झिकर चांदण्यातले
या आठवड्यात कारबरोमधे सुफ़ी फ़ेस्टिवल होता. शुक्रवारी रुमीच्या कवितांचे वाचन आणि गायनाचा कार्यक्रम होता.रुमीच्या कविता आम्हाला दोघांनाही खुप आवडतात आमच्या लग्नाचा आणाभाका (Vows)मधे आम्ही त्यांचा समावेशही केला होता.
कार्यक्रम खुप छान झाला. शेवटी आम्ही उगाच रेंगाळत उभे होतो, तेव्हा कोणीतरी सांगितले की दरवेशी जिथे मुक्काम ठोकुन आहेत त्या गावाबाहेरच्या राहुट्यांजवळ शेकोटी पेटवुन झिकर होणार आहे. झिकर म्हणजे आपला गरबा असतो तसे गोल करुन केलेले सामुहिक न्रुत्य. त्यांचे अध्यात्मिक गुरु मधे उभे राहुन त्यांच्या भाषेतल्या मंत्राचे उच्चार करतात आणि सगळे त्यात आवाज मिसळ्तात. साथीला डफ़, इतर वाद्ये असतात. हळुहळु जसा रंग चढु लागतो तसे दरवेशी गोलामधे येउन गिरक्या घ्यायला लागतात.
सगळी हौशी मंडळीं राहुट्यांकडे रवाना झाली. आम्ही पोचेपर्यंत झिकर सुरुही झाला होता. वर आकाशात लुकलुकणारे असंख्य तारे, शेकोटीची उब, रुमीच्या कविता आणि डफ़लीवरची थाप - झिकर चांगलाच रंगला होता.
त्या तालावर आठवणींच्या लाटाही उचंबळुन येत होत्या - क्षणात मन अनेक वर्षे मागे गेले. हिमालयाच्या आणि सातपुड्याच्या भ्रमंतीमधे शेकोट्या पेटवुन म्हंटलेली वेगवेगळ्या भाषांमधली गाणि, रचलेला गर्बा , दिवसभर चालुन थकलेल्या जिवांना दिलासा देणारा बोर्नव्हिटा किंवा गरम चहाचा कप, जिवाभावाचे मित्रं मैत्रिणि...
दूर देशात राहुन, यांत्रिकी आयुष्यात तो अनुभव पुन्हा कधी येईल असे ध्यानीमनीही नव्हते....!!!
(फ़ोटो सौजन्य : http://dilipb.smugmug.com)
2 comments:
रुमीच्या कविता? मला कळव नं...मी एकही वाचलेली नाहिये.
पण एकूण तुझ्या वर्णनावरून झिकर चा अनुभव फ़ारच स्वर्गीय असला पाहीजे...आणि हे दरवेशी कोण? नक्की कुठली ही संस्कृती?
पण काव्याच्या आणि संगीताच्या अनुभूतींना अशी देशा-संस्कृतींची आणि नव्या जुन्या इतिहासंची बंधणं नसतातच मुळी.......
अश्विनी
सुफ़ी पंथ हा साधारण आठव्या शतकात उदयाला आला - कोणी एका व्यक्तीने याची स्थापना केल्याचे ऐकिवात नाही. ईस्लाम आणि हिंदु संस्कृतीच्या मिलाफ़ातुन उदयाला आलेला हा पंथ आज भारत, पाकिस्तानपासुन तुर्कस्थानापर्यंत पसरलेला आहे. इतकंच नाही, तर अमेरिकेत अनेकांनी हा पंथ स्विकारला आहे. प्रेम आणि आराधनेच्या मार्गाने ईश्वराशी नाते जोडणे हा या पंथाचा गाभा आहे.
http://en.wikipedia.org/wiki/History_of_Sufism
जलालुद्दिन रुमीं हे सर्वात प्रसिद्ध सुफ़ी कवी आहेत. त्यांच्या कालातीत कविता अजरामर झालेल्या आहेत.
http://www.rumi.org.uk/
http://www.rumi.org.uk/poetry/
आमच्या भागात शरिफ़ बाबा नावाचे एक सुफ़ी गुरु आहेत तेच हा उत्सव घडवुन आणतात. मुख्य दरवेशी तुर्कस्थानातुन येतात इतर अमेरिकेतुनच येतात.
झिकर बद्द्ल अधिक माहिती -
http://www.ibiblio.org/cybersufis/html/pages/zikr/NEWPAGE/ZIKRPAGEWNEW.htm
http://www.mevlana.net/sema.htm
आणि शेवटी - रुमीची कविता : (अर्थात भाषांतरित)
Whenever Beauty looks,
Love is also there;
Whenever beauty shows a rosy cheek
Love lights Her fire from that flame.
When beauty dwells in the dark folds of night
Love comes and finds a heart
entangled in tresses.
Beauty and Love are as body and soul.
Beauty is the mine, Love is the diamond
Post a Comment