Monday, November 12, 2007

व्हेजिटेरियन थॅक्स-गिव्हिंगचे निमंत्रण व मेन्यु

भारतात दिवाळीचे दिवस सरतात, त्याच सुमाराच इथे अमेरिकेत सणासुदीचे दिवस सुरू होतात.

ऑक्टोबरच्या अखेरिस बाळ-गोपाळांचा आवडता हॅलोविन येतो.

त्यानंतर येते थॅंक्स गिव्हिंग आणि अर्थातच मग ख्रिसमस व नविन वर्षाचे स्वागत.

१६२१ साली मे फ्लॉवर या जहाजातुन आलेले यात्रेकरू व इथले स्थानिक रेड इंडियन यांनी मिळुन चांगले पीक आल्याबद्दल मेजवानीचे आयोजन केले.

त्यानंतर काही वर्षे अनियमितपणे थॅंक्स गिव्हिंग साजरे केल्या गेले. सुमारे दोनशे वर्षांनी थॅंक्स गिव्हिंगला राष्ट्रीय सण म्हणुन मान्यता मिळाली.

आजच्या काळात कुटंबातील मंडळी एकत्रं येऊन जेवणाचा आनंद घेतात. या जेवणात टर्कीचे जेवण बनवतात. त्या पाठोपाठ पम्पकिन पायचा समावेश असतो.

थॅंक्स-गिव्हिंग आणि टर्की हे आज अविभाज्य मानले जात असले तरी मूळ मेजवानीत टर्की अथवा पम्पकिन पाय या दोन्हीचा ही समावेश नव्हता. टर्की नक्की कधी पासून आणि का या सणाशी जोडली गेली याच्या बर्‍याच आख्यायिका आहेत.

स्थानिक ट्रॅंगल व्हॅजिटेरियन सोसायटीने व्हेजिटेरियन थॅंक्स गिव्हिंगचे आयोजन केले आहे. अर्थातच टर्कींचा बळी नं देता जेवणाचा आनंद घेता येणार आहे.

यंदा या मेजवानीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळातो आहे. दुपारचे बुकिंग हाऊस फुल झाले आहे. त्यामुळे संध्याकाळचे जास्तीचे सिटींग उघडण्याचा आयोजकांचा प्रयत्नं आहे.

अधिक माहिती, रिझर्वेशन तसेच मेनु बघण्यासाठी इथे क्लिक करा:

http://www.trianglevegsociety.org/thanksgiving07/index.html

6 comments:

HAREKRISHNAJI said...

Enjoy

Ashwinis-creations said...

Menu is so delicious.....and unknown!

Anonymous said...

थ्यांक्स गिव्हींग ठिक आहे.. पण थ्यांक्स रिसिव्हींग कोण करते > ते समजले तर या मंगळग्रहा वरील डिशेश अधीक आकर्ष्क वाटतील !!

sangeetagod said...

एनॉनिमस,
या डिशेश मंगळावरील नसुन नॅनो स्पिटिकलवरील आहेत :0D
नॉनव्हेज खाणार्‍यांना व्हेजिटेरियन लोक काय खातात असा प्रश्न पडतो. त्याचप्रमाणे व्हेजिटेरियन लोकांना व्हिगन लोक काय खातात असा प्रश्नं पडतो.
खाता येण्यासारखे प्राणि एका हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहेत. पण भाज्या, धान्ये, डाळी, फळे यांच्या तर शेकडो जाती आहेत. त्यामुळे व्हिगन झाल्यावर व्हेरायटी कमी होण्याऐवजी वाढते.

Nandan said...

vegan food varcha ha blog pahun tumcha ha lekh aaThavala - http://tastypalettes.blogspot.com/2007/11/vegan-ventures.html

HAREKRISHNAJI said...

कसा काय झाला थॅंक्स गिव्हिंग डे व जेवणाचा कार्यक्रम ?