.
Post a Comment