Tuesday, June 24, 2008

साहित्य संमेलानात मराठी ब्लॉग्जची दखल घ्यावी

मराठी साहित्य संमेलन बे एरियात घ्यायचा निर्णय संमत झाला आहे. त्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया येत असल्याने माध्यमांना नवा खुराक मिळाला आहे.
या गदारोळात खालील सूचना कराव्याशा वाटतात:
१. साहित्य संमेलनाने मराठी ब्लॉग विश्वाची दखल घ्यावी. मराठी ब्लॉग्ज अद्याप म्हणावे तितके परिपक्व झालेले नसले तरी विविध विषयांवरील उत्तम लेखनही इथे वाचायला मिळते हे ही खरेच. हे महत्वपूर्ण माध्यम साहित्य संमेलनात वगळले जाऊ नये असे वाटते. मराठी लेखकांनी या माध्यमाचा स्वीकार करून त्याला अधिक सशक्त करायला हवे. त्यासाठी मुळात आधी त्यांची या माध्यमाशी ओळख होणे हे फार गरजेचे आहे. आज एकाही प्रमुख मराठी साहित्यिकाचा स्वतःचा असा ब्लॉग नाही. त्यांचे साहित्य ब्लॉगवर वाचायला मिळते ते इतरांनी प्रसिद्ध केले म्हणून. लेखक आणि हे माध्यम यातील डिजीटल डिव्हाईड कमी व्हायला हवा. त्यासाठी ठोस पावले उचलली गेली पाहिजेत असे वाटते.
२. साहित्य संमेलनात तंत्रज्ञानाचा उपयोग करून अधिकाधिक लोकांना त्यात सहभागी करून घ्यावे. मराठी साहित्य परिषदेचा स्वतःचा ब्लॉग असावा. त्यात संमेलनाविषयी अद्ययावात,उपयुक्त माहिती उपल्ब्ध करून द्यावी. लाइव्ह टेलिकास्ट पूर्वी केले गेले आहे की नाही हे मला माहित नाही.पण लाईव्ह टेलिकास्ट तसेच दूरसंचार माध्यमांच्या मदतीने जगभरातील साहित्यप्रेमींना प्रत्यक्ष सहभागी करून घ्यावे.

यासंबंधी कोणाशी संपर्क साधावा हे माहित नसल्याने ब्लॉगवर ही पोस्ट टाकत आहे. आपल्याला याविषयी काय वाटते? कृपया इथे प्रतिक्रिया द्या किंवा तुमच्या स्वतःच्या ब्लॉगवर लिहा.

11 comments:

देविदास देशपांडे said...

अगदी खरं आहे. केवळ नावावर लेखक म्हणून मिरवणार्‍या मंडळींपेक्षा अनेक ब्लॉगवरील लेखन कित्येक पट सरस आहे. मात्र यांपैकी किती लेखक नेटवरील साहित्याचे वाचन करीत असतील, हाच मुळात प्रश्न आहे. त्यांच्याकडून या साहित्याची दखल घेण्यात येईल, अशी अपेक्षा कशी बाळगणार?

HAREKRISHNAJI said...

I was about to write on the same topic

प्रशांत said...

कसंकाय
या महत्त्वाच्या विषयावर पोस्ट टाकल्याबद्दल धन्यवाद.
-प्रशांत

shinu said...

मुद्दा खुप चांगला आहे; पण ब्लॊग स्वत: लिहिणारे किती आणि कॊपी पेस्ट करणारे किती हे कसं समजणार?

kasakaay said...

शिनु,
ब्लॉग जगतात नियमित संचार करणार्‍यांना मूळ लेखक आणि उचलेगीर यातील फरक सहज कळून येतो.
खरं तर हा प्रश्न सर्वच माध्यमांना लागू होतो. सिरियल, सिनेमा, गाणी यांच्या कथा, चाली यांची सर्रास उचलेगिरी होते.
अगदी प्रसिद्ध रचना,लेखक,लेखिकाही यातून सुटलेले नाही. विलियम शेक्सपियर या नावाने लेखन करणारी मूळात एक ज्युयिश बाई होती असे काहींचे म्हणणे आहे. याशिवाय वेळोवेळी प्रसिद्ध धर्मग्रंथ, पौराणिक कथा खरंच कोणी लिहिल्या या विषयी ही मतमतांतरे आहेत.
दखल घेण्याचे अनेक मार्ग असू शकतात. साहित्य संमेलनात इंटरनेटला जोडलेले संगणक किऑस्क ठेवणे व त्यावर मराठी ब्लॉग विश्व, ब्लॉगवाणी सारखे ब्लॉग रोल्स किंवा उपक्रम, मनोगता सारखी संकेतस्थळे उपलब्ध करून देणे हा एक मार्ग असू शकतो.
लेखक व वाचकांना या माध्यमाशी ओळख करून देणे हे महत्वाचे आहे. मराठी लेखकांनी काळाच्या बरोबर चालून नविन तंत्रज्ञान अवगत केल्याशिवाय मराठीचा टिकाव लागणार नाही असे वाटते.

HAREKRISHNAJI said...

Where are you ? Missing you on the blogs

kasakaay said...

हरेकृष्णाजी,
विचारल्याबद्दल धन्यवाद,सद्ध्या फार व्यस्त आहे.
चार-पाच पोस्ट अर्धवट लिहुन ठेवल्या आहेत. पण वेळ मिळत नसल्यानी त्या मनासारख्या उतरल्या नाहीत म्हणून प्रसिद्ध केल्या नाहीत.

HAREKRISHNAJI said...

How could you remain absent on the blog for such a long time ?

HAREKRISHNAJI said...

लेखणी का बरे ठंडावली आहे ?

HAREKRISHNAJI said...

आपण B12 वर लेख लिहीणार होतात. Gentle Reminder.

prasann said...

नमस्कार,
मी प्रसन्न जोशी. स्टार माझा या
चॅनलसोबत काम करतो. वेब माझा हा संगणक
व इंटरनेट विश्वाशी संबंदित कार्यक्रमाची
निर्मितीही मी करतो. नुकतीच आम्ही
मराठीतील पहिली ब्लॉग स्पर्धाही घेतली.

साहित्य संमेलनाने ब्लॉग या माध्यमाची दखल घ्यावी. हा विचार मी यापूर्वीच केला होता. त्यानुसार, मी व माझ्या काही मित्रांनी मार्चमध्ये भरणा-या अ.भा.म.सा.संचे अध्यक्ष आनंद यादव यांची भेट घेतली. त्यांना आम्ही ब्लॉग या माध्यमाची दखल अध्य़क्षीय भाषणात घेण्याची विनंती केली आहे. ते आता कसा प्रतिसाद देतात ते पाहायचे. पण, जर मराठी ब्लॉगर्सनी त्यांना जास्तीत जास्त पत्र पाठवली (त्यांचा ई-मेल नाही.)
तर, ते ब्लॉगला गांभीर्याने घेऊ शकतात.

त्यांचा पत्ता-

आनंद यादव
संमेलनाध्यक्ष,
अ.भा.म.सा.संमेलन (महाबळेश्वर)
भूमी बंगला,
कलानगर,
धनकवडी,
पुणे 43.

माझा मेल- prasann.joshi@gmail.com
9422321772