आधी वंदु आणि नंतर?
दहा दिवस सळसळत्या उत्साहाचे, चैतन्याचे. आरास,प्रसाद,आरत्या, मिरवणुका. दहा दिवस कसे निघुन जातात कळतही नाही. लगेच येते अनंत चतुर्दशी. या दिवशी आपण आपल्या भक्तिचे,चैतन्याचे आणि मांगल्याचे सार्वजनिक विसर्जन करतो. आपल्या लाडक्या गणेशाचे पुढे काय होते?
http://www.ultrabrown.com/posts/the-battle-of-kurukshetra वरून घेतलेली ही छायाचित्रे:
आक्रमणकार्यांनी आपले देव भ्रष्टं केले आहेत मुर्तीभंजन केले आहे हे आपल्याला कदापिही मान्य नाही.
चित्रकार हुसेन आपल्या देवादिकांची उघडी नागडी चित्रे काढतात म्हणजे काय? हा घोर अपमान आहे...
समुद्रातुन जहाजांना जागा करून देणे म्हणजे हिंदु धर्माची अक्षम्य अवहेलना आहे....
आपण आहोत तरी कोण?
9 comments:
patala....me keada khaas dusarya divashi sakali gelo hot camera gheun chaupativar. pan mala photo kadhu dile nahit police ne. Pan ha vichar sarvannich karayala hava....
What you have said is absolutly correct. One solution is we must restrict the size of deity or not to immerse the same and keep it in a safe place for the next year.
One good thing is next few days Police and BMC collects the broken murties and then again immerse it in deep sea.
And as far as devotees are concerned, who cares about the pollutions and nature ?
From next year we have decided to immerse the Murti at home only in a bucket.
I think it's legally not allowed to click and publish photographs of Ganapati after the immersion.
नको प्रसिद्ध करुस गं अशी चित्रं...मन कळवळतं.
प्रतिकात्मक विसर्जन का नाही करीत लोक?
आणि जवळ जवळची ५-६ मंडळं एकत्र येऊन एकच गणपती बसविण्याची वेळ आलीच आहे.
किंबहुना, पूर्ण भागाचा (उदा - कोथरुड) एकच गणपती असण्यास काय हरकत आहे?
अश्विनी
दुर्दैवाने खरे आहे.
अश्विनी,
ही चित्रं खरंच मन बधिर करणारी आहेत, पण बहुतेक लोक डोळेझाक करतात म्हणुनच परिस्थिती बदलत नाही.
Have you read post by Tulips?
kharay tujhmhaNane dange karanyaasathi karan lagat yaanaa aaNi yaasaathii matra kaahich kuni karanaar naahi..
ही चित्रं गणेशोत्सवाची चुकलेली दिशा दाखवत आहेत हे खरेच. मोठमोठ्या गणेशमुर्ती दरवर्षी तयार करणं आणि त्यांना विसर्जित करणं हे थांबवायलाच हवं.
पण आपण ज्या प्रकारे captions दिले आहेत त्यावरुन आपला हेतू कुत्सित आहे हेच आपण दाखवलेत. समजा तुमच्या हाताला इजा झाली तर तुम्ही तिच्यावर उपचार करता का हातच कापून टाकता? तसेच हिंदूंनी गणेशविसर्जनात केलेल्या चुक कृत्यांनी हिंदुच्या सगळ्याच बाबी चूक हा उफरटा साक्षात्कार तुम्हाला कसा झाला? रामसेतू तोडणे फायद्याचे का तोट्याचे हा वाद कोर्टात चालू असताना त्यावर न्यानिवाडा देणारे तुम्ही कोण? आणि तेही या चित्रांचा संदर्भ देऊन?
असे करोडो हिंदू आहेत ज्यांना गणेश विसर्जनातल्या या बाबी मान्य नाहीत. तसेच त्यांना म्लेंच्छांनी केलेल्या देव-देवळांच्या तोडफोडीही मान्य नाहीत. परंतू काही मुठभर लोकांनी गणेश विसर्जनात चुका केल्या म्हणून म्लेंच्छांनी केलेल्या देव-देवळांच्या तोडफोडी तुम्ही सर्वांच्या माथी कशा फोडू शकता? तसेच म्हणून हुसेनच्या कृत्यांना पाठिंबा कसा देऊ शकता?
आपल्या ऽ%॓॓चे तारे पाहून आम्ही धन्य झालो.
अहो भास्करदादा,
हुसेनांच्या चित्रांना पाठिंबा,रामसेतुचा न्यायनिवाडा, चुक,बरोबर असले मी नं लिहिलेले शब्दं तुम्ही कसे काय वाचलेत बुवा माझ्या लेखात?
हे एक आत्मपरिक्षण आहे.
विशिष्टं धार्मिक अवहेलनांविषयीच्या मुद्यांवर गदारोळ माजलेला असताना, डोळ्यासमोर धडधडीत दिसत असलेल्या अवहेलनेबद्दल मी का लिहु नये आणि त्याची इतर समान मुद्यांशी तुलना का करू नये?
इतरांना दोष देणे फार सोपे असते, आरशात बघुन "माझं हे हे चुकलं" असं म्हणायला फार धैर्य लागतं.
तुमचे "परंतू काही मुठभर लोकांनी गणेश विसर्जनात चुका केल्या..." हे विधान मला मान्य नाही.
मुठभर? अहो समुद्र किनार्यावर जाऊन लाखो लोक दरवर्षी या अवहेलनेत सहभागी होतात,उरलेले टिव्हीवर बघतात. गप्प रहाणारेही मूक संमतीच देत असतात.
तरी देखिल सर्वच हिंदु असे आहेत असे मी लिहिलेले नसताना ते वाक्य आपण माझ्या तोंडात -आपलं बोटात का बरे घुसडता आहात?
त्या तशा नसलेल्या हिंदुंमधे माझाही सहभाग आहे, म्हणूनच मी गप्पं नं रहाता त्याविषयावर लिहायचे ठरवले आहे.
गाय,गंगा व गणेश ह्या तीन अतिशय महत्वाच्या प्रतिकांची आपण रोजच्या रोज कशी अवहेलना करतो त्यावर मी एक मालिकाच लिहिले आहे.
(पहा: माझे पुण्यजला गंगा, गावो विश्वस्य मतरः हे लेख)
सत्य परिस्थिती दाखवुन त्या विषयावर जागरूकता वाढवण्याचे काम मी करत आहे. काहींना पटते, काहींना पटत नाही.
नाही पटले तरी आपण आवर्जुन प्रतिक्रिया व्यक्तं केली त्याबद्दल मात्रं धन्यवाद.
Post a Comment