पहाटेस अर्घ्य दे दोन अर्ध्या स्वरांचे
उतरवुनी ठेव गंधार अन धैवत जरासे
पहाटेस अर्घ्य दे दोन अर्ध्या स्वरांचे
पॅट मथेनींचा आणि सकाळच्या रागांचा काही एक संबंध नसावा. पण त्यांच्या कार्यक्रमात अचानक सुचलेल्या या दोन ओळी. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीचा कार्यक्रम फारसा आवडला नाही. गेल्या वर्षीच्या रोमांचकारी अनुभवाची आस लावुन शेवटपर्यंत ऐकला. पण अखेरपर्यंत सूर सापडला नाही. नाही म्हणायला एंतोनियो सॅंचेझने ड्रम्समधे अक्षरशः जीव ओतला.
कार्यक्रमाचं मुल्यमापन करायला वापरण्यात आलेली (अशास्त्रिय) पद्धत:
स्वरलहरींवर जीव तरंगायला लागला का?
तरंगताना तो एका अनामिक प्रदेशात भटकायला गेला का?
तिथे किती वेळ थांबला?
परतल्यानंतर काही क्षण तरी आयुष्यात सगळं भरून पावलं ही भावना मनात भरून राहिली का?
हॅंग ओव्हर किती वेळ/दिवस टिकला?
6 comments:
Knidly elaborate so that it comes under my relam of who themathani is andwhat was the ocassion and whether its an Indian Concert..
Sandeep
faar troTak lihilay tumhi he posT. tyamuLe puresa sandarbh laagat nahiye.
स्वरांचा या हॅंग ओव्हर खरतर सारा जन्म असावा,
अनामिक व सर्किट,
ही पोस्ट खरं तर मी गेल्या महिन्यातच लिहायला घेतली. कार्यक्रमानंतर मला जसं अपूर्ण, अतृप्त वाटत होत, तसंच हे लिखाणही वाटत होतं. पुढे काही लिहायची इच्छाच होत नव्हती. त्या अधुर्या अतृप्त भावनांचे प्रतिबिंब या टिपणीमधे चांगले उतरले आहे हे तुमच्या प्रतिक्रियांवरून लक्षात आले!!
पॅट मथेनी हे नावाजलेले जॅझ संगीतकार गिटार वादक आहेत.
कार्यक्रमाच्या सुरवातीला त्यांनी बॅरिटोन गिटारीवर वाजवलेला पहिलाच तुकडा मला रूचला नाही. त्यानंतर अधुन-मधुन गिटारी बदलत अनेक तुकडे म्हणजे गाणी वाजवली. काही बरी होती. त्यांच्याकडे एक जरा वेगळी गिटार आहे. त्याला आपल्या स्वरमंडलला किंवा सतारीला असतात तशा झंकार करू शकणार्या तारा आहेत. त्या गिटारीचा आवाजच फार छान होता.
कार्यक्रम मला आवडत नसला तरी इतर लोक मात्रं तल्लीन झालेले दिसले. आता जॅझ या विषयातलं मला फारसं काही कळत नसल्यामुळे का आवडला नाही हे मी काही नक्की सांगु शकत नाही. म्हणुन मुल्यमापनाची अशास्त्रिय पद्धत लावली असे सांगितले.
केव्हातरी अतृप्त वाटावे, नेहमीच समाधान कसे व्हावे?
समाधान न होण्यातही आनंद आहे.
हरेकृष्णाजी,
खरं आहे तुमचं म्हणणं. समाधान नं होण्यातही आनंद आहे.
Post a Comment