आधी वंदु आणि नंतर?
दहा दिवस सळसळत्या उत्साहाचे, चैतन्याचे. आरास,प्रसाद,आरत्या, मिरवणुका. दहा दिवस कसे निघुन जातात कळतही नाही. लगेच येते अनंत चतुर्दशी. या दिवशी आपण आपल्या भक्तिचे,चैतन्याचे आणि मांगल्याचे सार्वजनिक विसर्जन करतो. आपल्या लाडक्या गणेशाचे पुढे काय होते?
http://www.ultrabrown.com/posts/the-battle-of-kurukshetra वरून घेतलेली ही छायाचित्रे:
आक्रमणकार्यांनी आपले देव भ्रष्टं केले आहेत मुर्तीभंजन केले आहे हे आपल्याला कदापिही मान्य नाही.
चित्रकार हुसेन आपल्या देवादिकांची उघडी नागडी चित्रे काढतात म्हणजे काय? हा घोर अपमान आहे...
समुद्रातुन जहाजांना जागा करून देणे म्हणजे हिंदु धर्माची अक्षम्य अवहेलना आहे....
आपण आहोत तरी कोण?