बागेश्री, हंसध्वनी आणि मांड
बसंत बुखारीनंतर बागेश्री, हंसध्वनी आणि शिवाय मांड इतकं सगळं ५ दिवसात शिकुन मी शार्लेटहुन परत आले आहे. शिवाय मिंड्कारी, लयकारीचे वेगवेगळे ढंग!!! या सगळ्याची प्रॅक्टिस करायला काही महिने जातील.
इंद्रजित खुपच डाउन टु अर्थ आहेत, आणि हातचं काहीही नं राखता शिकवायला तयार.
गेल्यावर त्यांच्या पाया पडा वगैरे गोष्टी मुळीच कराव्या लागत नाहीत. एकदम इझी गोइंग.
बागेश्री हा राग माझा आवडता राग, त्यातुन हा राग मी आधी पं हबीब खानांकडुन सतारीवर आणि गाण्यात सरला बाईंकडे शिकले असल्यानी पटापट शिकता आलं. नुकत्याच एका कार्यक्रमात मी वाजवला पण होता. आता नविन शिकलेली मिंड्कारी आणि लयकारी आधी बागेश्रीतच वाजवुन बघणार आहे.
रविवारी इंद्रजितच्या शिकवणीची एक व्हिडियो पण तयार केली आहे. त्याची DVD मला लवकरच मिळेल आशी आशा आहे.
सतारी सारखं वाद्य अमेरिकेतल्या अशा छोट्या गावात शिकायचं म्हणजे असंच काही तरी करत शिकावं लागणार. डरहॅमला आल्यापासुन गाण्याचा क्लासही सुटला आहे - अवेळी सुरु केलेली ही संगीत साधना अशी अधांतरीच रहाणार आहे!!!!
3 comments:
संगीता
मांड असा शब्द आहे की 'मींड'? 'मींड म्हणजे काय मग?
मला संगीतातलं काही कळत नाही म्हणा...
पण तुझी जिद्द दाद देण्याजोगी वाटते!
अश्विनी
मांड आणि मींड हे दोन वेगळे शब्दं आहेत. मांड ही राजस्थानी लोकसंगीतावर आधारित उपशास्त्रिय रचना आहे. तर मींड हे एक तंत्र आहे, ज्यामधे एका स्वरावरुन दुसर्या स्वरावर जाताना त्या दोन स्वरांमधल्या सगळ्या श्रुती दाखवल्या जातात.
सतारीच्या अनुषंगात सांगायचं झालं तर समजा सा च्या पड्द्यावर आघात करुन बाजाची तार खाली ओढ्ली तर "सा" च्या वरच्या श्रुती ऐकु येतील आणि तसे करताना "रे" वार बोट थांबले की सा वरुन रे चा मिंड घेतला असे म्हणता येईल.
आधीच सतार हे फ़ार कठीण वाद्य आहे. त्यातुन उस्ताद लोक दहा-पंधरा वर्षाच्या रियाजानंतर जे वाजवु शकतात ते मला कधीच जमणार नाही, तरी जे काही जमतं त्यातुन माझा मला भरपूर आनंद मोळ्तो हे खरे!!!
हॅलो अश्विनी,
तू कॅलिफ़ोर्नियामधे कुठे आहेस? तिथे जवळ कोणी शिकवणारे आहेत का?
सतारी बरोबर गाणं आणि जमलं तर तबलाही शिकणं फ़ायद्याचं ठरतं.
माझ्याकडे सतारीची एक दोन पुस्तकं आहेत - सितार मालिका आणि सितार शिक्षा. सितार मालिकेमधे इम्प्रोव्हायझेशन करण्याच्या अनेक युक्त्या सांगितलेल्या आहेत.
मी जवळ्पास दोन वर्षे फ़ोनवर शिकायचा प्रयत्नं केला - त्याचा फ़ायदा होतो - पण पण गुरुकडे शिकण्याला पर्याय नाही...
-
संगीता
Post a Comment