Wednesday, August 15, 2007

बदलत्या भाषा

मराठीवर आक्रमण होत असल्याची तक्रार बरेच वर्षांपासुन ऐकायला मिळते आहे. याला आक्रमण म्हणायचे की समृद्धतेत पडलेली भर म्हणायचे या विषयी मतभेद आहेतच.
मराठीवर इंग्रजीचाच नव्हे तर मालिका आणि सिनेमांच्या माध्यमातुन सतत भडिमार झाल्यामुळे हिंदीचाही प्रभाव पडु लागला. नंतर संगणक आणि इंटरनेट वापरणार्‍या माझ्यासारख्यांनी इतर भाषेतील शब्दं वापरण्याबरोबर व्याकरणाचे नियमही सैल करायला सुरूवात केली आहे. मध्यंतरीच्या काळात बारहासारखी सुविधा अस्तित्वात नसताना बर्‍याच लोकांनी रोमन लिपीत मराठी लिहायला सुरूवात केली.
हौशी ब्लॉग लेखकांनी जर नियमांची पायमल्ली केली तर ते समजण्यासारखे आहे. मात्रं काल प्रत्यक्ष
महाराष्ट्र टाईम्स मधे "इतकी सारी कठीण परिस्थिती असतानादेखील तिच्या आईने आपल्या मुलीचं म्युझिकप्रति असलेलं पॅशन तसंच राहावं याची दक्षता घेतली" असं हिंग्लिशमधुन अनुवादित केलेलं वाक्य वाचुन मलाही गरगरलं. याला अक्ष्यमं हलगर्जीपणा म्हणावे की असे वाक्प्रचार मराठीत प्रचलित झाल्याची मान्यता म्हणावे?
अर्थात बदलत्या भाषेविषयी किंवा ती नष्टं होण्याच्या मार्गावर असल्याची भिती वाटणे हे फक्तं मराठीच्याच बाबतीत घडते आहे असे ही नाही. इथे अमेरिकेत कायदेशिर अथवा बेकायदेशिर मार्गाने येणारे मेक्सिकन लोक इंग्रजी शिकत नाहीत याविषयी बहुजनांमधे बराच असंतोष दिसुन येतो. वैश्विकीकरणामुळे सर्वच भाषांचा एकमेकांवर प्रभाव पडु लागला आहे. संगणकावर टाईप करताना you चा u आणि for चा 4 होतो. हिंग्लिश, मॅंल्गिश (मॅंडेरिन आणि इंग्लिश) आणि स्पॅंगलिश (स्पॅनिश आणि इंग्लिश) अशा संकरित भाषाही नव्याने तयार होत आहेत. आपण सगळे मिळून नकळत एका जागतिक भाषेकडे वाटचाल करत आहोत का?

6 comments:

Yogesh said...

yaa vishayavar ek charcha ithe pahayla milel.

http://www.manogat.com/node/10259

ATOM said...

माणसांसाठी भाषा आहेत. भाषे साठी माणसे नाहीत.भावना व अर्थ
मह्त्त्वाचा..व्याकरण दुय्यम आहे.

इंग्रजीचा पेपर तपासताना स्पेलींग मिस्टेक्स साठी मार्क कापणे आत्ता, या क्षणा पासून बंद करणे अत्युत्तम ठरेल.

मराठी, हिंदी मधे,ह्रस्व दीर्घ काढून च टाकायला हवेत.

संस्क्रूत भाषा (केवळ टाईम पास करणार्यांसाठि) ग्रॆजुएशन नंतरच शिकविल्या गेली पाहीजे.१० वी पर्यंत संस्क्रुत भाषा शिकण्यावर बंदीच आणायला हवी कारण त्या पाई , आधुनीक विषयांना वेळ कमी मिळतो व फोकलट पणा करण्यात धन्यता मानण्याची व्रुत्ती बोकाळते. न आणि ण या पैकी एक अक्शर बाराखडीतून काढुण टाकायला काय हरकत आहे ? सोप करा बुवा सगळ !

sangeetagod said...

योगेश,
तुम्ही दिलेला लेख छान आहे.
संपादकांनी भाषेला प्रवाही करण्याचे गोंडस नाव दिले आहे. वाचकांच्या मते मात्रं या संपादकांच्या डुलक्या आहेत.

sangeetagod said...

एटम,
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. मुद्दा चांगला आहे. पण थोड्याशा फरकानी अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. शिवाय योगेशने दिलेल्या लेखात मांडलेला मुद्दा म्हणजे म.टा. तले लेख कळण्यासाठी वाचकांनी इंग्रजी आणि हिंदी शिकावे अशी संपादकांची अपेक्षा आहे की काय?

HAREKRISHNAJI said...

from http://ashwini-creations.blogspot.com/2007/08/blog-post.html
"कसं काय" ब्लॉग वर यापूर्वी प्रसिद्ध झालेली ही विज्ञान काल्पनिका ! ती अपूर्ण वाटली अशी ब‍र्‍याच वाचकांची प्रतिक्रिया आल्याने, एक अभिनव प्रयोग म्हणून मी ती पुढे लिहीत आहे. अर्थात लेखिकेच्या परवानगीनेच!
कसं काय च्या लेखिकेला अर्थात प्रश्नांची उत्तरं वाचकांकडूनच अभिप्रेत होती.

मला माझ्या मर्यादांची पूर्ण जाणिव आहे, व हा एक प्रयत्न आहे.

In case if you are not aware of it

Chinmay said...

पण दुर्दैवाचा भाग असा की मराठी माणुस आपणहुन इंग्रजीचा स्विकार करतोय. अमेरिकेत जायची आवश्यकता नाही, पुण्यात बघा. मला वाटत पुण्याची प्रथम भाषा आता इंग्रजी असेल.

गुजराती माणुस असो की पंजाबी, तो स्वभाषिकांशी स्वत:च्या भाषेतच बोलतो. आपण मराठी माणुस मात्र इंग्रजी बोलण्यात धन्यता मानतो.

या वर उपाय काय?हा लेख कृपया वाचावा -
http://marathimauli.blogspot.com/2007/05/blog-post_05.html#links