American Dance Festival (ADF)
डरहॅमच्या सामजिक आणि सांस्क्रुतिक जीवनात तीन वार्षिक उत्सव महत्वंपूर्ण आहेत:
Full Frame Documentary Film Festival, American Dance Festival (ADF) आणि हौशी नवर्याचे All Vegan Thanksgiving!!!
Full Frame साठी मी अक्षरश: दोन दिवस रजा काढली होती. सद्ध्या ADF सुरु आहे. आत्ता पर्य़ंत बघितलेल्या कार्यक्रमांपैकी खालील उल्लेखनिय वाटले.
पॉल टेलरचे बॅंक्वेट ऑफ़ व्हल्चर्स:
या उत्क्रुष्ट कलाक्रुतीत नेते जगावर कसे युद्ध लादतात, त्या युद्ध्दाच्या आगीत मुळात ज्या ध्येयांसाठी युद्ध सुरु केले त्याच ध्येयांची कशी राख रांगोळी होते, आधी समाज आणि मग स्वत: नेते आणि देशही कसे बेचिराख होतात त्याचे दर्शन घडवले आहे. इराक युद्धाच्या पार्श्वभूमीवर हे कलाक्रुती अगदी आजच्या काळात चपखल बसणारी असली तरी पॉल टेलरच्या ही रचना कालतीत आहे आणि इराक युद्धावर बेतलेली नाही असे प्रश्नोत्तरांच्या वेळी सांगण्यात आले.
चित्रेश दास आणि जेसन सॅम्युएल स्मिथ यांचे रिदम सुट्स
दोन वर्षांपूर्वी मी अमेरिकन डान्स फ़ेस्टिवल पहिल्यांदा बघायला गेले. त्यातली लक्षात राहिलेली रचना म्हणजे "फ़ेस्टिवल ऑफ़ फ़िट". कथ्थक, फ़्लेमेंको आणि टॅप या तीन प्रकारांमधील विलक्षण साम्य बघुन मन अचंबित झालं होतं. फ़ुट वर्कचा समान धागा साधुन कलाकारांनी उत्क्रुष्टं सांस्क्रुतिक मिलाफ़ घडावुन आणला होता. पहिल्या वर्षिचे यश दुसर्या वर्षी मिळवण्याचा प्रयत्नं तितकासा सफ़ल झाला नाही. पण यावर्षी मात्रं चित्रेश आणि जेसन यांनी गेल्यावर्षीच्या निराशेची भरपाई केली. चित्रेश आणि जेसन यांची गेल्यावर्षी याच उत्सवात अचानक भेट झाली. जेसन स्टेजच्या मागे प्रॅक्टिस करत असतांना चित्रेश दासांनी गंमत म्हणुन जेसनला साथ द्यायला सुरवात केली. कथ्थक या न्रुत्यप्रकाराच्या अस्तित्वाचा गंधही नसणार्याला जेसनला हा कोण, माणुस आपली नक्कल करतो आहे असे वाटले. पण थोड्याच वेळात पायात साधे बुटही नं घालता विलक्षण तयारीचे फ़ुट्वर्क करणारी ही व्यक्ती सामान्य नाही हे त्याच्या लक्षात आले. मग साता समुद्रापलिकड्ल्या या दोन कलांचा जो संगम सुरु झाला तो यावर्षीच्या कार्यक्रमात पुर्ण विकसित झालेला दिसुन आला.
विशेष म्हणजे या कलाकारांनी दोन शैलींचे साम्य दर्शवतांना आपापल्या परंपरांचे तंतोतंत पालन केलेले आहे. फ़्युजन नव्हे, तर एक आधुनिक जुगलबंदी बघाताना डोळ्याचे पारणे फ़िटले.
Pilobolous - पलाबुलस
ADF च्या चाहत्यांचा सर्वात आवड्ता ग्रुप म्हणजे पलाबुलस!! न्रुत्यं आणि जिम्नॅस्टिक यांचा मिलाप करणार्या पलाबुलस चा प्रत्येक नाच अविस्मरणिय, प्रेक्षणिय आणि अचंबित करणारा असतो. शरिराला कशाही प्रकारे वाकवु शकणारे हे नर्तक आपल्या कलात्मक हालचाली आणि नर्तकांच्या असंभव वाट्णार॓या मांड्णीने प्रेक्षकांना एखादी गोष्टं सांगतात. दर वर्षीप्रमाणे या वर्षीही तितक्याच कल्पकतेने सर्व रचना सादर करण्यात आल्या.