Saturday, September 01, 2007

सलमान खान व संजयदत्त यांना झाली की नाही?

सलमान खान व संजयदत्त यांना बद्धकोष्ठं म्हणजे मराठीत कॉन्स्टिपेशन झालं आहे का?

तुरूंगात सतत येणं-जाणं असलेल्या या थोर गुन्हेगारांच्या प्रकृतीबद्दल मला जरा काळजी वाटु लागली आहे. देशवासियांना त्यांच्या दिनचर्येची माहिती क्षणोक्षणी कळवण्याचे सामाजिक कार्य आपले थोर पत्रकार रात्रंदिवस करत आहेत. या दोन गुन्हेगारांनी काय खाल्ले, रात्री झोप लागली की नाही ,भेटायला कोण सगे-सोयरे आले, त्यांनी कोणाशी हास्तांदोलन केले, कोणाला मिठी मारली अशी बहुमुल्य माहिती छापायला आपली लोकहितवादी, समाजाभिमुख व स्वतंत्र बाण्याची माध्यमे तत्पर आहेतच. परंतु या सगळ्या वर्णनात या दोन गुन्हेगारांनी शौचालयाचा वापर केल्याची बातमी काही वाचनात आली नाही (तुरूंगात ती सोय असते का हो?). त्यामुळे जरा काळजी वाटु लागली आहे. माध्यमांनी जनतेच्या उत्सुकतेची दखल घेऊन कृपया खुलासा करावा.

9 comments:

HAREKRISHNAJI said...

आपणस असा खुलासा केला जात आहे की सद्ध्या दोघे ही बाहेरच आहेत. जामीनावर. एक जण आता देवळांच्या यात्रा करीत आहे. पुण्यातील दगडु शेठ गणपती, साईबाबा आणा आता वैष्णोदेवी.

घरी गेल्या वर सारक वगैरे घेउन नक्कीच झाले असणार.

Samved said...

hahahahahaha.....jabra......
ekdum patla...............

Anonymous said...

जे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे .
असा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते .
की तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे .
एकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर

Devidas Deshpande said...

हा चांगला पैलू शोधून काढला. दोघांच्याही बाबत माहितीचा अतिरेक झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आपल्यासारख्या विचार करणाऱ्यांना मन्स्ताप होतो.

HAREKRISHNAJI said...

खर म्हणजे अपचन आपल्याला झाले पाहीजे, अती वाचल्यामुळॆ, अती बघीतल्या मुळे.

Sandeep Godbole said...

हिरो वर्शीप.चालते ..!
पैसा वर्शीप..धावते..
पाप वर्शीप..सुसाटते..
मग
पापाराझी वर्शीप घॊंघावते.
जे जे आपणास आवडे ते लोकांसी सांगावे..
कुणी कानांत कुजबुजुन..
कुणी लेखणी झिजवुन.
कुणी क्यामेरे घेऊन...
कुणी ब्लौग सजवून..

जे जे आपणासी आवडे ते तेच वाचवे ..
नावडे ते सोडोन द्यावे..
करूद्यावी ज्याची त्याला
अतीरेकी चळवळ !

वेड आपुले ठेवावे
आपण पांघरून..
वैशाखी येई शिशीर ह्ल्ली पेडगांवात..

HAREKRISHNAJI said...

Yesterday at Vaishodevi, Shri Sanjay Dattaji was offered and he travelled in a VVIP Govt. Car with Red Light on top.

At Shirdi, he was allowed to entered from entrance reserved for VVIP's

Nandan said...

:), mast.

Yogesh said...

ha ha.. jabari ahe. :)