टेंप्लेट मधील बदल व टयुलिपची नाराजी इ.
मी सध्या बाहेरगावी आहे. मला इंटरनेटचा अगदी गरजेपुरताच वापर करता येतो. पण त्यातही मला काही लेखांचे प्रिंट आऊट काढायचे आहे. ते नीट यावेत म्हणुन टेंप्लॆट मधे तात्पुरते बदल केले आहेत. त्याबद्दल क्षमस्व.
ट्युलिपने माझ्या आधी वंदु आणि नंतर ...? वर नाराजी व्यक्त करणारा भला मोठा लेख प्रसिद्ध केला आहे. तो इथे वाचा.
माझ्या लेखाची इतकी मोठी दखल घेतल्याबद्दल ट्युलिपचे आभार. टाळ्या आणि टिकांचे सारखेच स्वागत.
एक समाज म्हणुन आपण प्रश्नांना थेट हात घालणार आहोत की याला काय वाटेल, त्याला काय वाटेल असा विचार करत अस्तित्वात असलेली माहितीही दाबुन ठेवणार आहोत?
प्रश्नं तुमच्यासमोर मांडला आहे पुराव्यांसहित. आता वाईट बातमी घेऊन येणार्या दूताचाच शिरच्छेद करा अथवा प्रश्नं मिटवण्यासाठी प्रयत्नं करा.
तुमच्या भागातील गणेश मंडळांशी संपर्क साधा. त्यांना हे फोटो पाठबा, आपल्या उत्साहाच्या उधाणाचे काय परिणाम होतात ते त्यांना कळू द्या.
ट्युलिपला या विषयावर चर्चा करायची नाही. पण तुम्हाला करायची असेल तर जरूर इथे प्रतिक्रिया द्या.
टीप:
अश्विनी अंतिम युद्धचे पुढचे भाग प्रसिद्ध करते आहे. ते मी प्रवास संपल्यावरच इथे जोडणार आहे.
3 comments:
उत्साहाच्या भरात व स्पर्धेच्या नादात व कैफात आपण बनवलेल्या भल्यामोठ्याल्या, उंच उंच, गगनाला भिडणाऱ्या गणेश मुर्त्यांचे समुद्रात विसर्जन केल्या नंतर दुसऱ्या दिवशी पहाटॆ त्यांची काय परिस्थिती असते ती दाखवण्यासाठी या सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना,कार्यकर्त्यांना, आश्रयदात्यांना चौपाटी वर जरुर आणले जावे.
बराचसा दोष हा भाविकांकडे सुद्ध्याही जातो.
या पासुन बोध घेत निदान पुढल्या वर्षापासुन तरी आपल्या मुर्त्यांचा आकार व उंची कमी करण्याची सुबुद्धी त्यांना गणराया देवो.
Such topics can be debated till the end of the world, but yes at least in 21st century we should try and address them at some sane level.
where are u
Post a Comment