पूर्बयी
मावळतीच्या वेळी पाखरं घराकडे परतु लागतात. त्याला हिंदीमधे पूर्बयी असा शब्दं आहे. इटली आणि भारताचा प्रवास आटपुन परतीच्या प्रवासात हा शब्दं आठवला, आणि डोक्यात विचारांचे काहुर माजलं. दरवर्षी नविन घरटं बनवणार्या पाखरांना जुन्या घरट्याची आठवण येते असेल का? माझे भारतात जाणे पूर्बयी, की तिथुन येणे पूर्बयी? (नवर्याला मराठी येत नाही हे एक बरंच आहे - मला असा प्रश्नं पडला आहे हे वाचुन त्याला किती वाईट वाट्लं असतं.)
नवर्याबरोबर इटलीची भ्रमंती करुन झाल्यावर त्याला सोडुन मी भारतात गेले. आप्तेष्टांबरोबर काही दिवस घालवुन, दिवाळी साजरी करुन परत आले. घरी आल्यावर नवर्याने विचारले तुला आपल्या घराची आठवण आली का? मी त्याला म्हंटलं तुझी आठवण नक्कीच आली. जिवलगांच्या सहवासात सुखसोयींचा अभाव जाणवत नाही हे त्याला अजुन अनुभवायला मिळालेलं नाही. असो.
आमचा प्रवास सुखाचा झाला, खुप मजा केली, दिवाळीचा फ़राळ, फ़टाके, रांगोळ्या, पणत्या, लक्ष्मीपुजन, पाडवा, भाऊबिज या सगळ्याचा मनमुराद आनंद घेऊन परत आले.
इटलीच्या प्रवासातील अनुभव लिहायला आता सुरुवात करणार आहे - वाचत रहा.
1 comment:
Poorbayi shabd aavaDala. Pravas-varnan vaachayalaa utsuk aahe.
Post a Comment