पुन्हा एकदा धन्यवाद आणि अभिनंदन
माझ्या ब्लॉगला बक्षिस मिळाले नसले, तरी मला मत देणार्या वाचकांना धन्यवाद.
विजेत्यांचे अभिनंदन!
एकुणच या स्पर्धेविषयी माझ्या मनात संमिश्र भावना आहेत. ब्लॉगर्सची अशी एकमेकांशी स्पर्धा लावणे योग्य का अयोग्य? इतरांशी स्पर्धा करायची की सहकार्य की दोन्ही? स्पर्धा, नामांकन किंवा बक्षिस मिळणे याला कितपत महत्व द्यावे? ही स्पर्धा म्हणजे बाजारुपणा तर नाही ना? एक ना अनेक प्रश्नांनी मला ग्रासले होते/आहे. त्यामुळेच मला मत द्या असं मी कुणालाही सांगितलं नाही, इतकंच काय, मी स्वतःही मतदानात भाग घेतला नाही. गायत्री किंवा आनंदघन यांना मत द्यावे असा मोह बरेचदा झाला, पण या प्रश्नांचा उंबरठा ओलांडता आला नाही. त्याचा एक फायदा नक्कीच झाला-जी काही मते पडली (१५) ती माझा ब्लॉग खरोखर आवडणार्या वाचकांचीच आहेत असं मला आवर्जुन म्हणता येईल आणि म्हणुनच तुमचे विषेश आभार मानायचे आहेत.
ज्यांना नामांकन किंवा बक्षिस मिळाले नाही त्यांचेही अभिनंदन कारण-
आपले विचार शक्य तितक्या प्रामाणिकपणे,निर्भिडपणे, नेमक्या शब्दात उतरवणे ही स्वतःची स्वतःशी स्पर्धा आहे. रोजच्या रहाटीतुन जाताना डोक्यात आलेले विचार निसटायच्या आधीच बंदिस्त करायची स्पर्धा आहे. इतर अनेक भूमिका बजावताना मनाच्या कोपर्यातल्या लेखक/लेखिकेला जागते ठेवयाची स्पर्धा आहे. काऊच पोटॅटो नं बनता, आयुष्य खर्या अर्थाने अनुभवून त्याचे प्रतिबिंब लिखाणात उतरवण्याची स्पर्धा आहे. रहस्व-दीर्घाच्या चुका नं करण्याची स्पर्धा आहे असंही म्हणू का? ( मी त्यात नापास) या सर्व स्पर्धात भाग घेतल्याबद्दल प्रत्येक ब्लॉगरचे अभिनंदन!
4 comments:
An appreaciable post, but I wonder - why didnt u write all this stuff during your last post?
Abhijit,
When I posted about my nomination, I just wanted to thank readers who might have recommended my blog. Needed some time to digest, soul search and find words to what my exact feelings were about the whole thing. As I mentioned in this post, I still have mixed feelings.
What do you think about the competition?
I dont.
Great! Thats what I am going to do from now on...
Post a Comment